Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

नासा येवतीकर

Crime

3.9  

नासा येवतीकर

Crime

चोरी

चोरी

3 mins
1.4K


संजय दहा बारा वर्षाचा पोरगा. त्याचे बाबा शहरात मिळेल ते काम करून आपला संसार चालवत होता. त्याला सुरेश आणि विमला नावाची एक मुलगी होती. संजय आई देखील मिळेल ते काम करून पोट भरायचे. विमला आणि संजय एकाच शाळेत शिकत होती. तो पाचव्या वर्गात तर विमला पहिल्या वर्गात शिकत होती. आपली मुलंसगीकून मोठी व्हावीत, आमच्यासारखं त्यांना कष्ट सोसायला नको म्हणून ते त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होती. ते दोघे एकही दिवस शाळा बुडवत नसत. मात्र संजयला एक वाईट सवय होती. लहानपणापासूनच तो घरात देखील आई बाबांच्या नकळत पैसे चोरायचा. आता लहान आहे म्हणून एक दोन वेळा त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. तो शाळेत आला तसा वर्गातल्या मुलांच्या दप्तरातील वस्तू गायब होऊ लागले.

पण चोरी कोण करतोय हे कोणालाच कळत नव्हते. कोणाची पेन्सिल, पेन, तो चोरी करू लागला. एके दिवशी त्याच्या हाताला वर्गातील मुलांच्या कंपासमध्ये दहा रुपये भेटले. त्याने कंपासमधील पैसे चोरले आणि कंपास तसेच बॅग मध्ये ठेवून दिला. त्यादिवशी शाळेत खूप कल्ला झाला पण चोर काही सापडला नाही त्यामुळे तो वाचला. तो चोरी करण्यासाठी रोजनामी शक्कल लढवायाचा. सकाळी सकाळी शाळेत परिपाठ चालू असताना हा पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय म्हणून वर्गात बसायचा आणि मुलांच्या दप्तरातील वस्तू चोरायचा. कारण तेथे त्यावेळी कोणी येत नसत. कधी कधी दुपारच्या सुट्टीत सर्व मुले जेवायला बसले की हा काही तरी कारण सांगून वर्गात राहायचा. तसा तो अभ्यासात चांगला होता त्यामुळे कधी ही त्याच्याकडे संशयाची सुई फिरली नव्हती. त्याला वस्तू चोरण्याची चटकच लागली होती. शाळेच्या मुख्याध्यापकानी स्पष्ट सूचना दिली की, बॅगमध्ये वह्या पुस्तकाशिवाय काही ही ठेवायचे नाही. तेंव्हापासून त्याला चोरी करायला काहीच मिळत नव्हते. शाळेत नव्यानेच मॅडम रुजू झाले होते. त्यांना योगायोगाने पाचवा वर्गच देण्यात आला. शाळेच्या दुसऱ्याच दिवशी मॅडमच्या पर्समधून सहाशे रुपये गायब झाले होते. परिपाठ संपल्याबरोबर मॅडमच्या लक्षात आले. त्यांनी मुख्याध्यापकाना तसे कळविले. सर्व मुलांची चौकशी झाली पण चोरीचा काही पत्ता लागला नाही.

दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी सोमवारी शाळा भरली आणि चोराचा पत्ता लागला. त्याच वर्गातील एका मुलाने मॅडमचे पैसे कुणी चोरले आहेत ? याची माहिती मुख्याध्यापकास दिली. लगेच संजयला ऑफिसात बोलावून घेतले. त्याच्या वडिलांना ही फोन लावण्यात आले. थोड्याच वेळ त्याचे वडील ही शाळेत आले. संजयला त्याने केलेल्या चोरीच्या कृत्यासाठी खूप मोठी शिक्षा करण्याची परवानगी त्याच्या वडिलांकडून मिळाली. काय करावं? हा खूप मोठा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकासमोर पडला होता. शिक्षा करून त्याचे जीवन बरबाद करण्यात काही अर्थ नाही म्हणून मुख्याध्यापकानी त्याला समजावून सांगून सोडून दिले आणि रोज त्याच्या वागण्यावर लक्ष देत राहिले. काही दिवस लोटले असतील एके दिवशी खुद्द संजय मुख्याध्यापकाजवळ आला आणि म्हणाला, ' सर हे पॉकेट मला शाळेच्या मैदानात सापडले आहे. ' सरांनी पॉकेट उघडून पाहिले त्यात पाचशे रुपयांच्या दहा नोटा होत्या. तसेच त्यात त्या माणसाचे ओळखपत्र देखील होते. सरांनी ते पॉकेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पॉकेट जमा केले. पोलिसांनी त्याची नोंद केली. दुसऱ्या दिवशी सरांनी परिपाठमध्ये संजयने प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल शाबासकीची घोषणा केली. त्याच दरम्यान शाळेत एक अनोळखी व्यक्ती आली आणि पॉकेट दिल्याबद्दल सरांचे आभार मानू लागले. त्यावेळी सरांनी आभार माझे नाही या संजयचे मानायला हवे असे सांगितले. तेंव्हा त्या व्यक्तीने संजयचे कौतुक तर केलेच शिवाय प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून शंभर रुपये देऊ केले. ते शंभर रुपयांची नोट हातात घेतांना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्याने लगेच सरांचे पाया पडण्यास खाली वाकला. सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आयुष्यात कधी ही चोरी करणार नाही ही सरांना दिलेली शपथ त्याने आयुष्यभर पाळले.


Rate this content
Log in

More marathi story from नासा येवतीकर

Similar marathi story from Crime