Pradnya Tambe-Borhade

Romance

3  

Pradnya Tambe-Borhade

Romance

अशी ही बनवा बनवी.

अशी ही बनवा बनवी.

2 mins
314


          श्याम आई-वडिलांचा श्रावणबाळच दुसरा. त्यांचा एकही शब्द खाली पडून देत नव्हता. आपला मुलगा एवढ्या आज्ञेत आहे याचा अभिमान होता आई-वडिलांना. श्याम मेहनती आणि हुशार मुलगा. 

      आई त्याची अभ्यासाची खोली नीटनेटकेपणाने आवरुन ठेवायची. एकदा खोली आवरत असताना आईला श्यामच्या पुस्तकात एका मुलीचा फोटो सापडतो. त्या बद्दल श्यामला विचारावे तरी कसे???? हा प्रश्न सतावत होता.

 श्याम आणि फोटो मधील मुलगी रेखा यांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. पण घरी सांगायचा श्यामचा धीर होत नव्हता. श्यामचा मित्र सुजय आणि नेहा भेटायला ये म्हणून आग्रह करू लागले.

        श्याम त्यांना भेटायला जातो. रेखा विषयी सांगतो. आमच प्रेम आहे एकमेकांवर पण काय करणार कस सांगू घरी कळत नाही. आई-वडिलांचा खूप विश्वास आहे माझ्यावर.

      श्यामला वाढदिवसाचे सरप्राइज म्हणून रेखाला घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय सुजय आणि नेहा घेतात. रेखाला घरी आलेले पाहून आईला फोटोतल्या मुलीचा चेहरा आठवतो.

         आई विचारते ओळख करुन द्या. सुजय रेखाशी आपली ऐंगेजमेंट ठरली आहे आणि नेहा बहिण असल्याचे सांगतो. हे सगळ ऐकून. नेहा, श्याम, रेखा बुचकळ्यात पडतात.

       सगळे वाढदिवसाचा सोहळा आनंदाने पाहत असतात. मनात मात्र विचारांचे सत्र चालू असते. जेवण करुन सगळे आपल्या घरी निघून जातात.


      दुस-या दिवशी भेट आणि भांडणे जोरदार होणार हे ठरलेले. याउलट वेगळेच दृश्य दिसले. श्याम सुजयचे आभार मानतो. आणि नेहा बहिण आहे हे कळल्यावर दोघी जणी माझ्या घरी केव्हाही येऊ शकतात. आई-वडिलांना काहीच शंका येणार नाही. नेहा आणि रेखा वरचेवर येऊ लागल्या. आईला नेहा खूप आवडू लागल्याचे दिसत होते. ऐके दिवशी आईने चक्क नेहाला तूला एक विचारु का म्हणून डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. तीची नजर श्यामच्या चेह-यावरचे भाव टिपत होती. तो गोंधाळलेला वाटला. आता कसे होणार. लग्नाची बोलणी सुरु होण्याआधी थांबवायला हवे सगळे.

खरतर आईला रेखा मनापासून आवडली होती. श्याम ही गोष्ट का??तीच्या पासून लपवतो. ते समजत नव्हते. सुजय आणि श्यामच्या आईचे आधीच या विषयी बोलणे झाले होते. इथे कोण कोणाला बनवतात बघ तर....... आहे ना मजेदार.... 

        लग्नाची बोलणी एवढ्या झटपट होतील वाटलेच नाही. डोळ्याच पात लवते ना लवते तेच तारिख देखील निघते. आता मात्र आईला खर सांगाव लागणार.

      श्याम आईला सांगतो आई रेखा वर माझ प्रेम आहे. आई बोलते काय????? ती तर सुजयची बायको होणार आहे ना. श्याम बोलतो आई आम्हांला भेटता येऊन तूला समजू नये म्हणून सुजय बोलला असे. यावर सुजय म्हणतो मी जे बोललो ते तूझ्याच आई च्या सांगण्यावरुन.

काय??????.?.. 

श्यामला शाॅक बसतो. आई तूला माहित होते. मग का नाही सांगतिले तू??? 

आई बोलते तू तरी कुठे सांगितले. मला तूझ्याच पुस्तकात हिचा फोटो आणि नंतर एक चिठ्ठी मिळाली. त्यात तुम्ही दोघांनी प्रेमाच्या आणाभाका लिहल्या होत्या.

      अखेरिस आईने श्यामला आणि श्याम ने आई आणि सुजयला बनवा बनवी केली होती. श्यामचे रेखा बरोबर लग्न होते. दोघांचा संसार सुरळीतपणे चालू होतो. आता नेहा आणि सुजय एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचे देखील लग्न होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance