बहीण🌹
बहीण🌹
*कोण म्हणतं बहीण ओवाळणी साठी ओवाळते*
*भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळते* *
भाऊरायाच्या रूपाने माहेर येतं घरी
म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी*
*या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं* *
माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डोलावं*
*कशी आहेस ? एवढाच प्रश्न सुखाऊन जातो*
*दुःखात सुद्धा एखाद-दुसरा आनंद अश्रू येतो*
*साडी आणली का नोट कोणी पहात नाही*
*भाऊ दिसे पर्यंत तिला घास जात नाही*
*लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं*
*बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं*
*उपटलेल्या रोपट्या सारखं सोडावं लागतं माहेर*
*जन्मदात्या आई कडून स्वीकारावा लागतो आहेर*
*वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो*
*भावासाठी काळजात एक सुंदर खोपा असतो*
*रक्षाबंधन , भाऊबीज हे फक्त नाहीत सण
बहिणी साठी ते असतं समाधानाचं धन सुरक्षेचं कवच*
*आणि पाठीवरचा हात बहिणींसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात*
*कुणीतरी आपलं आहे भावनाच वेगळी असते* *म्हणून बहीण दाराकडे डोळे लाऊन बसते*
*रक्षाबंधन , भाऊबीज दिवस राखून ठेवा आईच्या माघारी बहीणच आई असते*
