चुकलेली आई
चुकलेली आई
लहान मुलं देवा घरची फुले....! हे खरंच आहे. त्यांचं निष्पाप, निरागसपणा ज्यात कसलंच मनात मळभ नसतो. ही कथा आहे छोट्या राजने आईचे डोळे उघडल्याची....! काही वेळा मुलं विचित्र वागतात, पण त्यातून सकारात्मक बदल घडून येतो.
चला तर कथा वाचूया..
"सुनबाई ओ सुनबाई, पाणी देता का जरा...?'' सासूबाईंच्या हाकेने दिशा तनतन करतच उठली. काय यांचा सारखा त्रास आहे.जरा थोडं झोपून देत नाहीत.
दिशाचे सासू-सासरे वयाने खूप म्हातारे झाले होतें. जोपर्यंत स्वतःचे हात चालत होतें. तोपर्यंत करून खात होतें. आता शरीर साथ देईना म्हणून शहरात मुलाकडे आले होतें. दिशाला छोटा मुलगा राज होता. तो आईचे वागणं अगदी निरकून पाहत होता.
दुसऱ्या दिवशी दिशा चिडचिड करतच काम करत होती. रोजची धावपळ तिला नको वाटत होती. तरी काही कामासाठी घरात कामवाली बाई ठेवली होती. दिशाला मात्र थोडेही काम करायला नको वाटत. त्यात सासु-सासरे तिच्याकडे राहायला आल्यापासून तिची जास्तच चीड चीड वाढून त्यांचा राग राग पण खूप करत.
राजला मात्र आईचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. आजी आजोबांवर त्याचा खूप जीव होता.
दुपारी काम आवरून दिशा तिच्या बेडरूममध्ये जाऊन बसली. तिच काम आवरलं की तो नित्य दिनक्रम होता, "आईला फोन लावणे....! शेजारीच राज अभ्यास करत बसला होता. त्याचं लक्ष मात्र आईकडे होतें. रोज फोनवर आई काय बोलते यावर त्याच लक्ष बारकाईने असायचं.दिशा घरातील छोट्या छोट्या गोष्टींबाबतीतही आईशी बोलत होती. स्वयंपाक झाला का...? ते विषय सासू-सासर्यांचा तिला किती ओझं झालंय...! यापर्यंत विषय येऊन पोचला.माझी खूप ओढताण होतें. सगळ्यांना सांभाळता सांभाळता,असं तिच्या आईला ती सांगत होती. नवऱ्याला सांगून त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचही बोलत होती.
आई तिला समजावून सांगत होती, "बाळा ते तरी कुठे जाणार...! शेवटी एकुलती एक सून आहेस तू त्यांची. त्यांची सेवा करणं तुझं कर्तव्य आहे. तोपर्यंत सासूबाईंनी दिशाला हाक मारली, तिने तोंड मूरडत आता काय झालं यांना...??असं म्हणून तिने फोन ठेवून दिला.
सासूबाईंना भूक लागली होती.जेवायला दे म्हणून त्यांनी हाक मारली होती.
राजने मात्र आईचं बोलणं अभ्यास करतानाही अगदी मन लावून ऐकलं होत. आई किती तोंड मुरडते हेही राज पाहत होता.
संध्याकाळी राजचे बाबा ऑफिसवरून घरी आले, दिशाने नवऱ्याला पाणी दिले. नेहमीप्रमाणे राजची आणि बाबांची मस्ती सुरु झाली. आजी आजोबा कौतुकाने दोघांकडे बघत होतें. दिशा स्वयंपाक घरात सर्वांसाठी चहा ठेवत होती.
खेळता खेळता राजने बाबाना विचारलं....? "बाबा वृद्धाश्रम म्हणजे काय हो ...?त्याचे बाबा म्हणाले," तू कोठे ऐकलास हा शब्द...? बाबांच्या विचारण्यावर राज म्हणाला. सकाळी मी आई कोणाशीतरी बोलताना ऐकलं. आजीआजोबाना ती वृद्धाश्रमात पाठवायचं बोलत होती. त्यांच्यामुळे तिला खूप त्रास होतोय.....!असंही ती सांगत होती. दिशा किचन मधून बाहेर आली,चहा सर्वांसाठी घेऊन.
राजकडे दिशा आवाक होऊनच बघत होती. पुढे तो काय बोलणार यावर लक्ष तिचं बारकाईने होतें. त्याला शांत कसं करावा हेही तिला समजत नव्हतं.राजच्या बोलण्याने आज तीला खजील होण्याची वेळ आली होती.
राज त्याच्या आईसमोर बोलू लागला.बाबा मी लग्नच नाही करणार....! तुम्ही उद्या म्हातारे झाल्यावर माझ्या बायकोने असं तुम्हाला वाईट वागवलं तर,मला नाही आवडणार. तुमच्याबद्दल असं वाईट बोलेली ती...? जसं आई रोज फोनवर आजीआजोबांविषयी बोलत असते. मी सहन नाही करू शकत..?
राजच्या बोलण्याने दिशाचे डोळे अश्रूनी भरले. तिच्या चुकीचे वागण्याची तिला लाज वाटत होती. सगळे तिच्याकडे संशयित नजरेने बघत होतें. ती स्वतःला कटघरात उभी वाटत होती. तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं. "बाळा ते तुझ्याकडेच येणार दुसरीकडे कुठे जाणार...? खरंच किती चुकीचं वागलो याचा तिला पच्छाताप होत होता. सर्वांसमोर तिची मान शरमेने खाली गेली होती.
तिने हात जोडून मुलाची सर्वांची माफी मागितली.
राज, "आई तू खूप चांगली आहेस. माझी खूप काळजी करतेस पण आजी आजोबांना असं वागवू नकोस ना..? ते खूप चांगले आहेत. त्याच्या निरागस डोळ्यात आजी आजोबांविषयी ओढ, प्रेम जाणवत होत.
तिने स्वतःचे डोळे पुसले आणि वचन दिलं. नाही बाळा आजपासून त्यांना माझ्याकडून काही त्रास होणार नाही.
मुलांच विचित्र वागणं असतं पण त्यातूनही सकारात्मक बदल घरामध्ये घडून येतो हे या कथेतून दाखवलं आहे. कथा आवडल्यास लाईक नक्की करा. तुमचा अभिप्राय मोलाचा आहे.
समाप्त
