नासा येवतीकर

Inspirational

2.0  

नासा येवतीकर

Inspirational

ब्लु व्हेल

ब्लु व्हेल

4 mins
2.0Kअभय आणि अनिता एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होते. त्यांना अभिमन्यू नावाचा एकुलता एक मुलगा होता. दोघे ही इंजिनियर होते आणि दुसरे अपत्य नको म्हणून त्यांनी एकच अपत्यावर ऑपरेशन देखील करवून घेतले होते. अगदी सुरुवातीच्या काळात त्या दोघांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले होते. दोघांच्या लग्नाला घरातून विरोध असल्यामुळे त्यांनी कोर्टात लग्न लावून घेतले होते आणि मुंबईमध्ये एका प्लॅटमध्ये राहत होते. त्यामुळे अभय आणि अनिता यांच्या घरच्यांनी देखील त्यांना भेट देत नव्हते. ते दोघे नोकरी करत करत घर सांभाळत होते. दोन वर्षानंतर त्यांच्या जीवनात अभिमन्यूचा प्रवेश झाला. तेंव्हा दोघांनाही खूप आनंद झाला. ही बातमी ऐकून तरी आई-बाबा भेटायला येतील असा त्यांना विश्वास होता मात्र कोणी ही भेटायला आले नाहीत, तेंव्हा त्यांना खूप दुःख वाटले. सहा महिन्यांच्या प्रसूतीची सुट्टी संपल्यावर अनिता परत जॉब करण्याचा विचार करत होती आणि अभय त्यास विरोध करत होता. मात्र अनिता काही ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. लहान अभिमन्यूला सोडून कसे जायचे ? हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. प्रत्येक समस्यांचे निराकरण होतेच तसे या प्रश्नाचे देखील निराकरण झाले. जवळच असलेलं पाळणाघर त्यांना पर्याय योग्य वाटला. दोघांनाही निर्णय घेतला की अभिमन्यूला जवळच्या पाळणाघरात ठेवायचे. अभिमन्यूला पाळणा घरात ठेवून दोघेही नोकरीला जाऊ लागले. अभिमन्यूला रविवार सुट्टीच्या दिवशी फक्त आई-बाबा सोबत मिळू लागली होती. अभिमन्यू आता तीन वर्षांचा झाला होता. त्याला पाळणाघरातुन प्ले ग्रुपच्या शाळेत टाकण्यात आले. तो दिवसभर त्या शाळेत खेळू लागला, जेवू लागला आणि थोडा वेळ झोप सुद्धा घेऊ लागला. त्यांचे रुटीन असेच चालू होते. आई-बाबापासून दूर राहणारा अभिमन्यू हळूहळू आक्रमक होऊ लागला. सुट्टीच्या दिवशी आई-बाबा सोबत कमी बोलू लागला. जसे जसे दिवस सरत होते तसेतसे अभिमन्यू अजून जास्त आक्रमक होऊ लागला. ते दोघे त्याचे खूप लाड करत होते. अनिता थोडेसे लवकर म्हणजे सायंकाळी सातला घरी येत होती तर अभयला घरी यायला रात्रीचे दहा वाजत होते. अभिमन्यू पहिल्या वर्गात प्रवेश करतेवेळी त्यांचे स्वतःचे प्लॅट झाले होते, घरासमोर आलिशान चारचाकी गाडी झाली आणि घरकामासाठी एक दाई देखील होती. अभिमन्यूची सर्व देखभाल आता घरीच केल्या जाऊ लागली. त्याला शाळेला जाण्यासाठी व येण्यासाठी स्कुलबस होती. दाई त्याला तयार करून शाळेत पाठवित होती आणि शाळेतून घरी आल्यावर तीच दाई त्याची काळजी घेऊ लागली. त्यामुळे अनिता आता रात्री उशिरा येऊ लागली. अभय देखील रात्री दहाच्या पुढे येऊ लागला. पुढे पुढे अभिमन्यूला हक्काचा रविवार देखील मिळेनासे झाले. महिन्यातून एखादा रविवार अभय आणि अनिता घरात दिसत होते.


त्याला एकट्याला घर खायला येत होते. शाळा, घर, अभ्यास आणि टीव्ही याच सान्निध्यात अभिमन्यू पहिली पासून दहाव्या वर्गापर्यंत पोहोचला होता. अभिमन्यू तसा हुशार होता. दहावीमध्ये त्याला चांगले मार्क मिळाले होते. त्याला आता कोणत्या दाईची गरज उरली नव्हती. मागेल तेवढं पॉकेटमनी आणि हवी ती वस्तू मागितल्याबरोबर त्याला मिळत होती. बाबांनी वचन दिल्याप्रमाणे दहावीत चांगले गुण घेतल्यास स्कुटी आणि मोबाईल अभिमन्यूला मिळाले. त्या दिवशी तो खूपच आनंदात होता. त्याचे कॉलेजचे दिवस सुरू झाले. कॉलेजला स्कुटीवर जाणे आणि रिकामा वेळ मोबाईलमध्ये घालविणे हे अभिमन्यूला बऱ्यापैकी जमू लागले होते. अबोल असलेला अभिमन्यू कोणालाही जास्त बोलत नव्हता. त्या घरात तीन सजीव असून देखील कधी एकत्र बसण्याचा योग आला नव्हता. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती, उणीव होती ती म्हणजे प्रेमाच्या मायेची. दिवसेंदिवस अभिमन्यू मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहू लागला. फेसबुक, व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम यासारख्या अँपने त्याला अक्षरशः वेडे करून टाकलं होतं.


यादरम्यान एके दिवशी अभय आणि अनिता यांनी अभिमन्यूला मानसोपचार डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी अभिमन्यूची काळजी घेण्याचे सांगितले होते. मात्र थोड्याच दिवसांत ते सारे विसरले होते. त्यातच त्याला कोणी तरी ब्लु व्हेल नावाच्या अँपची लिंक त्याच्या मोबाईलवर पाठविली होती. अभिमन्यूने लगेच ते अँप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतला आणि दिवसरात्र त्याच खेळात आपले डोके खुपसून राहू लागला. अभय आणि अनिताला याची भनक देखील नव्हती. त्याचे कॉलेजला जाणे देखील हळूहळू कमी झाले. त्याच्याकडे दोघांनाही वेळ नव्हता. आपल्या खोलीतच तो बंद राहू लागला. अभय आणि अनिता रात्री उशिरा येत होते. तोपर्यंत तो खाऊन झोपी जाऊ लागला. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. अभय आणि अनिता यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केले होते मात्र अभिमन्यू बाहेर येण्यास नकार दिला. तसे ते दोघेच बाहेर गेले. बाहेर फिरून बऱ्याच वेळानंतर ते परत आले. तर त्यांच्या घरासमोर लोकांची खूप गर्दी जमा झाली होती. गर्दीतुन रस्ता काढत अभय आणि अनिता पुढे जाऊ लागले. समोर गेल्यावर जे दृश्य दिसलं ते पाहून दोघेही थंडगार झाले. जमिनीवर एकाचा मृतदेह पडलेला होता, डोक्याला जबर मार लागलेला होता आणि रक्त वाहू लागला होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यूच होता. दोघांचेही काळीज पाणी पाणी झालं. लगेच अंब्युलन्स बोलावून अभिमन्यूला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून अभिमन्यू मृत झाल्याचं सांगितलं. त्याबरोबर अनिताने एकच टाहो फोडला. अभयच्या तोंडातून तर शब्द ही बाहेर पडत नव्हते. काही वेळात तेथे पोलीस आले. त्यांनी सर्व चौकशी केली. अभिमन्यू राहत्या प्लॅटवरील माळावरून उडी मारली होती. तो असा का केला याचा तपास पोलीस लावण्याचा प्रयत्न करीत होती. " अभिमन्यूकडे मोबाईल होता का ? " पोलिसांनी विचारल्यावर त्याचा मोबाईल पोलिसांना देण्यात आले. त्याचा मोबाईल चेक केल्यावर कळाले की, अभिमन्यू ब्लु व्हेल गेम खेळत होता आणि आज शेवटच्या गेमवर आला होता. म्हणूनच आज तो अभय आणि अनिताच्या सोबत बाहेर फिरायला जाणे टाळले होते. खरे कारण कळल्यावर दोघांनाही खूप पश्चाताप झाला. खरोखरच आपले चुकले, पैसा कमाविण्याच्या नादात पोटच्या लेकारकडे लक्ष देणे विसरून गेलोत म्हणत दोघेही जोरजोरात रडत होते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational