Preeti Sawant

Tragedy Inspirational Others

2.7  

Preeti Sawant

Tragedy Inspirational Others

असं माझ्याबरोबरच का? (भाग १)

असं माझ्याबरोबरच का? (भाग १)

3 mins
399


सुमा इयत्ता आठवीत होती. तिच्या घरी ती आणि तिचा लहान भाऊ माधव आणि आई-वडील राहत होते. तिला समजायला लागल्यापासून ती नेहमी बघत असे. तिच्या आईला दर महिन्याला कावळा शिवत असे. दिवसा ठीक आहे पण रात्री कुठून येतो कावळा हा प्रश्न तिला नेहमी पडत असे. मग घरातले सगळे काम तिचे बाबा आणि छोटी सुमा करीत असत.


पण आता सुमा मोठी झाली होती त्यामुळे घरातले बरेच काम ती स्वतः करायची त्यामुळे तिच्या आईला फार मदत व्हायची. तसेच आईचा महिना भरला की सुमा अभ्यास सांभाळून घरातले काम ही करीत असे.


तिने खूप वेळा आई ला विचारलेही की, "आई तुला दर महिन्याला कावळा का शिवतो ग?"

तेव्हा आईचे उत्तर असे की वेळ आल्यावर तुला नक्की कळेल.

झालं मग सुमा आपल्या विचारात गुंग होऊन जाई.


एके दिवशी तिच्या शाळेत मासिक पाळीबद्दल एक मार्गदशक व्याख्यान ठेवण्यात आले होते. तेव्हा बाईंनी वर्गातल्या मुलींना विचारले की, "कोणा कोणाला पाळी येते?" तेव्हा जवळ जवळ सगळयाच मुलींनी हात वर केले होते. पण सुमा अजूनही ह्याचे ज्ञान नव्हते.


तिला थोडे लाजल्यासारखे ही वाटले. तिने शाळेत जे जे घडले ते सर्व आईला सांगितले. तेव्हा आई हसली आणि तिला म्हणाली जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला सगळं समजेल.


बिचारी सुमा.


एके दिवशी ती शाळेतून घरी आली आणि तिच्या लहान भावाबरोबर खेळत होती. अचानक तिला तिच्या फ्रॉकला काही ओले लागले आहे असे भासले. तिला वाटले पाणी असेल म्ह्णून तिने बघितले तर तिला रक्ता सारखे काही तरी दिसले. ती घाबरली आणि रडू लागली.


तिचा आवाज ऐकून आई बाहेर आली व तिने सुमाला रडण्याचे कारण विचारले तेव्हा सुमाने आईला तिचे फ्रॉक दाखवले. आईला ते पाहून हसू आले.


तिने सुमाला बाथरूम मध्ये नेले. पाहिलं ती बसलेली ती जमीन स्वच्छ पुसून घेतली आणि मग सुमाला तिने स्वतः अंघोळ घातली आणि तिला घालायला कपडे दिले पण सुमाला कळत नव्हते हे रक्त कुठून येतेय.


सुमाला तिच्या निकर मध्ये जाड काहीतरी जाणवले. तिने बघितले तर त्यावर सफेद रंगाचे काहीतरी चिटकवलेले होते. तेव्हा तिला शाळेमध्ये बाईंनी जे पॅड दाखवले होते जे मासिक पाळी मध्ये वापरतात ते आठवले आणि त्यावर जे डाग असतात ते म्हणजे हे रक्त.


तिला हळूहळू त्या मार्गदर्शन व्याख्यानाची आठवण झाली. तिला आईने जवळ घेतले आणि मग आईने तिला मासिक पाळीबद्दल माहिती दिली. ती माहिती बाईंनी सांगितलेल्या माहिती शी तंतोतंत जुळत होती.


आईने तिला बाजूला बसायला सांगितले नाही. तिने फक्त एक ताकीद दिली की, पाच दिवस देव्हाऱ्याजवळ जायचे नाही. पाच दिवसांनंतर मगच तू देवाच्या पाया पडू शकतेस.


आईला जे जे माहीत होते ते ते तिने सुमाला नीट समजवून सांगितले. सुमा आता मोठी झाली होती.


असेच काही महिने गेले. सुमाला आता मासिक पाळीची सवय होत चाललेली. तिला आता आईला दर महिने कावळा कसा शिवतो ह्याचे गूढ सुद्धा उकलले होते.


अशाच काही महिन्यांनंतर गणेशोत्सव आला. सुमाचा अगदी लाडका सण तो. सुमाच्या घरात ५ दिवसांचा गणपती असे. सुमाला गणपती साठी मकर सजवायला फार आवडायचे. तिचे गणपती हे लाडके दैवत. सगळे झोपल्यावर रात्री सुमा एकटीच तिच्या बाप्पा बरोबर रोज गप्पा मारत असे आणि तो जाताना ती भरपूर रडत असे.


अशा तिच्या बाप्पांच्या आगमनाच्या एक दिवस अडीच सुमाला पाळी आली आणि मग............


क्रमश:


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy