STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

"भारतीय प्रजासत्ताक दिन"

"भारतीय प्रजासत्ताक दिन"

2 mins
153



सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 2022. आपला प्रजासत्ताक दिन आपण या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे का म्हणतो? त्याचे खरे उत्तर म्हणजे प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता स्वातंत्र्य जनतेला मिळालेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना उदयास आणली. आपल्या हाती पूर्णपणे सत्ता सोपवून इंग्रज त्यांच्या देशी निघून गेले. त्याआधी त्यांनी आपल्यावर खूपच निर्दयी व्यवहार केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन अनेक देशभक्त स्वतःहून पुढे येऊन देशासाठी लढले काहीं फासावर गेले. त्यांचे विचार एकच होते ध्येय सुद्धा नेकच होतें ते फक्त आणि फक्त देशाला स्वातंत्र्य जुलूम शाही दडपशाही त्यांना सहन झाली नाही. म्हणून देशाच्या देशभक्तांनी मिळून एकच विचार केला तो म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला स्वातंत्र्य देऊन स्वतःचे बलिदान दिले. असे महात्मे असे क्रांतिकारक आणि असे देशहितकारक पुन्हा होणे नाही. स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना आजच नव्हे

तर क्षणा, क्षणाला आठवले तरी कमीच आहे. सर्व देशभक्तांना मानाचा मुजरा. आपला प्रजासत्ताक दिन आनंदाने होईल साजरा. खऱ्या अर्थानं आपण आता हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही. याची काटेकोरपणे दक्षता घेतली पाहिजे. अजूनही आपल्या देशात घुसखोरी करु पाहणारे शेजारी काही देश आहेत. त्यांचे मनसुबे उधळून लावणारे मातृभूमी रक्षणार्थ आपल्या सीमेवरचे आपले वीर जवान सज्ज आहेत. म्हणुन आपले जिवन हे आपण निवांत पणे जगत आहोत.

    देशसेवा हेच ध्येय मनात ठेवून साऱ्यांनी जगले तर हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणे कधीच शक्य नाहीं.

भावा भावात, गावा गावात एकीचे सूत्र असले पाहिजे. प्रत्येक चांगले काम देशहित साधते हा विचार करून मार्गक्रमण करीत पुढे जावे. भारत भूमि ही आपली माता तिच्या रक्षणार्थ झुकवू माथा, जाणून साऱ्यांच्या व्यथा.

देशसेेवेची चालवू प्रथा. या ओळींना सदैव ध्यानी घेऊन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करूया आणि देशसेवा हेच ध्येय आपल्या मनात रुजवूया. भारत मातेला समर्पित माझा हा छोटासा लेखनाचा प्रयत्न.

चूकभूल क्षमस्व.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


Rate this content
Log in