भिंग...(भाग -१)
भिंग...(भाग -१)
(भाग -१)
दिवसामागे दिवस लोटत होते काही केल्या अडचणी मात्र संपत नव्हत्या ,आठवणीचे क्षण पुन्हा पुन्हा छळत होते. मोठा झालो ह्याची खंत नव्हती, कमाई करावी इतकी अक्कलही आली नव्हती म्हणा , सहजच भिंतीवरच्या आरशासमोर रोजच्याप्रमाणे आलो आणि प्रश्नाचा पाठलाग सुरू झाला.
स्वतःच्या प्रतिमेसमोर अगदी हिनवलो गेलो , अगदी कोणीही न बोलणारा माझ्याशी प्रत्यक्षात आज आरसा बोलू लागला , एक हाक आली पाहत होतो, माझ्यावर जणू चाबकाचा मारच बसत होता आणि ती हाक पडली.
अर ए "टोनग्या "काहीतरी कर ,असं काहीतरी तो माझ्याशी हिसकावून बोलला. झालं की पुर्ण आता शिक्षण, तुझ ते आता बास कर. मायकड बाबाकड बघ,हे वाईट वाटत होतं पण तेवढेच सत्य पण त्याच कुठे चुकत होतं म्हणा, मला पण लाज वाटली थकलेला माझा बाप सारखा माझ्याकडे बघतोय याची मला कधीच खंत वाटली नव्हती माय काही बोलत नव्हती तिला पण खूप आशा होतीच हो.
अगदी शिक्षणापासून ते शिक्षण होईपर्यंत दिवसा मागे दिवस गेले आणि हाती काम घेण्याचे अजुन काही मणी धरलच नव्हत, कमवायचा आणि वयाचा कधी विचारच केला नाही , तो मात्र आपल्यावर टोमणे मारण्यासाठीच . अगदी त्यांन बोलुन टाकलं शेजारचा गणप्या बघ काही नाही शिकला पण बापाला काम करू नाही देत, माईला बाहेर जाऊ नाही देत, खूप काही जबानी मार बसत होता त्याच कुठे च
ुकत होतं .
त्याचं कुठे चुकत नव्हतं पण थोडे भरकटलेला अगदी मनाला लागून गेली होतं आणि कोणाशी काय बोलावं हे माझ्या पशी उरलंच नव्हतं बोलण्यासारखं म्हटलं तर शिवाय माझा डिग्री पण त्याला आता कोण विचारते वेळ गेली होती निघून, प्रश्न मोठा होता की करायचं काय?
स्वतःचाच चेहरा पण व्हावी अशी इच्छा होत नव्हती.
एके दिवशी मनाने धाडसच केलं की प्रश्न विचारायचा तो आरशाला की जे केलं ते मी काही चुकीचं केलं का रे बाबा
हो तर मग जायचं ठरलं त्या भिंतीवरच्या टांगलेल्या आरशासमोर काही बोलावं तेव्हाच आरशावरचा कंगवा माझ्यासमोर पडला किती दिवसाचा होता की माहित नाही पण त्याची दात मोडले म्हणून फेकून द्यावं अशी अवस्था , बाहेर फेकून द्यावं तेव्हाच हळूच बोलला राजे आमचा मुक्काम संपला वाटतं .
मनाला चिरून जाव आणि एखाद्या दगडातून पाणी पाजराव असं काही परिस्थिती झाली . थोडं मी माझ्या मनाला विचारलं किती दिवस तू पण असाच बसणार एके ठिकाणी कुजणार पुन्हा तुझं पण असंच का असे प्रश्न स्वतः स्वतःशीच खेळत होते.
अत्यंत अडचणी असताना सुद्धा काही केल्या पर्याय नसतानाही असं काही मनाने गट्टी केली . धावत धावत क्षितिजाकडे एक शांत नजर टाकली आणि चुकलेले पर्याय शोधण्यात व्यस्त झालो मात्र प्रश्नाची यादी अजून संपली नव्हती.