Sanjay Raghunath Sonawane

Fantasy

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Fantasy

भुताळीन-भय कथा-लेखक संजय सोनवण

भुताळीन-भय कथा-लेखक संजय सोनवण

2 mins
16.1K


आमच्या गावात भुताळणींची भीती पसरली होती. भुताळीन म्हणजे कोण तर संशयावरुण एखाद्या स्त्रीला अशुभ मानने व तिचा एखाद्याच्या घरात शिरकाव झाल्यास फार मोठी हानी होने.त्यामुळे अशा स्त्रीपासून लोक लांबच राहत. गावातून जाताना लोक भीतीपोटी पहात नव्हते. काही म्हणायचे आजपर्यंत गावात तीने चार पोर मारले. त्यामुळे अशा स्रीला पाणी सुद्धा पाजत नव्हते. काहीजन तर संशयावरुन तिला शिव्या देत होते. काहीजन तर मारायचेच बाकी राहिले होते. असे जवळ जवळ एकाच्या तोंडी ते अनेकांच्या तोंडी झाले. काहीजन म्हणायचे तिने स्वतःचे दोन पोरे खाल्ले. काहीजन म्हणायचे ती रात्री दोन वाजता गंगेवर अंघोळीला जाते. उघड्या अंगाने साऱ्या गावाला चकरा मारायची. ती फक्त गावच्या कुत्र्याना दिसत होती. ज्याला दिसली की तो जगत नसे .असा समज साऱ्या गावात पसरला होता.गावातली जनावरे मेली तरी लोक तिलाच दोष देत होते. गावात एखादे आजाराने मेले तरी तिच्यावरच संशय असायचा.

अमावश्या पौर्णिमेला त्या मारुतीच्या मंदिरासमोर नागड्या नाचतात. मारुतीचा शेंदुर काढतात. मारुतीला भोग लावतात. अशा भुताळनीमुळे गावात अंगणात झोपणारी मंडळी घरात झोपू लागली. हळूच रात्री बारा वाजता उठून आम्ही पाहत असे; पण आंम्हाला ती भुताळीन दिसलीच नाही. त्यांना विद्या शिकवणारे त्यांचे गुरु स्मशानात बोलावतात. मेलेल्या प्रेताचे मांस खायला लावतात.ती विद्या ते खाल्यानेच प्राप्त होते असा समज होता. ती मेल्यावर ती विद्या तिच्या वंशात शिकविली जाते. त्या भुताळनी मरताना हालहाल होऊन मरतात.

त्यांचा शेवट फार वाईट होतो असी समजूत होती.

एखादे पीक कमी आले तर म्हणायचे भुताळनीचाच प्रकार आहे. लोक चिड़ून शिव्या द्यायचे. काही तर ती दिसली की घराचे दरवाजे बंद करून दरवाजांच्या फटीतून पाहत असे मगच दरवाजा उघडत असे.

ती भुताळीन वय झाल्यावर मरण पावली तरी लोक तिच्या मरणावर शिव्या देत होती. गावाची पीडा गेली म्हणायचे. तिला का आता यम सरळ मरण देणार आहे का ?म्हणायचे. तीचे लय हाल होणार हाय.असे म्हणून

लोक शेवटपर्यंत संशयीत राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy