बालमजूरी
बालमजूरी
बालश्रमिक बालकांच्या जीवनावर मोठे संकट आहे.
बालपण है मासूम कोमल असते. जसे-जसे मुले मोठी होतात .आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्न करीत असतात.आणि निरनिराळे स्वप्न बघत असतात.आपल्या बुद्धिनुसार मुले छोटी मोठी स्वप्न बघत मोठी होतात. डॉक्टर बनू, इंजीनियर बनूं,टीचर बनू, लेक्चरर होवू किंवा ऑफिसर ,कलाकार होवू असे अनेक स्वप्न घेवून जगतात. त्यांचे एंजॉय करण्याचे दिवस पण कुठे काय,चांगले कपड़े चांगले खाणेपिणे त्यांना आवडतात.कुणा मुलांना फिरायला जाणे किंवा खेळ मैदानात,शिक्षणाची प्रचंड ओढ असते ,प्रशिक्षणात आवड असते. परंतू ती मुले अतीशय गरीब घरची असतात. म्हणुन त्यांना या सर्व गोष्टी स्वप्नातच बघायला मिळत असतात. प्रत्येक गोष्टीत ती आपली मन मारून जगत असतात.
जगात आज कित्येकच मुलांना दोन वेळेचे अन्नही बरोबर मिळत नाही.म्हणुन या बालकांना लहानपणा पासूनच मजूरीकाम करावे लागत असते. याचे कारण गरीबी आहे हे आपण ठामपणे सांगू शकतोय.गरीबीत मुंलाना नको नको ते काम करावे लागते. आणि ते आपल्या जीवनात अतिशय कठिन भयंकर परिस्थितिचा संघर्षमय सामना करतांना दिसतात.आणि आई वडील काय करतात की एकापेक्षा जास्त मुंलाना जन्म देवून त्यांचेवर उपकार करीत असतात.मुलांना आईबाप आपली प्रॉपर्टी समजून त्यांचा छळ करतात त्यांना खालच्या प्रतीचे कामे करायला भाग पाडतात.तेंव्हा नाइलाजास्तव त्या लहानग्या मुंलाना आईबापाचे ऐकावे लागते. तश्या परिस्थितित मुंलाना मजूरी करावी लागते.किंवा आई बाप काही मुलांना भीख मागायला लावतात.ती लहान लहान मुले मंदिरा समोर, मस्जिदी समोर,चर्च समोर, कधी फुटपाथ व सिनेमा हॉल समोर रेल्वे स्टेशन समोर भीख मागतांना दिसतात. कोवळ्या वयाच्या मुंलाचे खेळण्या बागड़ण्याचे दिवस असतात. पण त्या वयात त्यांना ढोरमेहणत करावी लागते. किशोरांच्या हातात खेळणे,पाटी पुस्तक असायला हवी,त्या वयात मुले कठिन जीवन जागतात.तशीच आपल्या भारतात करोड़ोंच्या संख्येत बालमजूरी करणारे आहेत. ती रोजच कामावर जातात व आलेल्या मजूरीच्या पैशावर नशा करून मुलांना मारणे,शिवीगाळ करणे इत्यादी गोष्टीने लहान मुलांच्या मनावर खूब तान येतो.पंरतू ती फुलासारखी स्वच्छ मनाची मूले या सर्व गोष्टी सहन करतात ,त्यातुन काही पळून जातात आणि अापले जीवन संकटात टाकतात.या मानसिकतेला काय म्हणावे!
ही गोष्ट नीयतीलापण माहित नसावी म्हणुनच जगात बालकांसोबत अतिशय भयानक खेळ खेळले जातात. याला कोण जवाबदार आहे.या छोट्या छोट्या जीवांनी काय पाप केले असेल.त्याचे जीवन जीवंतपणीच नष्ट होत असते. बालकांची दुर्दशा पाहावल्या जात नाही.दूसऱ्याचे जाऊ द्या पण बहुतेक आईबापच दुर्दशेची देण आहे.असे मला वाटते.
या गोष्टीत निश्चितच यथार्थ लपलेले आहे.या अशिक्षित, अडानी लोभीलबाड आई बापाच्या स्वार्थापायी मुलांचे जीवन संकटात आहे.आपल्या मुलांनाच वाळीत टाकतात. इतकी लाचारी भारताऐवजी कुठेच दिसत नाही.सर्वात जास्त बालश्रमिक आपल्या देशात आहेत. कीती किळस येण्यासारखे जीवन जगत आहेत.कीड्या मुंगी सारखे सरपटून लाचारीचे विदारक चित्र अंगावर काटे उभे करतात.
आपल्या भारत देशाच्या तरक्कीला ही गरीबी मोठा श्राप आहे.या गरीबीने देशात थैमान घातला आहे.ही दयनीय तथा विदारक परिस्थितिचा कोमल मुंलाच्या मनावर किती वाईट परिणाम होतोय,त्याची काही मोजमाप नाही.त्याच्या जीवनावर सतत रोग राईचे संकट नाचत असते.त्यातुन काही मुले आपली जीवन यात्रा संपवितात.
काही कुजून झूरून जगतात.
त्यातच कित्येक छोटी छोटी मुले नरक यातना भोगत असल्याचा दिसून येतय. काही दिवसाच्या आधीची गोष्ट आहे आमच्या बाजूला शेजारी राहतात त्यांच्या घरी संडासाचे टाके भरले,वह पाइपलाइन चौकप झाली होती होती तेव्हा त्यांनी नगर परिषदला सुचना केली.पंरतू त्यांच्याकडे पुरेशी सुविधा नसल्यामुळे प्राइवेट सफाई कामगाराला बोलविले.ती साधारन मोठे युवक होते. त्यांनी ते टाके साफ करण्याला होकार दिला. त्यांनी नरकाचे टाकी उपसायला सुरवात केली,अर्धे अधिक उपसल्यानंतर त्यांनी एका छोट्या दहा अकरा वर्षाच्या मुलाला टाक्यात उतरविले त्या छोट्या मुलांने टाकीतून बकेट भरून मैला वरती दिल्या, त्या नरकाच्या टँक मध्ये किती विषारीवायु गॅस भरून होती त्या गॅसमध्ये मुलगा गुदमरल्यासारखा झाला होता. घामाने लतपथ झालेला मुलगा सारखा कार्यात दंग झालेला होता.एक दिड तास तो टाकीमधे होता .त्याने पूर्ण टाकी साफ केली होती. हाताने पायाने तो मैला पूर्ण काढला होता. आणि पहाणारे लोके अचंबित होवून त्या मुलाची दयनीय दुर्दशा बघ्याची भूमिका घेवून पाहत होते. अश्या जिवंत मुलाला ज्याला
लहानपणी चांगले संस्कार चांगले कपडे चांगला खाऊ आणि शाळेत गणवेश देऊन शिकवावे त्या वयाच्या मुलाना अशीही कामे करावी लागते .यापेक्षा लज्जास्पद कोणती गोष्ट असेल.
समाजाची धारणा आहे कोणत्याही परिस्थितीत कोणीच कुणाला रोखटोक करीत नाही तरी पण इतक्या घाणेरड्या अवस्थेतले त्या मुलाचे कार्य पाहून सर्वांचे मन खिन्न झाले हळहळले होते .त्या मुलाच्या नाकातोंडात डोक्यावर सर्व मैला सांडत होता नरकात पडलेल्या किड्यासारखे त्याचे जीवन दिसत होते ही नियतीची क्रूर थट्टा होती.काही पैश्यासाठी तो काम करतो आहे. त्याचे कारणही गरीबीच आहे.
बालमजूरी करणाऱ्या मुलांची प्रकृर्ती किती घातक रोगांना निमंत्रण देत असते याची काही कल्पना न करणेच बरे आहे या छोट्या-छोट्या कोमल मुलांची स्थिती पाहून दगडालाही पाझर फुटेल आशी दयनीय अवस्था झालेली आहे. अशी अनेक मुलांच्या बाबतीत घटना घडलेल्या आहे आपल्या भारत देशात कोट्यावधीच्या घरात मुले बाल मजुरी करतात या ना त्या कारणाने त्यांचे आई-वडील त्यांना या नरकात घालत असतात.असंख्य मुले कारखान्यात हॉटेलात चूनाभट्टी वर किंवा बांगड्यांचा कारखान्यात काचेच्या कारखान्यात कामे करीत असतात. तिथे उद्योजक आणि ऑफिसरच्या मिलीभगत मुळे मुलांना कोणतीच सुविधा स्वास्थासाठी सुरक्षा मिळत नाही तरीही प्रकरण कोणी उचलून धरत नाही सर्व खुशाल निघून जातात.इथल्या लोकांना काम करणाऱ्या बालकांना काम करीत असताना पाहण्याची सवय झालेली आहे.इतके सरकारी कायदे असताना मुलांच्या भविष्याकरिता त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली पाहिजे यावर प्रायव्हेट संस्थांनाही मान्यता दिल्या आहेत. पण त्या संस्था योग्य कार्य करीत आहे का यांच्यावर कोण लक्ष ठेवणार आहे.
शासकीय भरारी पथक खाऊन पिऊन माघारी वऴतात. आणि ज्यांचे जवळ टक्का नसतो परंतू इमानदारीने कार्य करनाऱ्यांची मान्यता रद्द करतात. देशाचे "रक्षकच भक्षक झाले आहेत." ही म्हण इथे पूरेपुर लागू होते.
लगातार बालकांचे शोषण होतच आहे नाही ते कार्य त्यांच्याकडून करवून घेत असतात.शोषित पिडीत बालकांचे कित्येक प्रकार समाजापुढे आलेली आहेत तरी पण आंतरिक आणि बाह्य शोषण सुरूच आहे. अशा घटना आपल्या भारतातच का घडतात याला जबाबदार कोण आहे? त्यातच बालश्रमिकाची भयानक ससेहोलपट होत आहे.आणि अनैसर्गिक कामे चोरी चकारी,व्यसनात वाढ झालेली आहे. अशावेळी या गरिबीत असणाऱ्या मुलांचे जीवन धोक्यात आहे. त्यांच्या आरोग्याप्रती जागरुकता आली पाहिजे व त्यांना मजुरी करीत असताना सर्व सुख सुविधा दिल्या पाहिजे लहान लहान मुलांना अतीश्रम होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
देशाचा अभिमान बालकाना जपले पाहिजे व भारत हा देश सूदृढ बालकांचा देश असायला पाहिजे. परंतू जीर्ण कुपोषित होऊन त्यांच्या आरोग्यावर निरनिराळे परिणाम होऊन ती रोगग्रस्त होतात. त्यावर त्यांना वेगवेगळे व्यसन लागून ती मरणाच्या दारावर उभे असतात. कीड लागलेल्या झाडाप्रमाणे खाडकन खाली कोसळतात.त्यांनी किती सहन करावे.भर तारुण्यातच म्हाताऱ्या पेक्षा कमजोर जीवन जगतात.
बालमजुरी ही भारताच्या तरक्कीला अभिशाप आहे.या बालकांना शापातून मुक्तता करायची असेल तर उपाय योजना राबवली पाहिजे या सर्वांचे मूळ कारण गरीबी दूर व्हायला हवी त्यासाठी समाजाने हातभार लावून या बालमजुरांचे जीवन बहरलेल्या फुलाप्रमाणे सुगंधाने दरवळले पाहिजे. यापेक्षा अजून समाजकार्य काय होईल.
व्यापारी लोके मुलांचा फायदा घेऊन जोराशोराने आपला व्यापार वाढवत आहे त्यांच्या जीवावर कारखानदार मजा करीत आहेत ती मुले ना हसू शकत आणि ना रडू शकत अश्या अवस्थेत रात्रंदिवस कामे करीत असतात त्या छोट्या छोट्या खांद्यावर भार टाकतात. समाजातल्या काही घटकांनी मुलांच्या भविष्य कडे लक्ष द्यायला पाहिजे.
भारत सरकारने १९२९ मधे कायदा पारीत केला होता.१९३३मधे १४ वर्षाखालील मुलाना काम करण्यावर बंदी घातली होती.तसे कायदे अमलात आणले होते.खूप काही केल्याचं मी वाचलेलं आहे आताची सरकार अजून खूप काही मुलांसाठी करणार आहे आणि करीत आहे.
मुलांची केविलवाणी दशा होण्याला लोकांच्या अडानीपणाला दूर केले पाहिजे. खेड्यापाड्यांमधे जागृति झाली पाहिजे. अशिक्षितपणाला फाटा देवून शिक्षितपणा यायला पाहिजे,"हम दो हमारा एक" चा कायदा पारीत करायला हवा.
निरंतर सरकार प्रयत्न करित असतांना. सरकारी मदत बालकापर्यंत पोहचत नाहीं. असंंख्य करुण कुपोषित बालके इलाजाविना मरतात. स्वास्थ्य राखण्यासाठी सुरक्षा कवच देवून त्याना या जाचक बालमजूरीची अधोगती थांबवायला पाहिजे.