Navanath Repe

Others

3  

Navanath Repe

Others

मैं भीं नहीं चौकीदार

मैं भीं नहीं चौकीदार

4 mins
1.3K


अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है,

रूख हवाओं का जिधर का है उधर के हम है ! अशी अवस्था आमच्या तरूणांची झालेली आहे.

पंतप्रधानांनी ट्वीटर च्या माध्यमातून सरकारी कर्मचा-यांना 'मैं भी चौकीदार' मध्ये सामील होण्याच आव्हान केलं होतं परंतू 3.20 लाख बँक अधिकारी हे पंतप्रधानांना पत्रातून प्रतिउत्तर देताना म्हणतात की, आमच्याकडून 'चौकीदार' होण्याची अपेक्षा ठेवू नका. तर मग आमचे तरूण अशा प्रकारचे उत्तर देणार की नाही हा प्रश्न पडतो.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये 'चायवाला' हा शब्द वापरून लोकांची मने जिकंली होती. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदणारया भारतातील १७ व्या लोकसभा निवणूकीच्या तोंडावर 'चौकीदार' हा म्हत्वाचा मुद्दा बनला आहे. पंतप्रधानांनी ३१ मार्च ला 'मैं भी चौकीदार' नावाची मोहीम व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून सुरू करणार आहेत. आज सर्वच पुढारी आपल्या नावापुढे 'मैं भी चौकीदार' हे शब्द वापरताना दिसत आहेत. त्यात आमचे तरूण आम्हीही कुठेच कमी नाहीत हे दाखवून देण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. परंतु एकीकडे भाजपाचे सर्व नेते ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार लिहित असताना आयपी सिंह यांनी उसूलदार असे लिहिलं आहे. तर आज निवडणूकीच्या तोंडावर आघाडीतून युतीमध्ये अचानक प्रवेश करून बनलेल्या चौकीदारांना आज चोहीकडे विकास दिसायला लागला आहे. हा सुद्धा एक प्रकारचा विकासच आहे का ? असा प्रश्न पडतो.

गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत तसेच गेल्या पाच वर्षांपासून हिंदी भाषिक लोकांची फसवणूक करत आहेत, भाजपने प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशीही टीकाही त्यांचेच पक्षातील सिंह यांनी केली. त्यामुळे सिंग यांच्यावर भाजपकडून कारवाईदेखिल करण्यात आली आहे. ही कार्यवाही करताना सिंग यांना सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलपट्टी केली आहे.

संघप्रणित भाजपचे चौकीदार हे प्रामाणिकपणे चौकीदारी न निभवता ते वाचाळवीरही आहेत असे निदर्शनास येते.

"गटारातील गॅसवर चहा तयार करता येतो" असे वक्तव्य स्वतः चौकीदार पदाचे निर्मातेच करतात. ,"अन्य जातींच्या (मराठा,पटेल,जाट, गुज्जर,धनगर,मुस्लिम इ.) आरक्षणाची मागणी योग्य नाही"

असे विधान ज्यांच्या विचारावरती सर्व चौकीदारांची फौज चालते ते सर्वेसर्वा करतात., शेतक-यांच्या तुरखरेदीविषयी 'रडतात साले' तर पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांविषयी 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले' त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला. असे वक्तव्य महाराष्ट्रातील चौकीदारांचे मुकादम करतात. त्यावेळी त्यांचे 'मानसिक संतुलन' ठीक नसून, त्यांना 'मनोविकार तज्ञाची' नितांत गरज आहे का ? असेच वाटते. "मोदींचे कौशल्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे"

असे विधान उत्तर प्रदेशचे चौकीदार करतात., "संविधान बदलणे हे आमचे उद्दिष्ट आहे ते बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत बसलो आहोत" असे वक्तव्य(केंद्रीय मंत्री) चौकीदार करतात. तर "शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये,माजी विद्यार्थ्याकडे जावे" असे वक्तव्य चौकीदार (केंद्रीय मंत्री) करतात., 'गुप्तांग सटकले' असे वक्तव्य सोलापूर लोकसभेचे चौकीदार करतात. , "आरक्षण देणे हे सरकारच्या हातात नाही" असे वक्तव्य करून तरूणांमध्ये नैराश्य निर्माण करणारे चौकीदारच असून ते मंत्रीही आहेत. , "देठ हिरवा आहे" तसेच "दारूच्या बाटलीला महिलांचे नाव दिले तर खप वाढेल" असे वक्तव्य मंत्री पदावर असलेले चौकीदार करतात. , "सैनिक वर्षभर तिकडे बॉर्डरवर असतात आणि त्यांना इकडे गावाकडे मुलं कशी होतात?"

असे विधान करून सैनिकांच्या पत्नीचा अवमान करणारे विधान पंढरपूर विधानपरिषदेचे चौकीदार आहेत , "शिवजयंती गेली भोसड्यात..तू काय शिवाजीच्या...पासून पैदा झालास काय?" असे विधान अहमदनगरचे दिडदमडीचे चौकीदार करतात. तर शिवछत्रपतींच्या स्मृतीदिनाला रायगडावर ढोल वाजवणारे हेच चौकीदार आहेत. , "एखादी मुलगी पसंद असेल आणि तिने जर नकार दिला, तर पळवून आणून तुम्हाला देणार"

असे विधान मुंबई येथे दहीहंडी कार्यक्रमात चौकीदार करतात.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निघालेल्या 'मूक मोर्चाला' 'मुका मोर्चा' असे म्हणणारे हे चौकीदारांचे साथीच आहेत. तर "महात्मा फुले देशद्रोही,धर्मद्रोही होते, आंबे खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, मनू हा ज्ञानोबा-तुकोबापेक्षा श्रेष्ठ होता" असे वक्तव्य करणारे हे चौकीदारांचे अश्रीत आहेत. याशिवाय "संभाजी राजा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता" हे लिखान पाठ्यपुस्तकात करणा-या लेखिका चौकीदारांच्या अश्रीतच आहेत. तसेच पाण्याविषयी बोलताना 'तळ्यात काय लघूशंका करावी का ?' असे वक्तव्य करणारे विरोधकही कुठेच कमी नाहीत हे सिध्द होते.

आज पक्षाध्यक्षांविषयी किंवा पंतप्रधानाविषयी काही विधान केले तर पक्षश्रेष्ठीकडून त्या व्यक्तीवर कारवाईदेखिल करण्यात येते. त्यामुळे सिंग यांना सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलपट्टी केली आहे. परंतू आमच्या महापुरूषांविषयी, शेतकरी, सैनिक, तरुण - तरूणी यांच्याविषयी अक्षेपार्य विधान करणारावर कार्यवाही का होत नाही. हे आमच्या तरूणांना केव्हा समजेल हाच प्रश्न पाडतो. तरीही आमचे तरूण स्वतः ला 'मैं भी चौंकीदार' म्हणून घेत असतील तर खुप मोठी शोकांतीका आहे. याविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,'सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये..

अन्यथा अंगठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल..!'

जे चौकीदार कधी अयोध्येत "रामाला" तर कधी पंढरपुरात "विठ्ठलाला" फसवू शकतात ते चौकीदार महाराष्ट्रातल्या जनतेला सहज फसवू शकतात! तसेच मुलींना उचलून नेण्याची भाषा करणा-या चौकीदाराला पक्षातून हकालपट्टी करू शकत नाहीत ते देश आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत आहेत..!

निवडणूकीपुर्वी नुसती जुमलेबाजी करताना कधी 15 लाख देण्याचं विधान तर कधी वार्षिक 72 हजार रूपये देण्याचं विधान हे सर्व फसवेगिरी आहे.

निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे आमच्या तरुणांनी भावणीक मुद्यापासून दूर राहून तसेच शाब्दीक चक्रव्यूहामध्ये अडकून न पडता त्यातून बाहेर पडले पाहीजे. शेतकरी कुटुंबातील तसेच सर्वसामान्य घरातील तरुणांना विनंती आहे की, सगळा देश जरी 'मैं भी चौकीदार म्हणत असेल तरी मैं नहीं चौकीदार' ही भूमिका घेऊन आता आमच्या तरूणांनी 'चौकीदार' या शब्दापासून अलिप्त राहीले पाहीजे. तसेच राजकीय लोकांचा जास्त लोड घेऊ नका. आपल्या लोड ची किंमत फक्त निवडणूक होई पर्यंतच असते. मतदान ज्याला करायचं आहे त्याला करा पण एकमेकांना तू - तू , मी - मी, तुम्ही - मी करून स्वतःची डोकी फोडून घेऊ नका. दोन दिवस साहेब किंवा साहेबांची माणसे ढाब्यावर नेतील पुन्हा घरची 'ताट - वाटी - तांब्या' आहे हे विसरू नका. निष्ठा हा रोग कायमचा नष्ट झाला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते कोणताही नेता कधीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो.

तेव्हा अडचण तुमची होते, म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात आणि सक्षम, प्रामाणिक तसेच स्वच्छ प्रवृत्तीचा उमेदवार जो समाजात राहुन आपले सुखदुख समजु शकतो आणि तो हाताला काम अन् कामाला, घामाला आणि शेतमालाला दाम मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल अशा चांगल्या व प्रामाणिक उमेदवारांना मतदान करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी चालेल.


Rate this content
Log in