Mrs. Mangla Borkar

Inspirational

3.2  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

अती तेथे माती

अती तेथे माती

1 min
183


एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.


इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदी होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. 


त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुद्धा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational