Ajay Nannar

Inspirational

3  

Ajay Nannar

Inspirational

Being A Leader

Being A Leader

2 mins
237


एक खरी गोष्ट आहे....

   एकदा बिझनेस या विषयावर एका वक्ता ने त्याचे सेमिनार कॉलेज हॉल मध्ये सुरु केले. त्याची सगळी माहिती देऊन झाल्यावर त्याने एक खेळ खेळायचे ठरवले...त्याने 100 रु ची नोट घेतली व ती खरी आहे का खोटी हे पाहण्यासाठी त्यांनी दोन मुलांना सांगितले तर ती नोट खरी होती....त्यांनी आता ती नोट खाली टाकली , तिच्यावर पाय देऊन ती चुरगळली. हातात घेऊन पन ती चुरगळली. व ती नोट आता फारच खराब दिसु लागली होती. त्यांनी आता ती नोट परत दाखवली व ती घेण्यासाठी त्यांनी एक अट ठेवली. त्यांनी ती नोट 20 रु च्या बदल्यात देण्याचे ठरवले. व आता ती नोट घेण्यास त्यांनी हॉल मधील सगळ्यांना विचारले. जो तो कुजबूज करत होता आता काय करायचे . यात खुप रिस्क आहे. कठीन आहे हे असे म्हनुन सगळे गप्प बसले. सगळा हॉल आता शांत झाला.2-3 मिनीट झाले कोनीच ती नोट घेण्यास तयार नव्हते. तर जिथे सगळे हा विचार करत होते यात रिस्क आहे तिथे अचानक त्यांच्यातुनच एक मुलगा खुर्ची सोडुन उठला व ती नोट घ्यायला गेला. तो समोर गेला त्याने 20 रु दिले व ती 100 रु ची नोट हातात घेतली.           

वक्ता ने सगळ्यांना विचारले एवढ्या जणांतून फक्त एकच जन उठला. 100 रु ची नोट मधुन 80% प्रॉफिट याचा झाला आणि 20% त्यांचा झाला. याचे तात्पर्य शेवटी त्यांनी सांगितले, तर मित्रांनो जीवनात हाच सगळ्यांच्या पुढे जाणार आहे कारण या गोष्टीत रिस्क तर होतीच तसेच आपल्या जीवनातही रिस्क येतातच त्याला आपन पार केले पाहिजे , त्यासाठी ती रिस्क आपन हार न मानता हातात घेतली तरच आपन पुढे जाऊ शकतो आणि रिस्क वर मात करु शकतो. आपले विचार नेहमी सकारात्मकच ठेवा. आणि हसत रहा.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational