धा पैशे.. (लघुकथा)
धा पैशे.. (लघुकथा)
"देना रे आबा मला धा पैशे, कालपास्नं मागु रायली"
अंजी बापाला विनवण्या करत होती.
"नाय सांगठल ना बाय तुला...नाय हाय माह्याकडं धा पैशे. काहुन पाहिजे तुला? "
"आरं आबा गावात जत्रा भरलीय ना खंडोबाची
मला बी जायचं हाय..ती खालच्या आळीची चंदी
गेलती ना काल...लालेलाल तो बुढ्ढीचा बाल खायला.मला बी पायिजे..मी जाणार हा??तु माला देना ना पैशे.. आईनीबी न्हाई दिल्यात काल तु तर दे."
.
अंजी आता रडकुंडीला आली होती.बापाला तिला तसं पहावत नव्हते.पण काय?
"हे बघ बाय खिसात एक पैका बी नाय... कुठुन देऊ तुला धा पैशे?? त्या पाटलाच्या खळ्यात सारवायचं काम हाय...आता लई ऊन हाय ना... म्हणून ते बी सांच्याला हाय.. तिथं कायी भेटलं का म देतो तुला,आता नाय हा."
धा पैशा साठी मे महिन्याच्या दुपारच्या बारा वाजेच्या रणरणत्या उन्हात एक दहा वर्षांची चिमुकली पाटलाच्या खळ्यात सारवायचं काम करत होती.. पाहुन लोकांना आश्चर्य वाटत होते...
