बळी
बळी
""मी कोण गं तुमची?
"""कोण म्हणजे ?तु अशी काय विचारते वहिनी""
"""का विचारू नको,काय नाही केल मी तुमच्या साठी""
""ते खर आहे परंतू त्याची पोच पावती मागतेस की""
""नाही पोचपावतीची गरज नाही...सरू अगं मंदिरातल्या देवाला फुल वाहीली की त्याच्या जवळ कुणी त्याला देवा तूला ती पोहचली का ?अस विचारून त्याची पोचपावती नाही ना मागत,,अगदि तसच मी केलेल्या कष्टाची पोचपावती तुमच्या जवळ मागणारच नाही...""ती मी ताईंजवळही मागीतली नाही..फक्त त्यानी माझ्यावर केलेल्या प्रेमाची मीपद्दतशिर पेचपावती देवूनही त्याची रसीट नाही घेतली....गं
"" मग आज अचानक अस काय झाल वहीनी की तू मला मी तुमची कोण ?असा सवाल केलास"""
"""करावा लागला सरू"""
"""पण का वहीनी ""
"""गेले दोन दिवस मी सतत तूला विचारते सरू एवढ कसल दडपण आहे तुझ्यावर""
""दडपण कसलही नाही वहीनी""
""साफ खोट बोलतेस तू तूझ्या डोळ्यात ते स्पस्ट दिसतय""
"""नाही वहीनी ती रात्री बरोबर झोपली नाही म्हणून""
""तेच म्हणते रात्र भर तूझ्या बेडरूमची लाईट चालू होती""
""नाही वहीनी ती चूकून राहीली"""
""हो का??मग तासा तासाच्या अंतराने ती बंद चालू का होत होती""
"वहीनी तू पाळत ठेवून होतीस माझ्यावर??""
""हो तूला जरी मला काही सांगावस वाटत नसेल,तरी आपली मुलगी कसल्या तरी दडपणाखाली वावरते हे न ओळखण्या एवढी मुर्ख वाटते का? सरू ,मी तूझी आई नसली ना ,तरी आई सारखीच, सासूबाईच्या माघारी,तूला जपलय, रातरात तूझ दुखन काडलय,तूला तळहातावरील फोडा प्रमाणे जपलयगं मी !,मग मला सांग दोन दिवसा पासून जीच धड जेवणावर लक्ष नाही,झोप नाही, तरी मी विचारू नको, सरू!! अगं कसा अवतार करूण घेतलास सांग मला""
"""वहीनी ""अस म्हण सरू वहीण्याच्या गळ्यात पडली,आणि ओक्सा बोक्सी,रडू लागली....क्रमश:...पूढे
"ताई शेट्याच्या घरी थोरली सून बनून आलेल्या मालतीला ताईनी डोक्यावर घेतल होत,आल्या आल्या घरचा कारभार हाती देवून मोकळ्या झाल्या होत्या...शेट्ये खाणदाणाची सून चार चौघात शोभून दिसावी ,म्हणून पूर्व परंपरे नुसार या सूनेकडून त्या सूनेजवळ चालत आलेले,दागिनेही देवून ,ताईनी तीला म्हणाली होती...
"""हे वारसा हक्काने चालत आलेल स्त्रीधन आज तूझ्या सपूर्द करते.. हा आपल्या शेट्ये खाणदानाचा अमुल्य ठेवा ,या पूढे जपण्याच काम तूझ"""
सासरी आल्या आल्या एवढ सुख मिळेल याची कल्पनाही नसलेली, मालती भारावून गेली होती..आई पेक्षा सासूबाईनी प्रेमाचा एवढा वर्षाव केलेला पाहून ती सदगीत होवून सासूबाईच्या पाया जवळ बसत फक्त एवढच बोलली...
"""हो आई तुम्ही माझ्यावर सोपवलेल्या या खाणदाणी ठेवा मी जपेन"""
""" तुझ्याकडून हीच अपेक्षा होती""
""" तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही आई""
"" तू मला आई म्हणायचं नाही""
आतापर्यंत मालतीला सासरी आभाळ ठेंगणे वाटायला लागलं होतं .पण तिच्या सासूने तिला मलाआई म्हणायचं नाही असं सांगितल्यावर ,,मालती बावरली,तीला काय बोलाव हे न सूचून ती गप्प राहीली..मालती काही बोलत नाही म्हटल्यावर ताईनी स्वतः बोलायला सुरुवात केली..
"""अग गप का झाली!,मी तूला मला आई नको बोलू म्हटल्यावर राग आला का?अग या घरात किंवा या पंचक्रोशीत मला सर्व ताई म्हणतात..तूही मला ताई म्हणूनच हाक मारावी अशी माझी ईच्छा आहे..""
आणि उत्तर दाखल मालतीन फक्त मान डोलवली...क्रमश...पूढे..
"""मालतीच लग्न होवून आज वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने हौशी ताईने पूर्ण पंचक्रोषीत आमत्रंण पाटवून शेट्ये वाड्यावर पून्हा एखदा जेवणाच्या पंगती वाढल्या ...संगतीला आल्या गेल्यांना बर वाटाव म्हणून मानपानही केला..
आलेली मानस गेल्यावर मालती आणि तीचा नवरा विजय दोघ जेवायला बसले ...आणि पूढे मालती काय झाल ते कळलही नाही...जेव्हा तीने डोऴे उघडले तेव्हा तीने स्वतःला हॉस्पिटलच्या बेडवर पाहिलं होतं उशाशी सासू बसली होती आणि आणि विजय तिथेच बाजूला बसून एकटक मालती कडे पाहत होता.. तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तू खूपच घाबरलेला वाटत होता परंतु याउलट ताईचा चेहरा मात्र निर्विकार होता त्या कसल्याश्या घोर विचारात असल्या सारख्या वाटल्या ,आणि त्याच बरोबर आपली सासू आपल्या उशाशी बसून आहे हे मालतीने पाहिल्यावर तिला माझ्यासारखी भाग्यवान मी असं क्षणभर वाटलं आणि तिला एकदम बहरून आलं ती बेडवर उठून बसली आणि सासुबाई सासुबाईना म्हणाली..
"""ताई मी ईथे कशी""
"""रात्री तू जेवायला बसली आणि तीथेच घेरी येवून पडली..म्हणून तूला इथ आणले..डाँक्टर म्हणाले तूला आजची रात्र इथ राहव लागेल""
"""मग तूम्ही रात्रभर ईथच आहात"""
""हो अग मी आईला म्हटलही तू घरी जा पण ही मानायला तयारच नाही..वर म्हणते माझी सरू हीच्या जागी असती तर मी घरी गेली असती का??मालती मला माझ्या सरू सारखीच आहे...""
आपल्यावर आपल्याा सासूच एवढ प्रेम पाहून मालती भारावून गेली....तीला आपली सासू म्हणजे खरच देव मानूस आहे.या विचाराने तीच्या मनात सासूबद्दल पहील्या पेक्षा दुप्पट सन्मान वाढीस लागला तर नवल नव्हत...
मालती आता हुशार वाटू लागताच विजयला ताई म्हणाली..
"""विजय तू घरी जा आराम कर मी आहे ईथे""
""नाही ताई तू घरी जा तू फार थकलीलेली दिसते""<
/p>
""विजय आपल्या मुलीला बर नसताना कोणती आई घरी जाईल .आणि घरी गेल्यावर लक्षतरी लागेल का??ते काही नाही तू घरी जा पाहीजे तर दोनतीन तासाने परत ये""
""ताई तू तशी ऐकणार नाही.मालती तू तरी सांग आईला घरी जायला तूझ ऐकेल ती""
""हो ताई तूम्ही जा घरी मी बरी आहे माझी काळजी करू नका...हव तर तूम्ही दोघही जा""
""नाही हं मालती मी ईथेच थांबणार डाँक्टर काय बोलतात ते ऐकणार""
""बर मी जातो ""
आणि विजय आपल्या बायकोची जबाबदारी विश्वासाने ताईवर टाकूण निघून गेला..क्रमश:पूढे...
डाँक्टरनी मालती जवळ येत म्हणाले कशी तब्येत बर वाटतय ना""
""हो मी अगदी बरी आहे""
""ताई आता सूनबाईंची काळजी घ्यायला हवी""
""का हो डाँक्टर काही काळजी करण्यासारख आहे का तर तस सांगा पाहीजे तर दुस-या हाँस्पीटला नेवू का""
"""नको तस काही घाबरण्याच कारण नाही..शेट्ये खाणदाणाला लवकरच थोरल्या सूनबाई वारस देनार"""
डाँक्टरच्या तोंडून गोड बातमी ऐकल्यावर मालती मनात हुरळून गेली परंतू तीच हे सुख तीला जास्तकाळ उपभोगायला मिळनार नव्हत..आणि ताईला ज्याची भीती वाटत होती तेच नेमक घडल होत..थोड्याच दिवसात मालती आई होनार होती...आणि तीच्या पोटी जन्म घेनारे बाळ शेट्यांच्या अगणित प्राँपर्टीच एक मेव वारसदार बनणार होत..
आणि ताई..च्या वाट्याला तीची मुलगी सरू आणि मुलगा विकास हे शेट्यांच्या पराँपर्टीला मुकनार होते...असच ताईच्या नव-याने आपल्या म्रुत्यू पत्रात लीहीलेल होत..कारण ताई ही विजयची सावत्र आई होती...विजय लहान असताना त्याची आई निघन पावली...विजयच संगोपण व घरची देखभाल करायला कुणी नव्हत म्हनून ही ताई विजयची दुसरी आई बनून घरात आलेली...ताईच्या मायेन विजय वाढला...त्यात भर म्हनून ताईला दोन जुळी मूल झाली सरू आणि विकास जन्माला आले....तीन्ही मुलांच संगोपण ताई करत होत्या..पण कूठेतरी विजयला पाण्यात पाहत असल्याचा डाऊट विजयच्या वडीलांना होता..म्हणून त्यानी आपल्या म्रुत्यूपत्रात विजयला जे पहील आपत्य होईल त्याच्या नावे सर्व केल होत... त्यामुळे विजयचे वडील मेल्यावर देखील विजय सूखाने जगत होता....ताईने म्रुत्यूपत्र वाचल्यावर त्याना शाँक बसला होता...मनात असूनही त्या काही करू शकत नव्हत्या,फक्त विजयची बायको आल्यावर गोड बोलून तीन वेगळ्या पद्दतीत आपल्या मुलांना या प्राँपर्टीचे मालक बनवायचे मनसूबे रजचले...ती वेळ आज आली होती..आता फक्त मालतीला वचनात बांधून सर्व आपल करायच..त्या मुळे ताई हाँस्पीटला थांबली होती...क्रमश:पूढे...
""""ताईने आज आपल्या मुलांच्या भविष्या करता मालतीशी बोलताना कूणी ऐकू नये म्हनून तीने मालतीला प्रावेट रूममधे शिप्ट केल... आढे वेढे घेत मालतीही रूममधे आली होती...
"""मालती तूला इथ बर वाटेल ""
""पण ताई कशाला हे सर्व""
"""फक्त तूझ्यासाठी""
"""माझ्यावर एवढ प्रेम करता""
""माझ्या मुलांपेक्षा जास्त""
"""ताई तूम्ही खरच महान आहात""
"""नाही मी महान नाही फक्त मी या वेळी तूझी आई आहे"""
"""ताई कीती करता माझ्यासाठी हे उपकार कसे फेडू मी""
"""तू मनात आणलस तर आताच फेडशिल""
""ते कस काय""
"""सांगते आधी वचन दे""
"""कसल वचन ताई""
"""ते सांगेन पण तू मी सांगेन ते ऐकण्याच""
"""भरवसा नाही ताई""
""आहे म्हणूनच आज शेट्ये खाणदाणाच्या थोरल्या सूनेकडे वचन मागते देतेस"""
मालतीला ताईने एवढ पेरेम दिल होत..आणि घरची मालकीनीचे अधिकारही त्यामुळे मालतीने मागे पूढे न पाहता वचन दिल आणि ताईला म्हणाली...
"""बोला ताई काय हवय तूम्हाला""
"""तूझा बाळ""
"""ताई तेतूमचच आहे""
"""नाही ते जन्माला येवू द्यायच नाही""
""ताई काय बेलताय तूम्ही एका आई ला सांगताय""
"""होय मला हे बाळ नको ..""
""का ताई"""
"""सांगते""
असम्हनून ताईने सर्व ईतिहाल तीला सांगून ती म्हनाली ..
""आता तूझ वचन निभव""
"""ताई मी वचन देते मी ही सर्व प्राँपर्टा तूमच्या मुलांना देईन पण..
"""पण काय मालती""
""माझ बाळ"""
"""ते जन्माला येवू दे आणि आणि माझी मुल भिकारी राहू दे...?? ते काही नाही मालती...तूझा निर्णय मला आत्ताच हवा नाहीतर मी माझ्या मुलासह आत्महत्या करून ही प्राँपर्टी तूलाही पचायला देनार नाही..आणि जर का तू आताच आँबरशन केलस तर य़ा पूढे विकास आणि सरूची आई तू असशिल विजयला काय सांगायचे ते मी सांगेन""
"""ताई"""
"""तूला मोठ्या सूनेचा मान रूतबा कायमस्वरूपी मिळेल या
पूढे तू घेशिल ते निर्णय आम्हाला मान्य असनार""
आणि जिवंत असलेली तीन मानसांची आत्महत्या पाहण्या पेक्षा आपलीच कोख कायमस्वरूपी बंद करायचा निर्णय मालतीने घेवून ...ताईने केल्याल्या मायेची परत फेड कोणी कधीही करणार नाही अश्या रीतीने ताईच्या उपकारातून मालती मोकळी झाली....ती पून्हा कधीच आई झाली नाही...
आई झाली ती सरू,विकासची, सर्व सूख मिळाली पण मालतीने थोरल्या सूनबाई म्हणून केवळ ताई खातर आपली कुसच जाळून टाकली होती.....कालतंराने पश्चतापाच्या अग्नीत होरपाळणा-या ताईने आपली जीवण गाथा संपवली होती....परंतू मालती मात्र थोरल्या सूनबाईची भूमीका निभवत आजही आपल्या मार्तुत्वाचा बळी देवून त्या घरात वावरत होती....
.