STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

"हॉस्टेल जीवन"

"हॉस्टेल जीवन"

1 min
251


"हॉस्टेल जीवन" (सत्य घटनेवर आधारीत लेखन)

मी हॉस्टेल मध्ये शिकत असताना खुप वाईट दिवस काढले आहे.6th मध्ये असताना मला आणि माझ्या लहान भावाला घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे हॉस्टेल मध्ये दाखल केले. त्या हॉस्टेल मध्ये एक मोठा हॉल होता साधारणतः तीस ते चाळीस मुलं पाचवी ते बारावी या वर्गात शिकत होते सर्वांनी आपल्या घरून येताना अंथरूण पांघरूण ताट वाटी ग्लास, अंघोळीचा साबण, कपडे इत्यादी साहित्य एका पेटीत भरून आणले होते.

सर्वांच्या पेट्या एका लाईनित ठेवण्यास सांगून वसतिगृह व्यवस्थापक सर्व देखरेख ठेवीत असे.

दोन वेळ जेवण मिळत होतं. तसेच मंगळवारी विशेष भोजन म्हणजे वरणभात पोळी आणि मस्तपैकी ठेचा मिळत असे.

हॉस्टेल पासून एक किलोमीटर अंतरावर आमची शाळ

ा होती.

रविवारी सुटी असल्यामुळे मी पार्ट टाईम चहाच्या हॉटेलात काम करत असे. स्वतःचे कपडे स्वतः धोवून काढावे लागत असे.

लहानपणापासून कष्ट माझ्या पाचवीलाच पुजलेले आहे ते अजूनपर्यंत टिकून आहे. वडील आजारी होते आई शेतात मोल मजूरी

करुन कसेबसे घर चालवी. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी होस्टेलमध्ये यावं लागलं.

एक वर्ष होस्टेलमध्ये काढलं मोठ्या भावाची खुप मदत झाली. साखर कारखान्यात भाऊ नोकरीला होता नंतर भाऊ घरी पैसे पाठवू लागला. त्यामूळे हॉस्टेल सोडून परत घरी आलो. पुढचं शिक्षण कसेबसे तसेच पार्ट टाईम शेतात काम करत केले.

असा माझा हॉस्टेल ते घर प्रवास झाला

आजही कष्ट करतो आणि कुटुंबाचे पालनपोषण करतो...

    


Rate this content
Log in