भाड्याची सायकल...
भाड्याची सायकल...


१९९०-९१ चा काळ होता तो...
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...
बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं.
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...
👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे.
● जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी...
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून
तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 💫
तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 🤩
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 🧐
एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 🚲
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 👍🏻
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो.
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 😀
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो... 😇
खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 😊
पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही....
आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या
मुलांच्या सायकल वर 🚲 नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या
सायकल ची किंमत अन् मजा यांची सर
आता असलेल्या बुलेट ला पण येणार नाही... 🏍
गेले ते दिवस...🍁
राहिल्या त्या आठवणी......🍂