बंदीवास
बंदीवास
"अगं संगिता आई कुठे आहे?"
दसऱ्याच्या दिवशी माहेरी सोनं देण्यासाठी आलेली प्रियांका अ़ंगणात रांगोळी काढत असलेल्या आपल्या वहिनीला विचारते. "ताई आईना शेजारच्या देसले काकुंकडे गेल्या आहेत, बराच वेळा झालाय. येतीलच एवढ्यात". "सोनं द्यायला गेली आहे का?"
" नाही हो ताई सोनं तर अजुन आणायचं आहे, हे गेलेत घ्यायला. देसले काकुंचं काही काम असेल. म्हणून बोलावुन घेतले त्यांनी..बाबा जरा फिरायला गेलेत तेवढ्यात जाऊन येते म्हणाल्या आई."
पाच ते दहा मिनिटात आई आली
" संगिता हे आलेत का गं ?". आई बाहेरुनच विचारत होती. "नाही गं आई नाही आलेत अजुन बाबा."
प्रियांका चा आवाज ऐकुन आई म्हणाली. "प्रिया तु कधी आलीस गं?" "हे काय आत्ताच आलीये."
"कशी आहेस तु? आणि बंटी कुठे आहे तो नाही आला का?" आई लेकीची विचारपूस करु लागली. " हो येणार आहेत ते दोघे नंतर. बंटी आणि हे पण."
"तुझी तब्येत बरी आहे ना? आणि बाबा कसे आहेत आता बि.पी. कमी झाले का त्यांचे?" प्रियांका आई बाबांची चौकशी करत होती.
आई- "कसलं कमी होतंय ते बि.पी. जेवढ्या गोळ्या खाल्ल्या तेवढं बरं वाटतं.. चालायचंच आता वयोमानानुसार हे सर्व."
प्रियांका - "काय म्हणत होत्या देसले काकु? बऱ्या आहेत का त्या? म्हणजे प्रकृती वगैरे?? सहजच गेली होतीस का तु?"
आई-"काय होतं गं त्यांना एकच मुलगा तो ही विदेशात चांगल्या पदावर. दोघे नवरा बायको आता रिटायर्ड झालेत. छान आरामाचे आयुष्य जगत आहेत.मनमोकळे पणा असला, मनस्थिती चांगली असली की,कुठलेच आजारपण नसते. साधी डोकेदुखी ची गोळी ही नाही त्या दोघांनाही. आताचचं बघ ना..
दोघेही जातायेत ट्रिप ला म्हणजे देवदर्शन साठीच जाताहेत. चारधाम यात्रेचे पॅकेज आले होते. आठ दिवसांसाठी दहा हजारात... खाणं, पिणं, रहाणं सर्व त्याच पैशात. तेच सांगण्यासठी बोलावले होते.त्यांनी मला .अजुन चार सीट आहेत म्हणाल्या. आंम्हांलाही दोघांना सांगत होत्या बुकींग करायला."
"मग करुन घे ना बुकींग.."
"आंम्ही सुद्धा हेच बोललो होतो आईंना..". संगिता ही प्रियांका च्या शब्दाला शब्द लावते.
"अगं माझ्या नशिबात कुठलं आलंय देवदर्शन, फिरणं,हिरणं पुर्ण आयुष्य गेलं माझं या घराच्या चार भिंतीत. तुझ्या बाबांचा स्वभाव तर माहितीच आहे ना तुला? आधी तर चांगले ठणठणीत होते.तेव्हा कधी चार दिवस माहेरी जाऊ दिले नाही तर आता या वयात काय घेऊन जाणार ते मला?? आता तर काय निमीत्तच आहे त्यांना ...मला शुगर आहे, बि.पी. चा त्रास आहे.वेळेवर गोळ्या औषधे घ्यावे लागतात.जेवण, नाश्ता सर्व वेळेवर लागते मला.बाहेरचे वातावरण पण आता मला सुट होत नाही..काय काय बहाने सांगतील ते ?"
"कमी वयातच लग्न लावून दिले आईबापाने नशीबी आला असा तापट स्वभावाचा नवरा.संसार तर जणु मला एक बंदीवासा वाटु लागला मला.. काही हौस नको, फिरणं नको की, कधी चांगल नटणं थटणं नको.. कायम आपलं घराच्या चार भिंतीत रहायचे. एखाद्या जेल प्रमाणे.. कधीतरी दोन वर्षांनी सणासुदीला माहेरी गेलेच तरी दोन दिवसांपेक्षा जास्त रहाण्याची परवानगी नसायची मला". "अशातच आयुष्य गेलं माझं पुर्ण आता तर काय सर्व इच्छाच मेल्या. आता तर माझ्या मनानेच स्विकारले आहे . " बंदीवासात मी या संसारी."
