Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Rutuja Thakur

Tragedy


3  

Rutuja Thakur

Tragedy


अनघा - भाग सातवा

अनघा - भाग सातवा

3 mins 84 3 mins 84

दोघांच्या छान गप्पा रंगल्या होत्या, केतकी च संपूर्ण लक्ष मात्र अनघा च्या फोन कडे होतं, बोलता बोलता अनघा चा फोन चार्ज झाला होता. केतकी ने पटकन फोटो दाखव म्हणून अनघा ला सांगितले. अनघाने फोन घेतला आणि केतकी ला तिच्या लग्नाचे फोटो दाखवत म्हणाली हे घे बघ, केव्हापासून तुझं फोटो पुराण सुरू आहे, असं म्हणत अनघाने तिचा फोन केतकीला दिला. आता मात्र केतकी मनातून खूप घाबरलेली होती, तिला जी भीती होती ती खरी ठरते की काय फोटो बघून..... असे तिला वाटू लागले.

जसा तिने अनघाच्या लग्नाच्या फोटो बघितला, केतकीच्या पायाखालून जमीन सरकली. ती एकदम स्तब्ध झाली. अनघाने तिला विचारलं आता सांग तू काय सांगणार होती ते???


पण आता केतकीची चिंता अधिक वाढली होती, अनघा ला कसं सांगू, ती पचवू शकेल का हे सर्व??

ह्याचा विचार ती करत होती. तेवढ्यात अनघाने पुन्हा केतकीला विचारले, काय झालं केतकी तुला.. फोटो बघून असा धक्का का बसला तुला???

केतकी खंबीर झाली आणि अनघाला बोलली, अनघा जी शंका कालपासून माझ्या मनात होती ती खरी ठरली. अनघाला काहीच समजत नव्हते केतकी काय बोलते आहे, अनघा बोलली... केतकी सरळ भाषेत सांग काय म्हणायचं आहे तुला.....,

केतकी म्हणाली अनघा आता तुझे मन खंबीर करून ऐक मी काय सांगते आहे ते... अनघा थोडी बिथरली, पण केतकी ला म्हणाली हा तू बोल असं काय आहे ह्या फोटोत जो तुला इतका मोठा धक्का बसला. केतकी म्हणाली प्रशांत जोशीच

ना तुझ्या नवऱ्याचं नाव??? अनघा हसून बोलली, अगं केतकी हा कुठला प्रश्न आहे... हो हेच नाव आहे माझ्या नवऱ्याचं. पण का ग काय झालं??? अग अनघा तुझा नवरा माझा पेशंट आहे........,


अनघाला मात्र आता घाम फुटला होता, पुढे आणखी केतकी काय बोलेल ह्यामुळे. अनघा बोलली पेशंट आणि माझा नवरा???? .... केतकी बोलली हो, साधारण मागील २ वर्षांपासून तो माझ्या दवाखान्यात येतोय. मीच बघतेय त्याला. केतकी ने अनघाचा हात पकडला आणि तिला सांत्वन देत म्हणाली, अनघा प्रशांतला गंभीर मानसिक आजार आहे. आणि लहानपणापासूनच तो तसा आहेस, त्याचा त्याचा एकटा राहतो, त्याला नीट बोलता देखील येत नाही. खूप चिडचिड करतो, म्हणजे थोडक्यात त्याला वेडा म्हटलं तरी चालेल. ह्या आधी त्याची कुठे ट्रीटमेंट सुरू होती की नाही माहीत नाही, पण मागील २ वर्षांपासून त्याची ट्रीटमेंट माझ्याकडे सुरू आहे, त्याच्याच गोळ्या घेतो तो. हे सगळं ऐकून अनघा अक्षरशः चक्कर येऊन खाली पडली. केतकीला रडू आले, केतकीने तिच्या आई वडिलांना देखील अनघा बद्दल जे घडलं ते सांगितलं. सगळे चिंतेत होते. त्यात अनघा बेशुद्ध होती. थोड्या वेळाने अनघा शुद्धीवर आली. कितीवेळ तर कोणाशी ही बोलत नव्हती, केतकी तिला समजावत होती, की अनघाने अश्रूंचा टाहो फोडला आणि केतकी जवळ खूप रडू लागली, तीचं बघून केतकीला ही रडू आले. केतकीची आई अनघाला समजावत होती, अनघा काही काळजी करू नकोस, ह्यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण अनघा एका निर्जीव पुतळ्यासारखी झाली होती, काहीच बोलेना. केतकीला अशी अवस्था बघवत नव्हती.


केतकीने अनघाच्या आईला फोन केला आणि घडलेलं सगळे सांगितले. अनघाच्या आईच्या हातून फोन सुटून खाली पडला. अनघाच्या बाबांनी फोन घेतला तर केतकिने अनघाच्या बाबांना देखील सर्वकाही सांगितले. अनघाच्या बाबांनी आम्ही तिकडे येतोय तू अनघाला तुझ्याकडेच असु दे म्हणून सांगितले. केतकीने फोन ठेवला, आणि केतकीने अनघाच्या सासरी फोन करून विचारले की अनघा आज माझ्याकडे थांबली तर चालेल का?? अनघाची सासू म्हणाली त्यात काय विचारायचं असुदे तिला तिकडे, म्हणून अनघाच्या सासूने फोन ठेवला. अनघा काहीही ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. केतकीला अनघा बद्दल खूपच वाईट वाटत होते. की इतकी हुशार, सुशिक्षित चपळ मुलगी, नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारी.....,

आणि आज तिच्यावरच का असा प्रसंग ओढावला???

आता पुढे अनघाचे आई- वडील आल्यावर कळेलच काय होईल तर???

तिला सासरी सोडतील की माहेरी नेतील पाहू या पुढच्या भागात..!!! (क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Rutuja Thakur

Similar marathi story from Tragedy