Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

बालपण...

बालपण...

2 mins
269


"बालपण ..." आपल्या सगळ्यांच्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ...पुन्हा लहान होऊन तसचं निरागस जीवन जगता आलं तर किती मज्जा येईल ना ! लहानपण म्हणजे एक निखळ आनंद .पाऊस आला की मुद्दाम भिजणं , मित्रांसोबत मनसोक्त दंगा करणं , मनाला वाटेल ते आणि तसं खाणे , मनमोकळे हसणे , रुसणे , खोटं खोटं भांडण आणि नंतर होणारी दोस्ती , ते चोरुन डब्बा खाणे , लाड करून घेणे ...एक ना दोन किती आठवणी त्या बालपणीच्या ! आणि किती दिलखुलास जगणं ...विचार करुनही खरंच किती रिफ्रेश होतो ना आपण !


आता लहान लहान मिळणे शाळेत जाताना पाहिलं की वाटतं आपण किती मस्त दप्तर हलवत पळत पळत जायचो शाळेत पण ही छोटी छोटी मुलं दप्तराच्या ओझ्यामुळे पाळण तर विसरणार नाहीत ना ...पण आजकालच्या शाळेत वेगळ्याच गमती असतात ...खेळायला खूप गोष्टी , प्रेमळ टीचर , मस्त मिळणारा खाऊ आणि लाड करणारे सगळे त्यामुळे आजकाल मुलं खूपच आनंदात शाळेत जाताना दिसतात .नाहीतर आपण ...शाळा बुडवण्यासाठी काय काय करायचो ! पोट दुखी तर ब्रम्हासत्रच , हो ना कारण कधीही , कुठेही आणि कसाही पोट दुखू शकतं म्हणून शाळेत जायचं नसलं हमखास पोट दुखायच आणि एकदा घरी राहण्याची परवानगी मिळाली की पटकन थांबायचंही .


टाइम मशीन मिळालं असतं तर मस्त काही वर्ष मागे जाऊन बालपण पुन्हा एन्जॉय केलं असतं , हे माझ्या नेहमी मनात येतं . असो... आता आपण पुन्हा लहान तर होऊ शकत नाही पण आपल्या मुलांसोबत तर आपण आपलं बालपण पुन्हा जगू शकतो ना ! 


एकदा एका लहान मुलाला मुद्दामून पाण्याच्या डबक्यात उडी मारताना पाहून मी पुन्हा लहान झाले ...इकडे तिकडे कोणी नाही पाहून मी सुद्धा हळूच त्या डबक्यात उडी मारली ! काय मज्जा आली म्हणून सांगू !!आता पाऊस आला की मी मुद्दाम भिजते , लहान मुलांशी मस्त खेळते आणि भांडतेही ...झाडावरचे पक्षी , फुलपाखरे , कधीतरी दिसणारं इंद्रधनुष्य या गोष्टी आवर्जून एन्जॉय करते आणि खरंच थोड्या वेळासाठी का होईना पण अगदी लहान होऊन जाते ! आणि आपल्या बालपणीच्या सख्यांशी मनमुराद गप्पा मारून पुन्हा त्या आठवणीत रमायचं .


खरं टाइम मशीन कधी मिळेल ते मिळेल तोपर्यंत आपल्या मनाच्या टाइम मशीनने बालपण एन्जॉय करायला काय हरकत आहे ?

बालपणीचा काळ सुखाचा ....आता राहिलं नेहेमीच सोबतीला ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational