चंदन
चंदन
काही काही वेळा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात म्हणून आयुष्य रेटलं जातं. आनंद, हर्ष, उत्साह ह्याचा गंध ही नसतो एखाद्याच्या आयुष्याला..आपण च कुणासाठी तरी आधार असतो, म्हणून धीराने जगावं लागतं आयुष्य अगदी असंच होतं मधु च आयुष्य, झिजणं तेही फक्त इतरांसाठीच. कोणी गोड शब्द बोलेल तिच्याशी तर शप्पतच! सावत्र आई असल्यामुळे आईचं प्रेम तिला कधीच मिळालं नाही, पोरीची आबाळ होऊ नये म्हणून बाबांनी तिच्या दुसरं लग्न केलं खरं, पण पोरीचे हाल च झाले त्यामुळे, बाप बिचारा दिवसभर कामासाठी बाहेर जाणार त्यामुळे ही सावत्र आई पोरीशी कशी वागायची हे कधीच तिच्या वडिलांना कळलं नाही,आणि आई तिच्याशी वाईट वागते हेही तिने बाबांना सांगितलं नाही,कारण बाबांना त्रास होऊ द्यायचा नाही हेच तिच लक्ष होतं.. सावत्र दोन बहिणी तिच्या, त्याही अगदी आईच्याच वळणावर गेलेल्या. काम मधु करायची आणि ह्या बहिणी निवांत बसून रहायच्या...जेमतेम 16 वर्षाची मधु पण चाळीशीच्या स्त्रीसारखा समजूतदार पणा होता तिच्या अंगी..तिच्या सावत्र आईने तिचं लग्न उरकून टाकलं तेही तिच्या वयापेक्षा फार मोठा असलेल्या मुलाशी,गेली एकदाची पीडा म्हणून आई ला खूप आनंद झाला..मधूला मनोमन असं वाटलं होतं की लग्नानंतर तर सुख लाभेल पण कुठलं काय तिथेही कोणालाच तिची पर्वा नव्हती ...खरंच काही काही लोकांचं आयुष्य चंदनासारखं झिजण्यात जातं नाही!
