"वाचा चांगली असावी"
"वाचा चांगली असावी"
आपली वाचा चांगली असावी, म्हणजे बोबडी नसावी असं म्हणणं नाही तर, आपल्याला निसर्गाने बोलायला तोंड दिले आहे. त्या तोंडाद्वारे चांगलेच शब्द उच्चारले गेले पाहिजे. कारण आपले बोल हे ईतरांना लागेल किंवा मनाला खटकेल असे नसावे. वादाला तोंड फु टेल असे कदापी वागू नये. असे लहान मुलांना आपण समजावून सांगत असतो. पण तेच शब्द आता मोठ्या लोकांना पटवून सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुन्हा बालसंस्कार मोठ्यांना शिकवावे लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी लोकं लहान मोठ्यांचा आदर विसरले आहेत. त्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त ईगो भरलेला आहे तो म्हणजे मीच श्रेष्ठ.
आत्मपरीक्षण करण्याची गरज आता सर्वांना आहे. एक शब्द कमी बोलण म्हणजे मीच का माघार घ्यावी. ही दुर्बुद्धी सतत वाद उभा करणाऱ्या प्रत्येक जनाला होत असते.
व्यर्थ जिव्हा चालवणाऱ्या (उचलली जीभ लावली टाळ्याला असे ल
ोकं) साऱ्यांनी थोडा विचार करावा. वाचा चांगली वापरा समजत नसेल तर कसे बोलावे कसे वागावे याचे शास्त्र शुध्द पद्धतीने थोरा मोठ्यांकडून शिकुन घ्यावे. किंमत करावी श्रमाची व्यर्थ बडबड काय कामाची. आपल्या मनाला हातांना काम लावा मन आणि हात रिकामे असू नये. करमणूक साधनांचा उपयोग बोध घेण्यासाठी करावा. व्यर्थ वेळ वाया घालवण्यासाठी नाही. आपल्याहून मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला आदराने सन्मानाने बोलावे. असे वागल्याने आपल्याला चांगल्या सवयी जडतील. जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तेंव्हा वाचा ही अती महत्त्वाची बाब आहे. जेंव्हा बोलाल तेंव्हा आपल्या मुखातून चांगलेच बोलण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. असे केल्याने बोलण्यात सुधारणा होवून जन्माचे सार्थक झाल्यासारखे होईल. आपली ओळख निर्माण करायची असेल तर चागले बोलणे शिकावे व त्याचा वापर आपल्या जीवनात सतत करावा....