STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

4.2  

ऋतुजा वैरागडकर

Romance

बोचलेला पाऊस भाग 1

बोचलेला पाऊस भाग 1

5 mins
484

“हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नांची सरबत्ती

मी काय खुलासे करू नभाला इतकी भिजल्यावरती

रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती

माझी सल ऐकाया कुणी नाही सोबती.”


त्याच्या कवितेच्या ओळी आठवताना तिला खूप भरून आलं.

पावसात ओलिचिंब भिजलेली ती... 

काळोखी रात्र, गडगडणारे ढग, कडाडणाऱ्या विजा कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती.  

बेभान रस्त्याने चालली होती.

अंगावरचे कपडे भिजलेले, ओलेचिंब केस मोकळे सोडलेले, तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पावसांच्या सरींनी तिचे अश्रूही लपलेले. बेभान चालत सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली, अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

अभिज्ञा, पंचवीस वर्षाची तरुणी. ऐन तारुण्यात विधवा झालेली.

दोन वर्षांपूर्वी...


अभिज्ञा आणि आर्यन एकाच कॉलेजला होते. कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला. सुदैवाने दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. दोघांचं रोज भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. दोघांची हळूहळू मैत्री झाली, दोघे खूप बेस्ट फ्रेंड झालेत. एकमेकांशी सगळं शेअर करू लागले.

आर्यनच्या मनात अभिज्ञा बद्दल वेगळी फिलिंग यायला लागली. त्याला सतत अभिज्ञा जवळ राहावंसं वाटत होतं. सतत तिच्याशी बोलावसं वाटतं राहायचं. त्याने हे सगळं त्याच्या मित्रांशी शेअर केलं. त्याचे मित्र बोलले तू तिच्या प्रेमात पडलास, आर्यनला खरं वाटत नव्हतं पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं. एक दिवस त्याने ठरवलं, तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं.


एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन अभिज्ञा जवळ जाऊन,


“हाय अभिज्ञा.” 


“हाय.”

“अभिज्ञा मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.” आर्यन अडखळत बोलला.

अभिज्ञाने थोडं आश्चर्य व्यक्त करत,


“बोल ना.”

“नाही, इथे नको. आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचं? प्लिज.”


“असं काय बोलायचं आहे तुला, इथेच बोल ना. आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईल रे.”


“अभिज्ञा नाही होणार वेळ, पक्का प्रॉमिस. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार.”


खूप वेळानंतर अभिज्ञा तयार झाली.


दोघेही ऑफिस सुटल्यानंतर हॉटेल मध्ये भेटले. आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता.

दोघांचं हाय हॅलो झालं. अभिज्ञाने बोलायला सुरुवात केली.


“बोल आर्यन तुला काय बोलायचं होत?”

“अभिज्ञा तू मला कॉलेज पासूनच ओळ्खतेस, माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे, आपण रोज भेटतो, बोलतो. आपल्यात छान मैत्री आहे.” थोडं थांबून आर्यन पुन्हा

“आपल्यात मैत्री आहे ना?” आर्यनने हसून विचारलं. तशी अभिज्ञा पण हसली.

“अभिज्ञा माझी जीवनसंगिनी बनशील का?” आर्यन तडक तिला विचारलं.

“काय?” अभिज्ञा


“माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील?”


“आर्यन काय बोलतोयस?”


“हो, खरं तेच बोलतोय. मला सतत तुझ्याशी बोलावसं वाटतं, सतत तुला बघत राहावंसं वाटतं. तुझ्यासोबत वेळ घालवावासा वाटतो. सतत सोबत तू असावीस असंच वाटतं. आता तूच सांग हे प्रेम नाहीतर काय आहे?”


अभिज्ञा काहीही न बोलता तिथून निघाली. ऑटो साठी स्टॉप वर थांबली. आर्यन तिच्या मागे मागे गेला. 

“अभिज्ञा काहीही न बोलता कशी काय जाऊ शकतेस? बोल काहीतरी.”


तरीही अभिज्ञा गप्पच.

अभिज्ञा तिथून चालत चालत निघाली, थोडया समोर जात नाही तर पावसाची सुरुवात झाली. पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली. रस्ता निर्जन झाला.


अभिज्ञा पूर्ण ओली झाली तरीही थांबली नाही.

आर्यन: अभिज्ञा थांब, थांब ग. माझं पूर्ण सगळ ऐकून घे. 

आर्यनने अभिज्ञाचा हात पकडला.

“आर्यन हात सोड.”

“अभिज्ञा बघ हा पाऊसही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. हे मेघ, ह्या पावसाच्या सरी, हे ढगाळलेले वातावरण सगळं प्रेमा सोबत आहेत.” 


“आपल्या नाही, फक्त तुझ्या.” अस म्हणत ती पुन्हा निघाली.


पण आर्यन तिथून हलला नाही, संध्याकाळची रात्र झाली आर्यन तिथेच उभा होता, मुसळधार पाऊस सुरूच होता.


बऱ्याच रात्री अभिज्ञाचा फोन वाजला. तिला वाटलं आर्यन असेल म्हणून तिने बघितलंही नाही.

पुन्हा वाजला, बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता.

अभिज्ञा बोलली, तेव्हा तिला कळलं की आर्यन घरीच आलेला नाही आहे. 

अभिज्ञाने खिडकीतून डोकावलं तर पाऊस सुरूच होता.

ती घाबरली आणि तशीच धावत सुटली.

अभिज्ञा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता.

“आर्यन तू वेडा आहेस का? तू इथे का उभा आहेस? चल घरी,सगळे तुझी वाट बघत आहेत, तुझा फोन लागत नव्हता,सगळे काळजी करत आहेत, चल.” अभिज्ञाने आर्यनचा हात पकडला, तसा त्याने तिचा हात झटकला.

“मी कुठेही येणार नाही आहे, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, मी इथून हलणार नाही.”

“आर्यन यु आर क्रेझी.”

“हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आता हाच पाऊस माझ्या मरणाचाही साक्षीदार असेल.”

असं आर्यन बोलताच अभिज्ञाने त्याच्या ओठावर बोट ठेवला.

“का असं वागतो आहेस?” असं म्हणून ती त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठी मारली.

दोघांची मन जुळली आणि शरीरही. त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता तो म्हणजे पाऊस.

दोघांचं प्रेमाचं नातं बहरत गेलं, फुलत गेलं. घरच्यांच्या परवानगीने, देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं.


सुरुवातीचे दिवस छान गेले. दोघेही हनिमुनला गेले. मन जुळली होती, आता शरीरही एक झाले. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले. दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केलं.


दोघेही एकत्र जायचे, एकत्र यायचे. ऑफिसमध्ये पण छान चाललेलं होतं.


रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिज्ञाला आवरत पर्यंत खूप उशीर व्हायचा, कधी कधी आर्यन चिडतही असे.


“काय ग अभिज्ञा किती उशीर करतेस? किती वाट बघावी लागते?”


“सॉरी ना जानू, अरे आवरता आवरता होतो उशीर.” अभिज्ञा लाडात येऊन त्याच्या जवळ जाऊन बसली, त्याच्या हात तिने तिच्या खांद्यावर ठेवला.

“एक दिवशी तुला सोडून जाईल ना नेहमीसाठी, तेव्हा तुला माझी किंमत कळेल. मग एकटीच राहशील किचनचं काम आवरत.” आर्यन थोडा चिडला.


“तुला कितीदा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नकोस.”

ती पुन्हा त्याच्या जवळ गेली. ती त्याचा हात तिच्या गालावरून फिरवायला लागली. हळूहळू ओठांवर ओठ आले, दोघांचंही भान हरपलं. ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती. 

दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दिवसभर काम करून परतीला निघाले. अभिज्ञाला आईसक्रीम खायची इच्छा झाली म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली. दोघांनी आईसक्रीम खाल्ली आणि काही क्षणात पावसाची रिपरिप सुरू झाली.

दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि गाडीत जाऊन बसले. आर्यनने गाडी स्पीडने काढली. पावसाचा जोर वाढला. अचानक वारा सुटला, रस्त्यावर अंधार पसरायला लागला. आर्यनला समोरच काहीच दिसत नव्हतं. त्याने स्पीड कमी केली पण गाडी कुठे जात होती काहीच कळत नव्हतं. काही वेळ त्याने गाडी थांबवली. 


पाऊस थोडा कमी झाला, आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. काही अंतरावर पूल होता. पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता. आर्यनने रपकन गाडी काढली, गाडी पुलावरून तर निघाली पण समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकली. आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला, अभिज्ञाचं डोकं आदळल.


अभिज्ञा जेव्हा शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला सगळे अनोळखी लोक होती. अभिज्ञा भिरभिर चहूकडे बघू लागली. तितक्यात तिथे डॉक्टर आल्या.

“आता कसं वाटतंय तुम्हाला?”

“डॉक्टर मी इथे कशी?” अभिज्ञा बोलता बोलता थांबली.


“तुमच्या गाडीचा अपघात झाला होता, तुमच्या डोक्याला मार लागलेला होता, काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं. हे बाजूला तुमचं सामान ठेवलंय.”


“आर्यन कुठे आहे? डॉक्टर आर्यन कुठे आहे?”


“कोण आर्यन?”

“माझा नवरा, आर्यन. तो माझ्यासोबत होता. आता कुठे आहे? डॉक्टर कुठे आहे?”

“सॉरी पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाही, पोलीस तपास करत आहेत.”

अभिज्ञा भांबावली,

“पोलीस..पोलीस..आर्यन..आर्यssन” अभिज्ञा जोरजोरात रडायला लागली.

आठ दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये होती, पण कुणीही तिला भेटायला आलेलं नव्हतं.

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance