kanchan chabukswar

Fantasy

3.5  

kanchan chabukswar

Fantasy

चोरलेली निवडणूक X पटकावलेली ट्रॉफी

चोरलेली निवडणूक X पटकावलेली ट्रॉफी

6 mins
18


बदला:

व्ही एन आय टी कल्चरल फेस्ट मध्ये चुरशीचा सामना रंगलेला होता. तिसऱ्या वर्षाचा राहुल सिंग जीएस झाल्यामुळे राहुल आणि पार्टीचं वर्षभर वर्चस्व होतं, तर मच्छर आणि पार्टी थोडक्यातच हरलेली होती.

 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कल्चरल कार्यक्रमांमध्ये आता जणू काही तिसरं वर्ष आणि चौथ्या वर्षी वर्षीच्या विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाचे डाव रंगत होते.

राहुल चे मित्र देखील अटीतटीने खेळत होते तसेच चौथ्या वर्षाचे विद्यार्थी , चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जी एस चौथ्या वर्षाचा नाही झाला याचा जणू काही अपमान वाटत होता. त्या मनाने पहिलं आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी लिंबुटिंबु होते आणि फक्त दुरून गंमत बघत होते. कॉलेजचे राजकारण करायला आणि कळायला त्यांना वेळ लागणार होता.

तिसर्‍या आणि चौथ्या वर्षाला अनुक्रमे 180 आणि 170 पॉईंट्स मिळाले होते. आता फक्त 2 चुरशीचे सामने राहिले होते, पहिलं म्हणजे वाद-विवाद स्पर्धा आणि दुसरं म्हणजे एकल गायन.

दोन्हीकडे अतिशय उत्तम विद्यार्थी भाग घेणार होते.

वाद-विवाद स्पर्धेमध्ये तिसऱ्या वर्षाच्या मुलांनी परत बदमाशी केली होती, टॉस मुद्दामच तिसऱ्या वर्षाच्या मुलांनी उडवला म्हणजे अश्विन कुलकर्णी जिंकेल आणि विषय खूप सरळ आणि एकतर्फी होता," इंजिनिअरिंग चे मुले स्मार्ट असतात"

खरं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असा विषय ठेवणं हाच एक मूर्खपणा होता. विद्यार्थी इंजीनियरिंग शिकणारे, प्रोफेसर स्वता इंजिनियर, प्रिन्सिपल देखील प्रख्यात इंजिनियर, आणि अशा सगळ्यांना मूर्ख ठरवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. श्रीनी चौथ्या वर्षाला होता, त्याला इंजिनिअरिंग ची मुले स्मार्ट नसतात हे सिद्ध करायचं होतं. काही मुद्दे येत नव्हते.

तरीपण वाद-विवाद संधी साधून त्याने निवडणुकीच्या वेळेला राहुल सिंग च्या पार्टीने केलेली गुंडागर्दी उघडकीस आणण्याचे ठरवले.

संपूर्ण कॉलेजला खरं म्हणजे याविषयी काही माहितीच नव्हती, कारण की राहुलचंI धाक आणि प्रिन्सिपल यांनी केलेली झाका झाकी. होस्टेलच्या राड्यानंतर चौथ्या वर्षाच्या मुलांना देखील रस्तिकेट होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे उघडपणे कोणीच झालेल्या प्रकाराबद्दल काहीच बोलत नव्हतं.

वाद विवाद स्पर्धा प्रिन्सिपल जेष्ठ प्रोफेसर आणि चारीही विषयाचे विद्यार्थी असे उपस्थित होते. हॉल गच्च भरलेला होता.

अश्विन कुलकर्णीचे पॉईंट्स तर जबरदस्त होते, त्यामुळे तोच जिंकणार असं समजून तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बाहेर ताशा वाजवायला सुरुवात केली होती.

श्रीनीने जसा हॉल्स कब्जा घेतला आणि आपल्या वागचातुर्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात केली तसे हॉलमध्ये शांतता पसरली आणि बाहेरच ताशा पण बंद पडला. राहुल आणि कंपनी चे तोंड उघडे च्या उघडेच राहीले. जे राजकारण खेळून आणि ज्या वेगळ्या रीतीने त्यांनी निवडणूक जिंकली होती ते सगळे मुद्दे श्रीनी ने साखरेत घोळून घोळून ते लोक कसे संशोधक आहेत असं सांगून सिद्ध केले.

सरळ मार्गी इंजिनियर्स ना सरळ न जाऊ देण्याचं काम तिसऱ्या वर्षाच्या राहुल आणि पार्टीच्या संशोधकांनी केलं होतं. मत द्या अशी भीक मागण्यापेक्षा, जे दुसऱ्या पार्टीला मत देणार आहेत त्यांना घरातच डांबून ठेवून त्यांची मतं कमी करण्याचा अभिनव पराक्रम राहुलच्या पार्टी ने केला होता आणि हा सगळा गौप्यस्फोट आणि उलगडा श्री ने केला.


अतिशय प्रांजळपणे श्रीनी म्हणाला की तो चौथ्या वर्षाचा आहे, परीक्षेनंतर त्याला डिग्री मिळणार आहे, आणि कॉलेजनी त्याला फक्त सचोटी शिकवली आहे, राजकारण नाही. त्यामुळे तो फक्त सत्यच बोलत आहे आणि कल्पनेतल्या गोष्टी नाही.”

 त्याच्या मुद्दे आणि प्रांजळपणे मांडलेले विचार ,यामुळे, हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली आणि थोड्यावेळाने ढगांच्या गडगडाटासह सारखा टाळ्यांचा कडकडाट आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.

प्रिन्सिपल यांच्या चेहऱ्यावरती आश्चर्याचे भाव दाटून आलेले होते त्यांनी क्रोधाने निवडणूक वरती नेमलेल्या प्रोफेसर कडे बघितले ज्यांच्या माना खाली गेल्या होत्या.

मच्छर,, राजेश ,रघु सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले श्रीनी मच्छर पार्टीची लाज राखली होती.

अर्थातच श्रीनी नी वाद विवाद स्पर्धा जिंकलीत्यामुळे आता दोन्ही वर्षांची बेरीज 180 झाली होती.


शेवटची चुरस:

एकल गायनाची स्पर्धा शेवटची होती ज्याच्यासाठी चौथ्या वर्षाचा सौरभ शुक्ला जोरदार तयारी करत होता. तिसऱ्या वर्षाचा रमेश शर्मा, दुसऱ्या वर्षाचा विक्टर गोन्साल्विस, पहिल्या वर्षाचा श्रीधर सावंत यांच्यामध्ये शेवटची स्पर्धा रंगणार होती.


कुठल्याही पार्टी मध्ये विशेष करून चौथ्या वर्षाचा पार्टी म्हणजे काय तर खाली हॉलमध्ये बसून कांदा भजी वगैरे खाणे किंवा असच काहीतरी खाणे किंवा एकमेकांचा वाढदिवस साजरा करणे त्याच्या मध्ये सौरभ नेहमीच गाणं म्हणत असे. ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या फर्माईशी वरती सौरभ जोरदार गाणं म्हणत असेल कधीकधी मच्छर ची मैत्रीण रेश्मा, ती पण उंच टिपेच्या स्वरात सौरभ ला साथ देत असे.

गाण्याची परीक्षा म्हणायची होती तशीच एक युगलगीत पण म्हणायचं होतं.

आधी वाद विवाद स्पर्धा गाण्याची स्पर्धा त्याच्यानंतर होणार होती दोन्ही वर्षांची मुलं भूक-तहान विसरून आपापल्या स्पर्धकाला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती.

पहिल्या वर्षीचा श्रीधर गाता गाता मधेच बेसुरा गायला लागला त्याच्यामुळे तो बाद झाला, एक तर तो खूप घाबरलेला पण होता आणि हॉल मधली सगळी मुलं त्याला “बुक बुक” करत चिडवत होती

नंतर आला गोन्साल्विस, त्यांनी गोव्याकडे ची गाणी म्हणून मुलांचे फारच मनोरंजन केलं पण गातागाता त्याच्या गिटार तार तुटली तुटली आणि त्याच्या गालावर लागली, अचानक तो थांबला आणि त्याचा वेळ वाया गेला. पण त्यांनी गाणं उत्तम म्हटल्यामुळे तो स्पर्धेमध्ये टिकून राहिला.

रमेश शर्मा ने देखील अतिशय उत्तम रित्या अमोल पालेकर च्या सिनेमातली मधुर गाणी म्हटली आणि तो पण स्पर्धेमध्ये अटीतटीची लढत देत राहिला.


जिंकायचं फक्त सौरभ शुक्ला लाच होतं त्याच्यामुळे तो देखील आपले पूर्ण प्रयत्न करत राहिला.

 श्रीनि च्याडोक्यात एक कल्पना आली त्याने रघु या जवळ बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि कॅन्टीन कडे पिटाळले.

फेस्टिवलच्या दिवसांमध्ये मुलं तहान भूक विसरून आणि जिंकणारे जणू काही त्यांच्या इज्जतीचा सवाल झाला झाला होता त्यामुळे आज जास्त मुलं जेवली नव्हते विशेष करून स्पर्धक तर सकाळपासून उपाशीच होते.

रमेश शर्माला राहुल सिंग ची मनामधून भयंकर भीती वाटत होती कारण त्याच्या दहा गुणांवर ती तिसरे वर्ष जिंकणार होतं नाहीतर हरणार होतं. त्याने तर सकाळपासून अन्नाचा कणही घेतला नव्हता, तो कॉलेजच्या आवारातील बागेमध्ये गाण्याचा रियाज करत होता. त्याच्या उलट मच्छर आणि गँगने सौरभ ला धीर देऊन सकाळपासून त्याच्या आवडीच्या वस्तू खाऊपिऊ घातल्या होत्या


दुसऱ्या फेरीमध्ये बाद झाल्यानंतर फक्त रमेश शर्मा आणि सौरभ शुक्ला तिसऱ्या फेरीमध्ये गायला उभे राहिले.

सुरुवातीला सौरभ गायला, त्याने ताना आलाप घेत “कुहू कुहू बोले कोयलिया” गाणं जबरदस्त गायलं. रमेश देखील पट्टीचा गायक होता रमेश गायला उभा राहिला तेवढ्यात रघु काहीतरी सामान हातामध्ये घेऊन आला.

प्रत्येकाने पहिल्या ओळी मध्ये बसलेल्या प्रत्येक मुलाला सामानाचा वाटप करण्यात आलं आणि त्यांनी ते हातात धरून खायला सुरुवात केली. रघुनी गरम तळलेले बटाटे वडे आणि कांदा भजी कॅन्टीन मधून आणली होती. रमेश गाणं सुरू झालं. समोर मुले बटाटेवडे खाताना बघून त्याच्या तोंडाला सतत पाणी सुटत राहिलं. बटाटे वड्या चा वास ,खाणारी मुलं बघून रमेश च्या तोंडातून गाण्याची तान बाहेर पडेना.

 तो सारखे आवडे गीळायला लागला, तोंडात येणार पाणी त्याला आवरत नव्हतं.

शास्त्रीय संगीत असल्यामुळे तिसऱ्या वर्षाचा रघुवीर गायकवाड बासरी वाजवत होता. अगदी त्याच्या समोर बसून पोरं हातामध्ये बटाटेवडे धरून मिटक्या मारत खात असलेली बघून त्याला काही केल्या बासरीवादन जमेना.

बासुरी मध्ये हळुवार फुंकर मारायचे ऐवजी थुकच जात होती.

 त्यामुळे बासरीतून पादल्या सारखा आवाज येत होता.

त्या दोघांची अशी अवस्था बघून हॉलमधल्या मुलांना हसू आवरेना. त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. पोर चटणी मध्ये बुडवून बुडवून बटाटेवडे खात होती , कधी कधी हात वळून वळून बटाटेवडे खात होती, एकावर थांबत नव्हती दोन-तीन बटाटेवडे समोर बसलेली मुले आरामात फस्त करत होती.

    ते बघून रघुवीर आणि रमेश यांना काही केल्या गाणं आणि बासुरी वाजवणं जमेना. दुसरीकडे डोळे करून देखील त्यांनी प्रयत्न केला तरीपण त्यांची नजर सतत बटाटेवडे कडे जात होती आणि तोंडामध्ये पाणी येत होते. रघुवीर आणि रमेश सकाळपासून उपाशीच होते.

 दिलेले चार मिनिट असेच संपून गेले. ते झाल्यावर ती मात्र हॉलमध्ये चौथ्या वर्षाच्या मुलांनी बटाटवडा वर केलेले स्वयम् रचित गाणी म्हणायला सुरुवात केली,

 :”ए मेरी जोहराजबी चाली “वरती त्यांनी मस्त गाणे म्हणायला सुरुवात केली.

 ए मेरे आलुबोंडा

तुझे मालूम नही

तुझ

मे खुशबू कैसी

मु मे आये पानी

   मै तो ना गाना गाऊ, ना गाऊ, ना

   भले मे हIर जाऊ ,हIर जाऊ, हI

   तुझसे मै छोड दु

    मेरा पुरस्कार

भले मुझे मार मिले मार मिले मार

अशा रीतीने रमेश तिसऱ्या फेरीमध्ये जवळजवळ बादच झाला पण पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी म्हटलेल्या चांगल्या गाण्यामुळे आता युगल गीताची संधी त्याला पण देण्यात आली. रमेश ने आणि राणी ने उडत्या चालीवर असलेलं .

“तू चीज बडी है मस्त मस्त” हे गाणं म्हंटलं त्याच्यामध्ये राणी चा आवाज जरा कडकच लागत होता त्याच्यानंतर सौरभ आणि रश्मी ची पाळी आली

त्या दोघांनी मस्त पणे," इशारो इशारो मे दील लेने वाले " हे गाणं समरसून म्हटलं.

त्यांच्या गाण्यावर ती सगळ्या मुलांनी सुमधुर ठेका धरला. गाणं ऐकून मच्छर च्या गालावर उगीचच लाली चढली खरं म्हणजे रेश्मा त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती. श्रीनी आणि लबुनी पण आपल्या आपल्या मैत्रिणींच्या जवळ सरकून गाण्याला प्रेमभराने साथ दिली.


अशा रीतीने चौथ्या वर्षांनी गायनाची स्पर्धा पण जिंकली आणि कल्चरल फेस्ट ची ट्रॉफी चौथ्या वर्षाचा होस्टेलवर मिरवत मिरवत आणली.

त्या दिवशी बटाटेवडेनी चौथ्या वर्षाला स्पर्धा जिंकून दिली होती.

जसे निवडणुकीच्या वेळेला राहुल आणि पार्टीने मुलांना मतदानच करू दिले नाही तसेच आणि तोच डाव श्रीनी त्यांच्यावरच उलटवला. गाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा वरताण गाणे म्हणण्यापेक्षा त्याला गाणे म्हणू दिले नाही तर !

आणि तो डाव बटाटेवडे आणि श्रीनी जिंकला.

आज:

आणि गेट टुगेदर चा शेवट मस्तपैकी तोंडाला पाणी सुटणारया चमचमीत सोनेरी गरम बटाटेवडे आणि थंडगारआईस्क्रीम ने झाला, मुलांच्या मनात परत कॉलेजचे दिवस आनंदाने रुंजी घालू लागले, एक वेगळेच चैतन्य एक नवीनच तारुण्य घेऊन चौथ्या वर्षाच्या बेचने एकमेकांच्या गळ्यात पडून निरोप घेतला,परत आपल्या आपल्या घरी जाताना एकमेकांना वचन दिले परत भेटण्याचे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy