STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Action Inspirational

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

3 mins
138

तुमचं रुबाबदार राहणीमान आणि वागणं नको त्यांच्या मदतीला धावून जाणं नी दुसऱ्या साठी जिवाची पर्वा न करणं, लोकांसाठी पाण्याप्रमाणे पैसा उधळण कुणाला जमलं ही नाही आणि जमणार ही नाही.. तुम्ही सारी दुनिया फिरलात साऱ्या जगाचे ज्ञान तुम्हाला होते. आम्ही सर्व तुमच्या समोर खरंच चिल्लर,कस्पट, साधेसुधे पण केवढा आदर नी अभिमान होता आम्हाला.. तुम्ही गेलात नी कितीतरी जनांचा आधार गेला तात्या..... तुमच्यामुळे कोणताही कार्यक्रम कार्यक्रम च व्हायचा.. तुम्ही साऱ्या दुनियेला खाऊपिऊ घालून, दुनियेची खरी दिवाळी नी लेकरा बायकोची होळी करून गेलात... तात्या हे व्हायलाच नको होतं पण झाले.. झाले ते फार फार वाईटच.. तात्या तुम्हाला खराब म्हणणारा खरंच कोणी सापडणार नाही.. कारण तुमचा कोणताच गुण कुणाला जमणार नाही..

तात्या तुम्ही गुणवान नी आदर्श होतात जगाशी कसं वागावं हे तुमच्या कडून च शिकायला मिळते पण तात्या तुमची इमानदारी नी जगाची बेइमानी ह्याचा मेळ जमला नाही..तुमची घुसमट झाली ती ..केवळ तुमच्याकडे.. उद्योग धंदा,नी कमाई नसल्याने.. तुम्ही चैन केलात तुम्हाला लोकांनी खाल्ले...नौकरदाराच्या वरचं जगलात नी जगवलात.. तुम्ही कधीच स्वतः नी स्वतःचा संसार, मुलं नी बायको ह्याचा विचार च केला नाही.. तुम्ही जगाच्या कामीं आलात.. जगाचे भले केलात..कधीच कुणाला शब्दाने दुखवले नाहीत.. तुमचं नुसते नाव घेतले तरी समोरचा माणूस खूष होतो..काय माणूस होता म्हणून तुमचं गुण गातो.. तात्या तुम्ही जेवढी दुनिया बघितली तेवढं बघणारे फार कमी... तुमचं ज्ञान,वर्तन नी अर्थशास्त्र जुळले नाही..गाव सोडून तुम्ही राजासारखं जगला असतात तात्या पण इथली माणसं नी इथली माती यावर तुमचा लई जीव म्हणून तुम्ही इथल्या माणसासाठी नी ह्या मातीसाठी तुम्ही स्वतःला संपवलं तात्या..त्या ताईच्या कंपाळाचं कुंकू पुसलं हे आम्ही कसं पाहावं.. तात्या त्या लेकरांनी तुम्हाला कुठं शोधावे.. तुम्ही खूप विचारी होतात तात्या म्हणून तुमच्या डोक्यात तो विचार आला.. लोक काही ही म्हणोत.. बिनविचारी माणसं काहीही करत नसतात... तुमच्या विचारातून च हे घडले पण तुमच्यासारख्या माणसाला हे योग्य नाही वाटत.. तात्या राहिला प्रश्न मदतीचा तर खरं सांगतो तात्या तुम्हाला माहिती होते की तुम्हाला वारंवार किती तळमळीने बोलायचो..तुमचा कोणताच शब्द रिकामा जावू दिला नाही.. तुम्हाला हवी ती मदत करायला तत्पर होतो तात्या.. पण तुमचं मनच तुम्हाला खात होतं...

     तात्या काय काय म्हणून आठवू,बोलू नी कुणाला सांगू तात्या, सुखदुःखात तुमच्या सारखा माणूस नाही तात्या... आईसाठी तुम्ही नायगाव पर्यंत आलो होतो... घटना ऐकून गावाकडे जावून सारं काही तुम्हीच केलात तात्या, आम्हाला तरी कोण होते... आईचं सारं सारं तुम्ही केलात ते आठवलं की वाटते तुमच्या सारखा माणूस नाही.. आम्हाला तुमचा फार मोठा आधार होता..तो आधार आम्हाला हवा होता... तुम्ही आमच्या वर एवढी वाईट वेळ आणाल असं वाटलं नव्हतं... तात्या अर्धांगवायू ने तुम्ही खरंच अर्धांग होऊन लवकरच बरे झालात आणि जिद्दीने मात करून शेवटी देवाला प्यारे झालात...

   तुम्ही जगायला हवं होतं तात्या... कितीतरी लोकांना तुम्ही फोन केलात पण काळ वाईट होता.. तुमचं माझं बोलणं नाही झाले... कदाचित.. कदाचित तुम्हाला तारलं असतं... घडले ते वाईट घडले तात्या.. चुकलात तुम्ही शेवटी चुक केली...

     क्षमा करा तात्या अंतःकरणातील शब्द आहेत.... अश्रू आपोआप येतात.. तात्या निघून गेलात अतिशय वाईट झाले... कुठे शोधावे... लेकरांनी पप्पा म्हणून तुम्हाला....

शब्द हरवले तात्या...


भावपूर्ण... अश्रू पुर्ण श्रद्धांजली....

शेवटी एकच म्हणेन तुम्ही देव माणूस होतात...उरली तुमची आठवण... तुमचं मोठेपण...

खरंच तात्या तुम्ही महान, आदर्श होतात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy