STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

4  

ऋतुजा वैरागडकर

Romance

बोचणारा पाऊस भाग 7

बोचणारा पाऊस भाग 7

5 mins
372

बोचणारा पाऊस...भाग 7

आधीच्या भागात आपण पाहिले की, अभिज्ञाला काही गोष्टी कनिकाकडून माहीत झाल्या. 

अभिज्ञाने अभिराजला जाब विचारला, त्याने सत्य परिस्थिती सांगितली. त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगितलं. अभिज्ञाने त्याच्याकडून प्रॉमिस घेतलं की तो काहीतरी काम करेल असा रिकामा बसणार नाही. अभिराजने पहिल्या दिवशी दोन तीन ठिकाणी प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. तो तिला न्यायला आला, दोघांनी वाटेत आईस्क्रीम खाल्ली, अभिज्ञाचे डोळे पाणावले.


आता पुढे, 


अभिज्ञा भावुक झाली, तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून अभिराजने विचारलं.


“काय झालं अभिज्ञा? तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? अभि अग मी प्रयत्न करतोय ना, तू असंच वागणार आहेस का माझ्याशी?”


“माझ्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू नाहीत. इथेच मी आर्यन सोबत आईस्क्रीम खायला यायचे. आज पुन्हा इथे आले ना म्हणून आर्यनची आठवण आली. त्याच्या आठवणीचे अश्रू आहेत.”


“सॉरी.”

“अरे इट्स ओके.”


दोघेही घरी गेले.

रात्री अभिज्ञाने उर्वीला कॉल केला. अभिराज असं का वागला हे तिला सांगितलं.


“अभिज्ञा तू त्याच्या आई बाबांशी या विषयावर का बोलली नाहीस.” उर्वी


“उर्वी अग मी त्यांना काय विचारू?आणि कसं विचारू? त्यांना बोलूनही काय अर्थ ग? मला असं वाटतं अभिराजने स्वतःच्या पायावर उभ राहावं.” अभिज्ञा


“होईल सगळं नीट,तू काळजी करू नकोस, चल भेटू उद्या. बाय.” उर्वीने फोन ठेवला.

अभिज्ञा फोनवर बोलून येईस्तोवर अभिराज झोपलेला होता.


सकाळी नाश्ताच्या टेबलवर अभिज्ञाने अभिराज समोर पुन्हा विषय काढला.

अभिराजकडे बघून,


“आज जाणार इंटर्व्हिएवला?”

“बघतो.”

“बघतो नाही, तुला जावं लागेल. एक दिवस गेल्याने काही होत नाही. नोकरी अशीच मिळत नाही, खुप प्रयत्न करावे लागतात.”


अभिराज वैतागून

“जातो ग, उगाच किटकीट करू नकोस.”


“तू वैतागून का बोलतो आहेस?”


“मी वैतागून बोलत नाही आहे. पण मी आज नाही जाणार, उद्या बघतो.”

असं म्हणून तो नाश्ता करता करता उठला.


“सुनबाई का त्याला त्रास देत असतेस? तो म्हणतो ना जाईल तर जाईल.” माधवी


“पण आई आपण जर त्याला असच पाठीशी घालत राहिलो ना तर तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही.” अभिज्ञा


“सुनबाई ती बोलते ते बरोबर आहे, तू त्याच्या मागे लागू नकोस.” अभिराजचे बाबा


अभिराज उठून आत गेला, मागोमाग अभिज्ञा पण गेली.


“काय चाललंय अभिराज?”

“काहीही नाही, पण मला आज जायचं नाही आहे.”


“तू हट्ट करतो आहेस.”

अभिराज अभिज्ञाच्या जवळ आला, तिचा हात हातात घेतला. तिच्या गालाच चुंबन घेतलं.

“तू जा आता, मी तुला न्यायला येतो.”


अभिज्ञा शांत झाली आणि ऑफिसला गेली.

संध्याकाळी अभिराज मित्रांसोबत दारु पिऊन घरी आला.

त्याला या अवस्थेत बघून अभिज्ञाचं डोकचं फिरलं.

तिचा राग डोक्यात गेला.

“हाय डार्लिंग.”तो अगदी तिच्या जवळ आला.

तिने त्याला दूर केलं 

“तू दारु पिऊन आलास?”

“नाही ग जानू, माझी डार्लिंग. मी दारूला हात सुद्धा लावत नाही.”


“अभिराज आता गप्प झोप, मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. उगाच मला वाद घालायचा नाही आहे.”


तो बेड वर पडला आणि लगेच झोपला देखील.

अभिज्ञाने त्याच्या पायातले शूज काढले आणि त्याला व्यवस्थित झोपवलं.

ती मात्र विचार करत राहिली.


“काय झालं माझ्या जीवनाचं? काय काय घडतंय माझ्या आयुष्यात काहीच कळत नाही आहे. काहीच चांगलं घडत नाही आहे. आधी आर्यन मला सोडून गेला. आणि आता हा अभिराज, हा तरी असा का वागतो आहे?” अभिज्ञा विचाराच्या गर्तेत अडकली.


रात्रभर ती विचार करत बसली. पहाटे तिला झोप लागली.

ती झोपली असताना अभिराजने तिच्या ओठाची किस घेतली, तशी ती उठून बसली.


“अभिराज वेडा आहेस का तू? दचकली ना मी.”

“गरमागरम कॉफी, पटकन फ्रेश हो आणि कॉफी घे.”


आज पहिल्यांदा अभिराज तिच्यासाठी कॉफी घेऊन आला होता. त्यामुळे तिला छान वाटलं होतं.


ती फ्रेश झाली, ऑफिसला गेली.

रोज ऑफिसला जाणे, येणे तिचं रुटीन झालं होतं.

दिवस भराभर समोर सरकत होते.

दोन महिने होऊन देखील अभिराजला नोकरी मिळाली नव्हती.

आता अभिज्ञाची चिडचिड व्हायला लागली होती.

ती कधी कधी त्याला खूप बोलायची.

तिला असं बोलताना बघून एक दिवस तिची सासू बोलली.

“का इतकं बोलतेस ग त्याला? मिळेल त्याला नोकरी.”

“आई त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. आता तुम्ही त्याची बाजू घेताय. उद्या जाऊन तुम्हीच मला बोलाल की तुझा नवरा तर रिकामटेकडा आहे, काहीच कमवत नाही.”

दोघीमध्ये वाद होतो आणि दोघीमध्ये अबोला होतो. दोघीही एकमेकींशी बोलत नाहीत.


अभिराजला हे सगळं आवडत नव्हतं, पण त्याला घरात वाद नको म्हणून तो गप्प असायचा. त्याच अभिज्ञावर खूप प्रेम होतं, आणि म्हणून तो तिला काही बोलायचा नाही.

बघता बघता लग्नाला सहा महिने झाले.

अभिज्ञा आणि अभिराजच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर फुलायला लागला.

अभिज्ञा आई होणार आणि अभिराज बाबा, या बातमीने अभिराज खूप आनंदी झाला.

“तू खरच सांगते आहेस?” अभिराज

तिने होकारार्थी मान हलवली.


त्याने तिला वर उचललं आणि गोल गोल फिरवलं.

“अभिराज बस कर, मला चक्कर येईल.”


त्याने तिला खाली उतरवलं.

“मी तुला सांगू शकत नाही आहे, मला किती आनंद झाला आहे.” त्याने तिला घट्ट मिठी मारली.

“आय एम सो हॅपी अभिज्ञा.”

दुसऱ्या दिवशी दोघेही चेकअप गेले.

डॉक्टरने तीन महिने पूर्णपणे आराम सांगितला.

“पण डॉक्टर मी जॉब करते. मला तर रोज जावं लागेल.”


“हे बघ अभिज्ञा, तुझी पहिली वेळ आहे आणि तुझं गर्भ नाजूक वाटत आहे, उगाच काही कमी जास्त नको व्हायला म्हणून मी तुला पूर्णपणे आराम करायला सांगते आहे. सुरुवातीचे तीन महिने आराम कर त्यांनतर तू तुझा जॉब कॉन्टिनुए करू शकतेस.”


“डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, हिची संपूर्ण जबाबदारी माझी. मी हिची काळजी घेईन, कसलाच त्रास होऊ देणार नाही.” अभिराज पटकन बोलला.


दोघे घरी आले, घरी आनंदाची बातमी सांगितली. सगळे खूप आनंदित झाले.


न बोलणाऱ्या सासूने पण तिला आशीर्वाद दिला. तिची दृष्ट काढली.

पण नंतर त्यांना कळलं की अभिज्ञा ऑफिसला जाणार नाही आहे. आता तीन महिने तरी ती घरीच आराम करणार आहे. या गोष्टीने सगळ्यांचे हावभाव आणि वागणूक बदलली. कनिका तेवढी बरी वागायची.


सकाळी सगळे नाश्ता करायला एकत्र बसले.

अभिराज आणि अभिज्ञा पण बसले.

नाश्त्याला उपमा बनलेला होता.

अभिज्ञा अभिराजच्या कानात हळूच बोलली.


“अभि मला उपमा खायची इच्छा होत नाही आहे. दुसरं काही आणून देशील?”

“काय खाणार आहेस?”

“अअअअ, काहीतरी चटपटीत खावसं वाटत आहे.”

“ओके आपण एक काम करू, बाहेर जाऊया मग तुला जे हवं ते तू खा.”

ती लगेच आनंदी झाली.

बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या वाहिनीने टोमणा मारला.

“बघा सासूबाई, बायकोचे कसे चोचले पुरवले जात आहेत. आता हिला घरचा नाश्ता नको, बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं आहे. बाहेर जायला आणि काही खायला पैसे खर्च करावे लागतात याची आठवण करून द्यावी लागेल यांना. आता ही तीन महिने घरीच राहणार, म्हणजे तीन महिण्याचा पगारही मिळणार नाही, यांचा खर्च कसा चालणार. आतापर्यंत आपण याचे चोचले पुरवले आणि याच्या बायकोचेही पुरवावे लागतील.”


वहिनीचं बोलणं ऐकून अभिज्ञाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अभिराजच्या लगेच लक्षात आलं, त्याला बघवलं नाही. तो लगेच वहिनीला बोलला.

“वहिनी अग काय बोलतेस तू?”

“काय खोट बोलत आहे?”

अभिज्ञा रडत उठून खोलीत गेली.

तो ही तिच्या मागे मागे गेला.

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance