बेवारस.... मी
बेवारस.... मी


।। बेवारस मी ।।
भाग (1)
काय होता गुन्हा ! जन्म घेताच.... बेवारसीपणा नशिबी आला.... कचराकुंडीत फेकणारी जन्मदात्री एवढी निष्ठूर का..... झाली ? ....जन्माचं स्वागत आनंद साजरा करुन वाजत गाजत होते म्हणे ....मग मलाच का !.......किड्यामुग्यांचा, दुर्गंधीचा ....सहवासात सोडून दिलं .....? मासांचा गोळा समजून कुत्रीमांजरी टपलेलीचं होती मला फाडून गिळायला .... कारण कुणीच नव्हते माझी देखभाल करण्यासाठी .... कारण मी अनैतिक संबधातून जन्माला आलेलो म्हणे ..... माझे आईबाप ( माहिती नसलेले ..) सामाजिक बंधनात नव्हते ....अन् त्यांनी एका भावनिक वासनेच्या क्षणी, काहीही विचार न करता माझं बीज रूजलं गेलं ... खूप प्रयत्न करूनही त्यांना रूजू घातलेलं बीज निष्क्रिय नाही करता आले.....शेवटी नऊ मास कुशीत लाचार होऊन वाढलेले जितंजागत्या ईवलाश्या देहापासून मुक्ती मिळवली ... आणि मोकळे झाले . मला बेवारस सोडून ....
काय गुन्हा होता हो माझा ? असेलही तूमचे एकमेकावर प्रेम, असेलही भावनिक शारीरिक अवस्था, असतीलही मला नाका-याण्याची कारणं ....पण काय अधिकार होता तुम्हाला मला अन माझं आयुष्य बळी द्यायचा...
तूमचा संयम, तूमचा सन्मान , तूमचा सद्वविवेक बुद्धी , मर्यादा , नैतिकता, तूमचं स्बबळ , आत्मभान ,कुठे हरवले होते...याचे भान का नाही ठेवले.... जर माझा स्विकार करण्याची हिंमतचं नव्हती तर का ? नाही ठेवू शकलात स्वतःला काबूत कशाला झालात मदनात बेकाबू ....का परवड केलीतं माझी.....अन कशासाठी ...???
भाग (2)
फक्त एका क्षणिक शारीरिक सुखासाठी तूम्ही माझ्या आयुष्याला डाग लावलात .... जेव्हा लोक बोलतात याचा / हिचा जन्म पापातून झाला तेव्हा निष्पाप मी... खूप हळवा होतो आणि शरम वाटते स्वतःचीचं.... अभिमन्यू सारखी भळभळती जखम सतत सोबत घेऊन जीवन जगतोयं मी... देवाची कृपा म्हणून मला एका दात्याने जीवदान दिले , स्नेहालयात भरती केले तूमची माया तर माहिती नाही कशी असते ती...पण येथे एक बेवारस जीव म्हणून खूप मायाममता मिळाली. परक्यांच्या दानधर्मातून जगलो मी , जगतोयं मी आणि वाढतोय... शिकतोही आनंदी आहे मी... अनाथालयात राहतो मी... खंत एकचं कोणी जन्म दिला
असेल मला , काय मजबूरी की मगरूरी असेल म्हणून मला बेदखल , निराधार केले असेलं... या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत मला ....कारण आई तु फेकलेला मांसाचा गोळा .... हो मासाचा गोळाच न तुमच्यालेखी कारण मी एक हाडामासाचा कोवळा जीव होतो ग ...... जिवंत असेल की मेला असेल हा प्रश्न तुलाही नक्कीचं भेडसावत असेल आणि नकळतपणे अश्रूंची तिलांजली देत असशील तु माझ्यासाठी....
की..... तुझ्या सुखात विसरलीस मला! पण ....मी नाही विसरलो ग ...कारण नऊ मास तरी तूझ्यासोबत होतो ना मी तू नाईलाजाने का होईना मला आसरा दिलेला त्या काळात ...दूर सारताना मला काहीच दुःख झाले नाही का ग तूला .... की हतबल होतीस तु ,नाईलाज होता तूझा की सुटका हवी होती तुला पापातून नेमकी काय भावना होती तुझी .... आई... बाप तर हात झटकून मोकळाचं असेल ना त्या क्षणापासून... तूचं तेवढी गुतंली नऊ मास.... तु तरी भान ठेवायचं ग ना आई अनैतिक संबध बेबंध करताना, तुमचा तो सुखाचा क्षण माझ्यासाठी एक शाप ठरला गं...जन्मभर माथी डाग कोरला ग ..... निराधार, बेवारस ....!!!
अनैतिकतेचा माथी शिक्का
बोडक्या कपाळी काळा बुक्का
पाप्यांचं पोर म्हणून ,जग
देई निष्पाप जीवाला धक्का...
भाग (3)
बाप.... तर माझा फिरत असेल उजळ माथ्याने ,....आपण कुणाचेतरी आयुष्य कलंकित , असहाय्य , पदोपदी अहवेलना , बोचणा-या मनवेदना देऊन खूप पुरुषार्थ गाजवला म्हणून खुश असेल का ? माझे काय झाले असेल हा प्रश्न मनाला सतावत नसेल का ...स्वतःची शारीरिक गरज भागवताना ,....परीणाम माहिती नव्हते का ? तोंड लपवून ,पाठ फिरवून कसले पुरूषी सत्कर्म केलेस तू .... माझी भविष्य काय! सोयीस्करपणे विसरलास !!! तू एक भ्याड पुरुष आहेस ....मौजमजेपायी मला पणाला लावलेस . ...एक सुखद वेदना .... आयुष्यभर मला यातना....
श्वास माझा गुदमरतो
तू मोकळा फिरतोस
एका जीवाची फरपट
करुन , तू स्वतःला पुरुष समजतो...