Navanath Repe

Inspirational

3.0  

Navanath Repe

Inspirational

भारताचे मार्टिन ल्यूथर:जोतिराव

भारताचे मार्टिन ल्यूथर:जोतिराव

4 mins
1.6K


महात्मा जोतिराव फुले हे भारताचे वाँशिंग्टन आहेत असे महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणत. ते महात्मा फुले विद्येविषयी म्हणतात की,
विद्ये विना मती गेली ! मती विना नीती गेली !
नीती विना गती गेली ! गती विना वित्त गेले !
वित्ता विना शूद्र खचले ! एवढे सारे अनर्थ; एका अविद्येने केले !! असे सांगाणारे महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे संपुर्ण नाव जोतिबा गोविंदराव फुले होते तर त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचा शेती व फुलांचा व्यवसाय होता. जोतिबांना वयाच्या सातव्या वर्षी जवळच्याच शाळेत पहिलीच्या वर्गात घातले. जोतिबा अत्यंत तल्लख व बुध्दीमान असल्यामुळे पहिल्याच वर्षी त्यांचे वेगवेळेपण प्रभाव निर्माण करत होते. पण त्याचवेळी त्यांच्या घरी शेतीचे हिशोब करण्यासाठी ठेवलेला एक ब्राम्हण कारकून होता. त्यांने जोतिबांचे शिक्षणातील तेज ओळखले व त्याच्या मनात भिती निर्माण होऊ लागली की, हा जोतिबा मोठा शिकला तर आपली नौकरी जाईल म्हणून त्याने जोतिबाचे वडील गोविंदरावांना मुलगा शिकला तर शेती बुडेल, नुकसान होईल, शिक्षणामुळे मुलं बिघडली जातात त्यामुळे मुलाला शाळेत पाठवू नका असे सांगितले. हे म्हणणे गोविंदरावांना पटले त्यांनी तात्काळ शाळेतून जोतिबांचे नाव कमी केले. त्यावेळी जोतिबा खूप रडत होते. नंतर मग त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत उत्तम प्रकारची फुलाची शेती केली. त्याचवेळी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील नायगाव येथिल खंडोबा नेवासे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी १८४० मध्ये झाला. लग्नानंतर ते दोघेही फुलशेती करत होते. त्यानंतर जोतिबांची भेट गफार बेग मुन्शी या एका मुस्लिम विव्दानांशी व खिश्चन विद्वान लिजिट यांच्याशी संपर्क आला त्यावेळी त्यांना समजले की, जोतिबा हा खुप चाणाक्ष आणि हुशार मुलगा आहे. तेव्हा त्यांनी गोविंदरावांची भेट घेऊन जोतिबाला शाळेत पाठवण्याची विनंती केली. वडीलांनी ही विनंती मान्य करून जोतिबांना वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजेच १८४१ रोजी परत इंग्रजी शाळेत पहिल्या वर्गात घातले.
विद्यार्थी जीवनातच जोतिबांना गफार बेग मुंशी यांनी कुराण तर लिजीट यांनी बायबल समजावून सांगातले होते. त्याशिवाय जोतिबांनी हिंदू धर्मातील इतर ग्रंथही वाचले त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दु, तसेच मोडी भाषा लिहता बोलता व वाचता येत होत्या. त्यांनी पुण्यातील पेशवाईचा त्रास त्यांनी अनुभवला होता. त्यांच्या ब्राम्हण मित्राच्या लग्नात त्यांना काही कर्मठ सनातनी ब्राम्हणांनी वरातीतून हाकलून दिले होते. हा आघात त्यांच्या मनावर बसला होता त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म शास्त्रांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. तेव्हा त्यांना हिंदू धर्मातील मनुस्मृती संहितेनूसार निर्माण झालेली चातुर्वण्य व्यवस्था लक्षात आली. तसेच पवित्र कुराण व हजरत महंमद पैगंबर यांच्याबाबत आत्यंतिक आदर होता. त्यांनी तथागत गौतम बुध्द, बळीराजा, छ. शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान समजून सामाजिक परिवर्तन केले.
जोतिबांनी देशात सर्वप्रथम शिक्षणाची सुरूवात ०१ जानेवारी १८४८ ला केली. त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून चार वर्षात २० शाळा चालू करून विनावेतन स्त्रियांना शिकवण्याचे कार्य केले. त्यांनी बालविवाहाला विरोध तर पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. आपली पत्नी सावित्रीला शिक्षण देऊन त्यांनी 'चूल - मूल' यावरच आघात केला. त्या प्रेरणेतून सावित्रीमाईंनी स्त्रियांचा आदर करत १०० स्त्रियांचे बाळंतपण केले. तसेच सावित्री - जोतिबांनी विधवांच्या केशवपनाला विरोध केला त्यांचे म्हणणे होते की, स्त्रियांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी आहे.
महात्मा जोतिबा फुलेंनी बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी लेखन करताना 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून बहुजनांना गुलामीची जाणिव करून दिली. तसेच शिवाजी महाराजांचा व हजरत महंमद पैगंबरांचा पोवाडा, शेतक-यांचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म व तृतीयरत्न हे देशातील पहिले नाटक लिहले. ते एक उत्स्फुर्त, विचारवंत, संशोधक व साहित्यिक होते. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच आज काही पुरोगामी विचारांच्या संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यांनी जिवनभर अज्ञान, अंधश्रध्दा, विधवा विवाह, अस्पृश्यता व ज्वलंत प्रश्नावर लढा दिला.
महात्मा फुलेंनी पुणे येथिल भिडे वाड्यात पहिली शाळा काढून शिक्षणाचा प्रचार - प्रसार केला. पहिलीपासून शिक्षणामध्ये इंग्रजी भाषा असावी याचा पुरस्कार सावित्री - जोतिबा फुलेंनी १५० वर्षापूर्वीच व्यक्त केला होता. भारतीय शिक्षण आयोग म्हणजेच हंटर आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा यासाठी निवेदन देऊन धारेवर धरले होते. तसेच ते शिवजयंतीचे जनक, सत्यशोधक समाजा या चळवळीचे संस्थापक होते. याशिवाय त्यांनी शेतकरी, नाभिक संघटनांच्या कार्याची सुरूवात केली होती.
महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी काही महापुरूषांची व विचावंतांची काही मते आहेत ती म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहु महाराज म्हणत की, 'महात्मा जोतिराव फुले हे भारताचे मार्टिन ल्यूथर आहेत'. तर 'जोतिबा की नीति, उनका तत्वज्ञान यही लोकतंत्र का एकमात्र सच्चा मार्ग है !' असे डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. तसेच 'शिक्षण आणि समाज परिवर्तनासाठी या भूमीत कायावाचामने चंदनासारखा झिजलेला पहिला महापुरूष महात्मा जोतिराव फुले' असे माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत म्हणतात, तर डाँ. आ.ह. साळुंखे म्हणतात की, 'वेदप्रामाण्य आणि परंपरागत मूल्ये महात्मा फुले यांनी नाकारली' याशिवाय 'महात्मा जोतिराव फुले हे बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक आहेत' असे शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात.
ब्रिटीश शासनाने महात्मा जोतिबा फुलेंचा प्रचंड असा मोठा सत्कार केला होता. त्यावेळी जनतेनेच त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली होती. महात्मा ही पदवी म्हणजे आज मागणी होणा-या भारतरत्न पेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. हे सरकार सावित्री - जोतिबांना भारतरत्न पुरस्कार देत नाही परंतू इतिहासाचे विकृतीकरण करणारांना पुरस्काराने सन्मानित करते तसेच महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणणा-या मनुवादी मनोहर कुलकर्णी यांना हेच सरकार पाठीशी घालतेय ही खूप मोठी शोकांतिका आहे.
आजही मनुवादी लोकांना महात्मा फुलेंच्या विचारांची व साहित्याची धसकी भरतेय म्हणून तर मनोहर भिडे सारखी विकृती महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणते. परंतू नेल्सन मंडेला ह्या आफ्रीकन नेत्याने 'गुलामगिरी' या पुस्तकाची इंग्रजी भाषेतील 'अर्पणपत्रिका' वाचल्यास गुलामांच्या हक्कासाठी लढणारा 'जगातील पहिला महामानव' असा विचार मांडला आहे. अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


'विद्वान शुद्रांनो जागे व्हाना ! तपासोनी पहाना !! ब्रम्हघोळ !!




Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational