चाहूल
चाहूल


टकटक टकटक...
ए पक्या. अरे ए पक्या उठ मरे. अरे तो आबा गेलो मरे. आता खय चार वाजलेले. आणि बाळग्याच्या आरडान बाजूचो अण्णा पण जागो झालो.अरे काय रे झाला असा अरे रात्रीचं तर बरो बोला हुतो मरे. - पको बोललो.आबाचा नाव ऐकान पक्याचो बारको झील जागो झाालो. भळाभळा पोरगो रडाक लागलो. आबा रेे काय रे झाला देवा. खय रे गेलंस बेगीन तू. पक्याची बायल रडाक लागली. पक्या, बेगीन ये रे. सगळा यवस्थित करून मोकळा होउ या. - बाळगो बोललो. हुय रे इलय मी असो. चल तू पुढे - पको बोललो.
आबा - गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. गावात जितको आबाचो दरारो हुतो तितकोचं लळोपणं हुतो. आणि अचानक ह्यो माणूस हृदयाच्या झटक्यानं गेल्यामुुळे पुरो गाव हळहळलो. आबा समद्या गावचो आधारस्तंभ हुतो.
दुपारचे बारा वाजले. सराईन जळान गेला आणि रवली ती राख. दिस ढकलत हुते. गाव आता अधोगतीकडे वळलू होतो.
..............................
रात्रीचे बारा वाजले. रामगो आणि सोमगो दारूच्या अड्ड्यार. अड्डो त्येंचो गावच्या वडाच्या झाडाच्या खाली. अरे ये रामग्या. अरे ये सोमग्या. रातर झाली नाय तुमची??. काजिवल्याच्या आवाजात आबाचो तो आवाज ऐकानं दोघेपण लई बिथरले आणि आबान साद दिल्यान करतं आरडतंं सुटले.ही एक रात्र. आता दुसरी गोष्ट ऐका -
तन्मयान झोपेचं आवाज दिलो - आऐ गे आऐ माका मुताक झाला. आवस झोपेतचं कशी बोलता-अरे सोन्या, कढी काड आणि जा मरे. तन्मय आपलो गेलो एकटोचं पेळेर. तितक्यात आवाज इलो पकल्याच्या बायले, पोराक एकटोचं असो धाडतसं? थांबचं तूू आता. आबाांच्या आवाजाबरोबर ती दचकानं उठली. माफ करा चुकलंय मी आबा. ह्या बघा असा जातंय.
आता इचार करतायं मा तुम्ही? मेलेलो आबा परत खयसून इलो? माणूस शरीर सोडून जाता पण तेचो आत्मा हयंचं रवता. तसो आबापण गावाकडे आजपण लक्ष देताहा.
अशीच ती चाहूल - एका अस्तित्वाची...