STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance Tragedy

4  

ऋतुजा वैरागडकर

Romance Tragedy

बोचणारा पाऊस भाग 9

बोचणारा पाऊस भाग 9

5 mins
543

बोचणारा पाऊस...भाग 9

अभिज्ञाचं बोलणं अभिराजच्या मनाला लागलं. त्याला त्रास झाला आणि तो तिथून निघून गेला.

अभिज्ञा फ्रेश होऊन बाहेर आली, तिला अभिराज कुठेच दिसला नाही, तिला वाटलं कुठेतरी असेल. तिने लक्ष दिले नाही आणि ती झोपून गेली.


सकाळी तिला जाग आली, तिने बघितलं तेव्हा अभिराज तिथे नव्हता. वॉकला गेला असेल हा विचार करुन तिने लक्ष केलं नाही. किचनमध्ये गेली चहा घेतला त्यानंतर तिने बराच वेळ वाट बघितली. एक तास झाला, दोन तास झाला, तीन तास झाले अभिराज घरी आलाच नव्हता आणि त्याचा फोन लागत नव्हता. आता अभिज्ञाला त्याची काळजी वाटायला लागली. तिने घरी विचारलं सगळ्यांना.


“आई तुम्हाला अभिराज दिसला का?” अभिज्ञा


“नाही ग, सकाळपासून मलाही दिसला नाही.” सासूबाई


“काका तुम्हाला अभिराज दिसला का?” अभिज्ञा


“नाही, कुठे गेला असेल हा?” चुलत सासरे


“मला काल रात्री दिसला नाही, मला वाटलं गेला असेल बाहेर शतपावली करायला. मग मी झोपले, सकाळी उठून बघितलं तर तेव्हाही नाही दिसला. मला वाटलं वॉकला गेला असेल किंवा ऑफिसच्या कामाला कुठे विचारपूस करायला मित्राकडे गेला असेल, येईल थोड्यावेळात असं वाटलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागली.”अभिज्ञा

“अभिज्ञा तुमच्यामध्ये भांडण वगैरे तर नाही ना झालं.” सासूने विचारलं.


हे ऐकून अभिज्ञा गप्प राहिली.


“काय ग भांडण तर नाही ना झालं?” सासूबाईने परत विचारलं


“नाही, भांडण नाही पण थोडा वाद झाला होता, म्हणजे वाद नाही म्हणता येणार पण थोडं बोलणं झालं आमचं तुटक-तुटक.” अभिज्ञा अडखळून बोलली.”


“तू खूप बोलली असणार त्याला म्हणून तो घर सोडून निघून गेला.”सासूबाई

“काय? नाही आई मी खूप नाही बोलले. फक्त नोकरीचा विषय निघाला बाकी काही नाही.” अभिज्ञा


“हम्म काढला ना नोकरीचा विषय, तोच तो विषय सतत काढू नये, त्यावर वारंवार बोलू नये इतकही तुला कळत नाही.” चुलत सासू बोलल्या.


“नाही काकू, मी काही बोलले नाही त्याला.” अभिज्ञा



“तूच बोलली, तुझ्या बोलण्यामुळे तो घर सोडून गेला असेल.” सासु बाई तिला खूप बोलल्या.


अभिज्ञा खोलीत जाऊन रडत बसली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी अभिराज घरी परत आला नव्हता.


रात्री अकराच्या दरम्यान पोलिस घरी आले, त्यांनी आधी अभिराज बद्दल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या हातात असलेले पॅकेट दिले.

अभिज्ञाने लगेच तो पॅकेट हातात घेतला. त्या पॅकेट मध्ये अभिराजची घडी, त्याच्या गळ्यातलं लॉकेट होतं.


“हे तुम्हाला कुठे सापडलं?” अभिज्ञाने लगेच विचारलं.

“डेड बॉडी जवळ.” पोलीस

हे ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला.


“डेड बॉडी... डेड बॉडी.. कुणाची? कुणाची डेड बॉडी? कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही? आणि अभिराज कुठे गेला, आलाही नाही तो, काही सांगून गेला नाही. आता फोन नाही लागत नाहीये.” अभिज्ञा


“हे बघा आम्हाला फक्त एवढेच सामान सापडलेल आहे. एका व्यक्तीने त्याचा चेहरा ओळखला, त्याने इथला पत्ता दिला म्हणून आम्ही आलो. तुम्ही शहानिशा शहानिशा करायला आमच्या सोबत चला.” 



अभिज्ञा हादरली, तिथेच चक्कर येऊन पडली. सासरे आणि चुलत सासरे पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेले. तर अभिराज तेथे पडून होता.


पोलिसांच्या माहितीवरून अभिराजने आत्महत्या केली असावी. हे सगळे ऐकून सगळे शॉक झाले. डेडबॉडी घरी आणण्यात आली.


बॉडी घरी आणली तेव्हा अभिज्ञा बेशुद्धावस्थेत होती. तिच्या घरच्यांनी तिला शुद्धीत यायच्या आधीच अभिराजचा अंतिम संस्कार विधी केला.



काही तासांनंतर अभिज्ञा शुद्धीवर आली. तिने लगेच अभिराजच नाव घेतलं.


“अभि..अभि माझा अभिराज आला का?”

बाजूला कनिका बसलेली होती.

“वहिनी, आहे.. दादा आहे.. परंतु तू आराम कर. तुला आरामाची गरज आहे. तू बेशुद्ध झाली होतीस ना तर तुला विकनेस पण आलेला आहे. तू आराम कर वहिनी दादू आहे. आलाय घरी तो, येईल तुला भेटायला. तू प्लिज इथून उठू नकोस.” कनिकाच्या आवाजात अडखळलेपणा होता आणि तो अभिज्ञाला जाणवत होता.



“तू खोटं बोलतेस ना माझ्याशी? खोटं बोलतेस ना तू?” अभिज्ञा रडायला लागली.



“नाही वहिनी, मी खोटं बोलत नाही आहे.” कनिका


“सगळं खोटं.. मला आठवतंय इन्स्पेक्टर घरी आले होते. अभिराज बद्दल काहीतरी सांगत होते. काय बोलत होते पण..? त्याची डेड बॉडी सापडली? कुठे आहे तो? कुठे आहे? सांग ना अभि कुठे आहे?” आता अभिज्ञा ढसाढसा रडायला लागली.

कनिकाला तिची अवस्था बघवत नव्हती.

तिने तिला सगळं सांगितलं.


“वहिनी अग तू बेशुद्ध अवस्थेत होतीस ना तेवढ्या वेळात बाबा आणि काका दादूची डेड बॉडी घेऊन घरी आले आणि त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार देखील केला.



“नाही...” अभिज्ञा जोरात किंचाळली.


“ते असं कसं करू शकतात? त्यांनी मला का बघू दिलं नाही. नाही नाही खोटं बोलतेस ना तू? खोटं बोलतेस ना तू?”



“नाही वहिनी मी खोटं बोलत नाही आहे. दादू आता तुला कधीच दिसणार नाही. तुला दादू कधीच दिसणार नाही वहिनी.” असं म्हणून दोघीही ढसाढसा रडू लागल्या. अभिज्ञाला आता बरं वाटत नव्हतं, तिचा श्वास वाढलेला होता, कनिकाने पटकन तिच्याजवळ पाण्याचा ग्लास आणला.

“वहिनी पाणी पी, तुला बर वाटेल.”


“नको मला पाणी, मला माझ्या अभिराजला बघायचं आहे. परंतु तो असा कसा निघून गेला? त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो मला असा सोडून जाणार नाही, मग का गेला तो? मला माझ्या अभिराजला बघायचंय.”



“वहिनी प्लिज सांभाळ स्वतःला, दादू नाही आहे, तो तुला कधीच दिसणार नाही.”

अभिज्ञाने रडू रडू हाल केले. पण तिच्या घरचे तिच्या खोलीत एकदाही तिच्याशी बोलायला आले नव्हते की तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेले नव्हते. अभिज्ञा सतत रडत राहिली.


अभिज्ञाच्या मैत्रिणीला उर्वीला हे सगळं कळलं आणि ती अभिज्ञाला भेटायला आली. 


तिला बघताच अभिज्ञाचा बांध फुटला आणि तिच्या गळयात गळा टाकून रडायला लागली.


दोघीही खूप रडल्या, 


“अभिज्ञा शांत हो.”

दोघी बोलत असताना तिथे तिची सासू आली, 


“ही कलमूहिनी, हिच्या मुळे आज मला हा दिवस बघायला मिळत आहे, माझ्या मुलाचा जीव घेतला हिने.” अभिज्ञाची सासू चराचर बोलायला लागली.

“तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का?” उर्वी


“ये दीड शहाणे मला अक्कल नाही शिकवायची.”

“हम्म तुमच्या सारख्या लोकांसोबत बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही.”


“ये आमच्यासारखी म्हणजे?”


उर्वीने न ऐकल्यासारखं केलं.


“अभिज्ञा मी निघते, काळजी घर स्वतःची. आणि काही लागलचं तर फोन कर.” असं म्हणून उर्वी तिथून निघून गेली.


काही वेळाने अभिज्ञाची सासूही गेली.


अभिज्ञा खिडकीजवळ एकटक त्या चंद्राकडे बघत होती. अभिराजच्या आठवणीत तिचा जीव जळत होता. राहवून राहवून तिचे डोळे भरून येत होते. बराच वेळ बसल्यानंतर तिथेच तिचा डोळा लागला.


सकाळी जाग आली, खोलीतून बाहेर आली. सगळ्यांनी तिच्याकडे बघून नाक मुरडलं, मान फिरवली.


“वहिनी, अग तू बस ना. मी चहा आणते तुला.”कनिकाने तिला बसवलं


“ये वहिनीची चमची, चल तू तुझ्या कॉलेजची तयारी कर, तिला लागेल तर ती स्वतः बनवून घेईल. कुक्कुळ बाळ नाही ती.” अभिज्ञाची सासू बोलली.


अभिज्ञाने सगळं निमुटपणे ऐकलं आणि खोलीत गेली. तिला काही करण्याची इच्छा नव्हती. खोलीत बराच वेळ पडून होती. 

दाराची बेल वाजली, तिच्या सासूने दार उघडला. समोर कुरीयर मुलगा होता



“काय आहे,आम्ही काही मागवलं नाही.”


त्याने नावाची पुष्टी केली. 

“मी बरोबर पत्त्यावर आलोय. तुम्ही बोलवा त्यांना.”

“हो बोलावते ना, वरतून येईल तो” ती समोर काही बोलणार तिथे अभिज्ञा आली.

त्याने अभिज्ञाकडे बघताच

“मॅडम तुमचं पार्सल, सर बोलले होते कुणाच्याच हातात द्यायचं नाही,यात खूप महत्वाची वस्तू आहे.”

त्याच सगळं एकूण अभिज्ञा भावुक झाली आणि निघून गेली.


क्रमशः






Rate this content
Log in

Similar marathi story from Romance