अनघा - भाग तिसरा
अनघा - भाग तिसरा
अशाप्रकारे अनघा तिच्या सासरी आली. तिच्या सासूने थाटामाटात तिचे स्वागत केले. घरात पूजा झाली. अनघा तोपर्यंत ही तिच्या नवऱ्याशी बोलली नव्हती. शेवटी रात्री जेवणं वैगेरे आटोपल्यावर अनघा तिच्या रूममध्ये बसून नवऱ्याची वाट बघत होती. की आता तरी मोकळा वेळ आहे त्याच्याशी बोलत येईल. अनघा आपली विचार करत बसलेली की बोलायला सुरुवात कुठून करायची, तेवढ्यात प्रशांत म्हणजेच अनघाचा नवरा रूम मध्ये आला. अनघा थोडी घाबरलेली च होती. तिला वाटलं की प्रशांत आधी बोलेल म्हणून ती गप्प होती. तिने विचार केलेला की प्रशांत ला शिक्षणाबद्दल बोलावं म्हणून. पण तो काही बोलेनाच...,
तो बाथरूममधून निघाला आणि काही न बोलता अंथरूण घेऊन बाहेर झोपायला निघून गेला. अनघाला थोडं वेगळं वाटलं, तिला प्रश्न पडला की प्रशांत ने असं का केलं असेल? पण ती त्या दिवशी इतकी दमली होती, की तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा उठली ती पटकन आवरून तयार झाली आणि किचन मध्ये गेली, तिने सगळ्यांसाठी चहा बनवला. सगळ्यांना चहा देऊन ती प्रशांतसाठी चहा घेऊन त्याच्या रूम मध्ये गेली. चहाचा कप पुढे करत तिने प्रशांतला आवाज दिला, प्रशांतने तो कप जोरात हात मारत फेकून दिला, आणि बाहेर निघून गेला. अनघा मात्र आता जाम घाबरली की काल ही प्रशांत न बोलता निघून गेला आणि आज हे असं... तिला नेमके काहीच कळत नव्हते ती रडायला लागली. तिने आईला फोन करून सर्व काही सांगितले, आईने अनघा ची समजूत काढली की प्रशांतला कसले तरी टेन्शन असेल म्हणून त्याने तसे केले असावे तू काही काळजी करू नको होईल सगळं ठीक, म्हणून आईने अनघाला धीर दिला. अनघाला जरा बरं वाटलं. आणि ती तिच्या काम
ाला लागली. तिने तिच्या सासूला ही घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले, पण सासूने तू काही काळजी करू नकोस म्हणून ती गोष्ट टाळून दिली.
दुसऱ्या दिवशी अनघा चे बाबा तिला माहेरी घेवून जाण्यासाठी आले, अनघा खुश होती कारण माहेरी जाणार होती. अनघा ने बाबांसाठी चहा टाकला. सगळ्यांनी चहा घेत गप्पा केल्या, मग अनघाने सासू सासऱ्यांचे पाया पडून नमस्कार केला, आणि तिच्या रूम मध्ये जाऊन प्रशांत ला सांगितलं की मी माहेरी जातेय, त्यावर प्रशांत काहीही बोलला नाही, फक्त बघत होता तिच्याकडे. अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं, कारण प्रशांतच हे असं वागणं तिला आतून काट्यासारखं टूचत होतं. पण बाबांना नको कळायला म्हणून तिने अश्रूंना आवर दिला. आणि बाहेर आली. घरातून बाहेर निघताना तीचं लक्ष सारखे तिच्या रूमकडे जात होते. जणू तिची नजर प्रशांतला शोधत होती. बाबांसोबत ती माहेरी आली आईला घट्ट मिठी मारून तिला रडायला आलं. आईशी गप्पा मारून जरा कुठे तिला बरं वाटलं. ती प्रशांतच्या फोन ची वाट बघत होती की कधी त्याचा फोन येईल आणि ती बोलेल. २ ,३ दिवस झाले आता तिला माहेरी राहून, तीला उद्या उजाडल्यावर सासरी निघायचे होते. ती वाटच बघत होती की प्रशांत तिला घ्यायला येईल आणि ती जाईल म्हणून..!
अनघाला लग्नानंतरचं एक छान नवीन आयुष्याला सुरुवात करायची होती, पण त्यात तिला प्रशांतची साथ हवी होती, काय वाटतं प्रशांत देईल अनघाची साथ? अनघा तीच राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकेल का? प्रशांत असं का वागतोय, त्याचं कारण अनघाला कळू शकेल का? आणि तिला घ्यायला प्रशांत जाईल का?
पाहूया आपण पुढच्या भागात...