OM Maind

Tragedy Inspirational Thriller

3  

OM Maind

Tragedy Inspirational Thriller

मामा एक प्रेमळ नातं

मामा एक प्रेमळ नातं

1 min
319


परिस्थिती ने गरीब असला तरी* *मामाच प्रेम मात्र श्रीमंत असत*

 To all lovely *मामा*..


मामा दोन अक्षरी पण एक भारदस्त व आईच्या गणगोतातील आईच्या सर्वात जवळच नातं.आईपेक्षा वयाने लहान जरी असला तरी आई त्याला आदराने भाऊच म्हणणार.... आईच्या प्रत्येक हाकेला धावणारं व आईच्या हक्कासाठी तीच्या सासरच्या मंडळीं बरोबरही दोन हात करण्याचं धाडस करणार एक उमद नात.


बालपणात अंगाखांद्यावर खेळवणारा मामा आपण वयाने जसं मोठे होतं जातो तसच बारीक लक्ष ठेवुन राहतो.बालपणात आईबरोबर मामाच्या गावाला गेल्यावर,प्रवासाची दणदण होऊन जर रात्री अपरात्री आपल्याला दुखंन आल्यावर दवाखान्यात नेणारा मामा आठवला का मन हळवं होतं. मामांनी दिवाळीला घेतलेले कपड्यांची बातच न्यारी असायची,तो कायम बजेट करुन दुकानात यायचा आण आम्ही त्यांचं बजेट कायम मोडीत काढायचो.तरीही मामाचा चेहरा हसराच असायचा.लहाणपणी सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर तिथं फक्त आईच्याच नावाने का ओळखले जातं?या प्रश्नाच उत्तर आत्ता मिळालं.एखाद्या दिवाळीला मामाने जर कपडे नाही घेतले तर मामाच्या मोठेपणा कमी होऊ नये म्हणून आईने स्वत:च्या पैशात मामाचं नाव करुन घेतलेले कपडे ही असायचे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy