Navanath Repe

Inspirational

3  

Navanath Repe

Inspirational

भोळसट भक्तांचा मेळा ... !

भोळसट भक्तांचा मेळा ... !

4 mins
1.5K


कवी केशवसुत यांचे एक वाक्य आहे, "जुने जाऊंद्या मरणालागुणी जाळुणी किंवा पुरुनी टाका, सडत न एका ठायी ठाका खांद्यास चला खांदा भिडवुणी." आज बुवा, बापू, महाराजांवर श्रध्दा असणे म्हणजे आपली विचारशक्ती त्यांच्या पायाशी गहाण ठेवणे होय. एकदा गहाण पडलेली ही तर्कबुद्धी पुन्हा सोडवून आणणे, परत मिळणे दुरापास्तच ! बुवाचा पगडा एकदा मनावर बसला की बसला. मग त्यातून सुटका नाही. बहुतेक श्रद्धाळूंची मानसिकताच अशी असते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धार्मिक अजेंड्यावर चालणाऱ्या भाजप सरकारने तर राज्याचा पुरोगामी विचारांचा वारसा मातीत घालण्याचा विडाच उचलला आहे की काय असे वाटते.

दि. २६.०२.१९ रोजी चक्क विधिमंडळात आमदारांसाठी प्रवचन ठेवण्यात आले होते.

विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी ‘ब्रम्हकुमारी विश्वविद्यालया’ बहन शीवानी यांचं प्रवचन आयोजित करण्यात आले होते. पण त्यावर विरोधीपक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वाक्षरीचं पत्र आणि विधिमंडळाच्या प्रधान सचिवांच्या नावे असलेली निमंत्रण पत्रिका देऊन सर्व आमदारांना वाटण्यात आली होती. प्रतिनिधींच्या जीवनातील एकूणच कार्यप्रवाह उत्साहवर्धक व त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असं पत्रिकेत म्हटलं होत. या कार्यक्रमांवर विरोधाकडून टीका करण्यात आली होती त्यात एमआयएमचे आमदार वारीस पठान म्हणाले, आम्ही मुल्ला मौलवींना इस्लामवर प्रवचन देण्यासाठी बोलावलं तर परवानगी मिळेल का ? असा सवाल केेला तर विधानमंडळात असे धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत असं काँग्रेसचे भाई जगताप यांनी म्हटले व त्यांनी या प्रवचनाला विरोध केला. पण यापुर्वीही हरियाणात जैन मुनी तरुणसागर महाराज यांचं प्रवचन आयोजित करण्यात आले होते. तिथेही यावर जोरदार टीका झाली होती.

आजच्या पांढरपेशा वर्गाला बुवाबाजीविषयी आदर आहे. आज महाराष्ट्रात भोंदुबाबा, महाराज, स्वामी, बापू इत्यादीवर श्रद्धा ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा श्रद्धाळूत सामान्यजनांसह मंत्री, मुख्यमंत्री, शासकीय अधिकारी, उद्योगपती, खेळाडू, अभिनेते समाविष्ट आहेत. याविषयी आचार्य आत्रे म्हणतात की, 'भोळसट भक्तांचा मेळा जमला की, या वैराग्यवादी बुवांची स्वारी येते.

भोळ्या - भाबड्यांना अंधश्रध्दांच्या कर्दमात (चिखलात) खितपत ठेवण्यात बुवा - बापूंचे तसेच राजकारण्यांचेही हित असते. म्हणून हे लोक असे कार्यक्रम घेतात. पण ज्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते त्यांना कोणत्याही धर्माची, धर्मग्रंथांची व प्रवचनाची आवश्यकता नसते.

व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने रासायनिक अस्त्रे वापरू नयेत म्हणून चळवळ उभारली ती निधर्मी, बुध्दीप्रामाण्यवादी बी. रसेल यांनी. मात्र अमेरीकेचा निषेध करण्यासाठी कोणताही धर्मगुरू पुढे आला नाही, यावरून सिध्द होते की, प्रवचनांत मानवतेच्या प्रेमाने गळे काढणा-या प्रवचनकारांचे प्रेम किती बेगडी असते हे दिसून येते. याविषयी रिचर्ड डाँकिन्स म्हणतात की, प्रत्येक धार्मिक व्यक्ती श्रद्धाळू असतेच, ही श्रध्दा धोकादायक ठरू शकते. श्रद्धेमुळे व्यक्तीवर, समाजावर तसेच राष्ट्रावरसुध्दा संकट येऊ शकते तर मग प्रश्न पडतो की, हे लोकप्रतिनीधी अज्ञानी आहेत की काय ?

पु.ल. देशपांडे हे 'एक शुन्य मी' या लेखनसंग्रहात लिहतात, "धर्म धर्म करणा-या धार्मिक लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे कोणी शत्रू नसतील".

सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात सोईसाठी उपयोगी पडेल, ज्याने जीवन अधिक सुखकारक होईल असा एकही शोध जगातील एकाही धर्ममार्तंडाने किंवा प्रवचनकाराने लावलेला नाही , तर मग आमच्या विधीमंडळात बसलेल्या मंत्री महोदयांना व प्रशासकीय सचिवांना ही गोष्ट का समजत नाही हा प्रश्न पडतो. माणसाचे अन्न , वस्त्र, निवारा, रोगनिवारण हे मूलभुत प्रश्न आध्यात्मामुळे सुटले नाहीत किंवा सुटूच शकत नाहीत हे उघड आहे. हे प्रश्न सोडवण्याची दिशा विज्ञानाने दाखवली. तर मग विधीमंडळात प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न करून सरकारला नेमका कोणता फायदा होणार या प्रश्नाचे उत्तर सरकार देईल का ?

आमचे हे राज्यसरकार असे तर केंद्र सरकार देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी महायज्ञ करणार व तो महायज्ञ असलेला रथ देशाच्या सीमावर्ती भागात दाखल होणार असे समजते तर, आमचे तरुण ज्यांना आदरनिय गुरूजी म्हणून संबोधतात ते म्हणतात की, माझ्या मित्राच्या शेतातील अंबे खाल्याने पुत्रप्राप्ति होते, तसेच यावर्षीच्या गणेशोत्सवात पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, गणपती पाहिजे त्याला पुत्रप्राप्ति देतो आणि औरंगाबादचे विद्यमान खासदार हे एका आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात सांगतात की, जप करून मी रुग्णांना बरं करतो !, भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते. यापुर्वीही याच युती सरकारच्या काळात तेव्हांचे तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी गणपतीला दुध पाजले होते. यावर विवेकवादी दृष्टीकोणातून विचार केल्यास हे शक्य असेल का ?

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्री म्हणतात की, या सरकारला जर का २०१९ च्या निवडणुकीत पुर्ण बहुमतांनी हे सरकार निवडूण आले नाही तर देश ५० वर्ष मागे जाईल !, तर मग आता देश अशा अंध्दश्रध्दा पसरवून ५० वर्षाच्याही पलिकडे नेत आहेत की नेण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रश्न पडतो.

केंद्र सरकार महायज्ञ करणार आहे याविषयी डाँ. शरद अभ्यंकर हे 'जरा शहाणे होऊ' या पुस्तकात लिहतात की, "समाजाला उपयोग शुन्य मात्र पैशांची उधळपट्टी हा चंगळवादाचा निकष लावल्यास आजकाल ठिकठिकाणी होणा-या यज्ञयागांची बरोबरी या बाबतीत इतर कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. शतचंडी, लक्षचंडी असे एकसे बढकर एक यज्ञ करून सरपण, तुप, तेल, तांदुळ, पैसा आणि लोकांचा वेळ अशा राष्ट्रीय म्हत्वाच्या गोष्टींचा इथे निष्कारण धुर करतात. विश्वशांती हे अशा यज्ञांचे उद्दिष्ट असते, असे सांगतात; पण यज्ञामुळे बाजूच्या गल्लीतसुध्दा शांतता प्रस्थापित करण्यास यश लाभत नाही हे आपण जाणतोच." तर मग या उच्चपदस्थ समजल्या जाणा-यांना ही गोष्ट का समजत नाही की, ते समजत असून सुध्दा वेड्यांचे सोंग घेतात का ? आमच्या प्रतिनिधींना जर प्रवचन ऐकूण स्वतःचे जीवनमान तसेच कार्यप्रवाह हे उत्साहवर्धक व जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त करायची असेल तर नवलच पण प्रतिनिधींनी कधीतरी शेकक-यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली तर गोर - गरीब लोकांच्या व्यथा जाणुन घेतल्यावर समजेल की, शेतक-यांची जी सकारात्मक उर्जा व कार्यप्रवाह हा तुमच्यासारख्या लोकप्रतिनीधींमुळे पार मातीत गेला आहे पण आमचे आपल्या जातीपातीचे म्हणून निवडूण दिलेले राजकीय पुढारी दादा, काका, साहेब हे अर्थहीन कार्यक्रमांचे नियोजन करण्यात गुंतले आहेत त्यांना मतदार संधातील लोकांच्या प्रश्नापेक्षा प्रवचन म्हत्वाचे वाटते.

श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन होऊच शकत नाही, श्रध्देमुळे अज्ञानालाच ज्ञान मानले जाते. श्रद्धाळु आस्तिकांशी उत्क्रांतिवादावर वादविवाद करणे म्हणजे कावळ्यांशी बुध्दिवादाचा डाव खेळण्यासारखे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational