Navanath Repe

Inspirational

3  

Navanath Repe

Inspirational

आजचा तरूण अन् इतिहास...

आजचा तरूण अन् इतिहास...

5 mins
1.6K


महाराष्ट्र ही साधुसंतांच्या चरणस्पर्शाने पावण झालेली भुमी आहे. याच भुमीत पुरोगामी विचारांची बिजे पेरली गेली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्या विचारांच्या वटवृक्षाखाली बहुजनांची मुल लहानांची मोठी होऊन लिहायला, वाचायला शिकली ही फार चांगली गोष्ट आहे . मात्र याच वटवृक्षाच्या छत्रछायेखाली मोठी झालेली मनुवादी आणि मनुवादी विचारसरणीची , बहुजनांची काही बाडंगुळ याच वटवृक्षावर आघात घालत आसतांना पण आमचे तरुण शांत बसुन बघतात तेव्हा, त्यांनी गुलामी स्विकारली की काय ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो असे वाटते.
बहुजनांच्या घरातील व्यक्तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, मात्र महात्मा जोतिबा फूले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मनुवादी त्रासाला न जुमानता आमच्या बहुजन समाजातील मुलांमुलींना शिक्षणाचे दारे उघडी केली. त्यामुळे आमच्या घरातील मुल - मुलीं शिकली व प्रगतीही केली ही कौतुकास पात्र गोष्ट आहे. शिकलेल्या पिढीतील तरुण मात्र धार्मिक भावनेच्या भरात आमचा इतिहास विसरत चालला आहे, याचाच फायदा घेऊन काही मनुवादी लेखक व लेखिका यांनी ज्या शिवरायांनी रक्तांच पाणी करून स्वराज्य निर्माण केल, त्या शिवरायांना इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मोगल, माना वाकवून मुजरे घालायचे. त्या शिवरायांचा इतिहास विकृत करण्याचा विडाच उचललाय की काय असे वाटते.
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की "जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही" , मात्र आमचे तरुण हे नाटक , कथा ,कांदबरी, मालिका यात सांगितलेला इतिहासच खरा इतिहास आहे असे समजून बसले आहेत.
ज्या छत्रपती शिवरायांचा उल्लेख करतांना प्रबोधकार ठाकरे म्हणतात , "केवळ शिवाजी हे नाव जरी उच्चारलं तरी ३३ कोटी देवांची फलटण बाद होते ". तसेच जगावर राज्य करणारी अमेरीका म्हणते की, आमच्या देशात जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर, आम्हाला सुपरमँन , स्पायडरमँन , बँटमँन यासारख्या काल्पनिक पात्रांची गरजच पडली नसती, आम्ही शिवरायांसारख्या सर्वशक्तीमान व चारितत्र्यवान अशा महापुरूषाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण ज्या देशात, ज्या राष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले तो देश, तो प्रांत आणि लोक मात्र शिवरायांबद्द्ल प्रचंड उदासिन आहेत. बाहेरच्या देशांमध्ये आपल्या पूर्वजांचा इतिहास हा शाळेतून तर शिकवतातच पण, मुलं जेव्हां चालायला , बोलायला , वाचायला लागतात तेंव्हा त्यांना अगोदर आपल्या महाषुरूषांच्या पराक्रमांचे आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासाचे बाळकडू दिले जाते , तर आमच्या इथे ? मनाचे श्लोक , रामायण , महाभारत , शुभंकरोती असल्या अंधश्रद्धा आणि थोतांड गोष्टी शिकवल्या जातात.
स्वतः ला इतिहासकार म्हणुन घेणा-या काही मनुवाद्यांनी ज्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी या स्वराज्याला दोन छत्रपती दिले, त्या जिजाऊंची बदनामी सततच करतांना दिसतात.
खोट्या इतिहासाच्या माध्यमातून छ. शिवरायांच्या जयंतीचा वाद निर्माण करून या बहुजन समाजात संभ्रम निर्माण केला तर जेम्स लेनच्या माध्यमातून याच महाराष्ट्रात शिवरायांचा बाप बदलला गेला आणि गुरू नसताना पण रामदास गुरू म्हणुन दाखवला तरीही आमचा तरूण जागा झाला नाही. बहुजनांच्या तरूणांची वामनदादा म्हणतात त्याप्रमाणे "ढोल ढपुले पुरुष आपुले बांगडीत गुंतले , उरले सुरले हत्तीवाले सांगडीत गुंतले" !! अशी अवस्था झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकुण ४६४ पुस्तके होती राज्यात १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी २०० पुस्तके वाटण्यात आली. या पुस्तकांमध्ये महापुरूषांची जाणिवपुर्वक बदनामी करण्यात आली होती. ज्या संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथलेखनही केले त्यांच्याबद्दल डाँ. शुभा साठे लिखित 'समर्थ रामदास स्वामी' या पुस्तकात छ.संभाजी महाराज यांचा 'दारूड्या' असा उल्लेख करून 'राजा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता' कशी बदनामी केली. तर प्र.ग. सहस्त्रबुध्दे लिखित 'छ. राजा शिवाजी' या पुस्तकात शिवरायांचे रामदासीकरण करण्यात आले , डाँ. प्रभाकर चौधरी लिखित 'सदगुणांंच्या गोष्टी' या पुस्तकात रामदास शिवरायांना म्हणतात , ' सारं राज्य मला देऊन टाकल्यावर तुम्ही काय करणार ... ? 'शिवाजी महाराज म्हणाले , मी तुमच्यासोबत येईन , भिक्षा मागेन' आणि राजांनी डोक्याचा पटका सोडुन त्याची झोळी केली.' असा उल्लेख केला तर शिवरायांना आध्यात्माची प्रेरणा देणारे त्यांचे गुरू जगतगुरू संत तुकाराम महाराजांची गोपीनाथ तळवलकर लिखित 'संताचे जीवन प्रसंग' या पुस्तकात तुकाराम महाराजांना ' हे आमच येडं' असे त्यांच्या पत्नीच्या तोंडातुन वदवुन घेण्यात आले, व तसे बदनामीकारक लिखाण केले होते . ज्या तुकाराम महाराजांच्या गाथेतील एका एका अभंगावर पी.एच.डी. चे प्रबंध बनतात त्याच तुकाराम महाराजांना आज बहुजनांतील तरूण समजुन घ्यायला तयार नाहीत ही खुप मोठी शोकांतीका आहे.
काल परवाचीच गोष्ट आहे राजेंद्र शास्त्री (गायकवाड) या मनुवाद्याने राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसहेबांची बदनामी केली. इयत्ता ११वी च्या संस्कृत विषयाच्या " संस्कृत सारिका " या पुस्तकात कुळवाडीभुषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवली मात्र त्यात मनुवादी मेंदुत असलेली घाण विक्रुत लिखाणाच्या माध्यमातुन पाहायला मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दाखवताना जाणिवपुर्वक 'महाराजस्य' नावाने लिहलेल्या वंशावळीत शिवरायांच्या पत्नी म्हणुन राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा उल्लेख केलेला आहे. वामनदादा म्हणतात त्याप्रमाणे "माझ्या आई बहीणीला नागविती ठाई ठाई , मला चिड येत नाही, मला चिड येत नाही , मीच माझ्या अब्रुची पाही विटंबना" अशी अवस्था आज आपल्या बहुजनांची झाली आहे. त्यामुळे जिजाऊंचे बदनामीकारक लिखाण असलेले पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) लिखित 'संस्कृत सारिका' , निकीता पब्लिकेशन, लातूर यांनी प्रकाशित केलेले आहे. राज्य शासनाच्या अभ्यास समीतीने या पुस्तकाला परवानगी दिली आहे. याचाच अर्थ राज्य शासनाचे अभ्यास मंडळ व सर्व शिक्षा अभियान म्हणजे महापुरूषांच्या विकृत लिखाण करण्याचा कारखाना आहे असे म्हणावे लागेल.
डाँ.पंजाबराव देशमुख म्हणत, "आम्ही तलवारवाल्यांच्या घरी जन्माला आल्यामुळे आम्ही सतत तलवारीने घरातील हत्तीचे पाय कापून त्यांचे उंदिर करत असतो, तर लेखणीवाले त्यांच्या उंदिरांचे हत्ती बनवत असतात."
संत कबीरही म्हणत, ' बहुजन सौ बकते, पर बम्मन एक लिखते'!
या आशा इतिहासाचे विक्रुत लिखाण करणा-यांना वामनदादा कर्डक म्हणतात त्याप्रमाणे "नीच नी तीचा कापू गळा ! त्या रक्ताचा लेवू टिळा !! असे केल्याशिवाय या मनुवादी पिलावळी शांत बसणार नाहीत.
मनुवादी विचारांच्या लेखकांनी केलेला हा शिवरायांचा अपमान असुन त्यांच्या विचारांचा खुन केला आहे, त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहीजे जर आपण असेच शिवचरित्राकडे दुर्लक्ष करत राहीले तर येणारा काळ तुमच्या पिढ्या तर बरबाद करेलच पण शिवरायांच्या इतिहासाचे नामोनिशानही हे मनुवादी राहु देणार नाही.
म्हणुन येणा-या काळात जर महाषुरूषांची अशी बदनामी होऊ द्यायची नसेल वामनदादा म्हणतात त्याप्रमाणे "अन्यायाची चिरा चांबडी, चिरा का चिंधड्या , चिरा करा चिंधड्या नाही तर भरा हाती बांगड्या... हे केल्यानंतर आपल्या महापुरूषांकडे कोणीही वाईट नजरेने किंवा विक्रुत लिखाण करण्याचे धाडस करणार नाही हे मात्र नक्कीच.Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational