भुक्या आणि मक्या
भुक्या आणि मक्या
दोन बॅचलर मित्र असतात, भूक्या आणि मक्या अशी त्यांची नावे. भुक्याला भूक आवरत नाही म्हणून तो खा, खा खातच राहतो. मक्या हा घाबरत असतो तो खूप हळव्या मनाचा असतो. त्याला सतत भुताची भिती वाटते. त्याची तो सडपातळ असतो. एकदा मक्या मक्याचं कणीस खात असतो,भुक्या त्याच्या तोंडाकडे पाहत असतो. मक्या कणीस खात बाहेर जातो.भुक्या मक्याला अद्दल घडवायची असे ठरवतो. तो मक्याला घाबरवण्यासाठी एक शक्कल लढवितो . टेबलवर पातेल्याच्या वरती परात ठेऊन नुकतेच त्यावर भाजी हलवण्याचा चमचा ठेवतो. चमचा अलगद ठेवल्यामुळे तो हळू हळू फिरू लागतो. बाहेरून मक्या येतोभुक्या त्याला सांगतो. भुताला भूक लागली आहे त्यामुळे तो भाजीचा चमचा हलवित आहे हे बघ. मक्या ते दृश्य पाहून गर्भगळीत होतो. आणि तेथून पळत सुटतो.भुक्या नंतर आरामात जेवतो.
धन्यवाद