Rutuja Thakur

Tragedy

3  

Rutuja Thakur

Tragedy

अनघा - भाग पाचवा

अनघा - भाग पाचवा

2 mins
107


अनघा खूप बेचैन झाली होती. रात्री सगळे झोपण्याची वाट बघत होती. सगळे झोपल्यावर अनघा हळुच आवाज न करता हॉल मध्ये आली. तिला ते गोळींचे पॅकेट शोधायचे होते. तिने हॉल मध्ये सगळीकडे शोधले पण तिला मात्र ते सापडले नाही. ती शोधत असतानाच तिचा धक्का हॉल मध्ये असलेल्या फ्लॉवरपोटला लागला आणि तो खाली पडला, प्रशांत हॉल मध्येच झोपला होता. तो आवाज ऐकुन जागा झाला तोच अनघा रूममध्ये पळाली. आणि दार बंद करून झोपली. थोड्या वेळाने प्रशांत देखील झोपी गेला. दुसऱ्या दिवशी अनघा उठली आवरून कामाला लागली. तिला काहीच सुचत नव्हते काय करावे ते. प्रशांत आपला गप्प टीव्ही बघत बसला होता. सासू तिला मदत करत होती स्वयंपाकात. सासरे पेपर वाचत बसले होते. दुपारी जेवण झाल्यावर अनघा रूममध्ये जाऊन आराम करत होती. आणि रडत बसलेली. की नवीनच लग्न झालं आहे पण काहीच सुख नाहीये. वाटतच नाहीये की लग्न झालं आहे असं, नवरा असून नसल्यासारखा वागतोय. त्यात सासू सासरे काही सांगत नहिये. तिला खूप त्रास होत होता. पण तिने मनाशी निर्धार केलेला, की जोपर्यंत मला सगळं काही कळत नाही तोपर्यंत आई वडिलांना काही सांगायचं नाही. पण आतून मात्र ती पूर्णपणे तुटत चालली होती. तिचे सगळे स्वप्ने तिला मातीमोल होताना दिसत होते.


त्यात शेवटच्या वर्षाची परीक्षा कशी द्यायची हे ही तिला कळत नव्हते. तेवढ्यात अनघाला केतकीचा फोन आला (केतकी म्हणजे अनघाची जिवलग मैत्रीण). अनघाला तिचा राग आलेला कारण केतकी लग्नाला नव्हती. केतकी ने फोन वर अनघाची माफी मागितली. अनघाच्या लग्नाच्या दिवशी केतकीच्या बाबांची बायपास सर्जरी झालेली म्हणून केतकी इच्छा असूनही लग्नाला जाऊ शकली नाही. हे ऐकुन अनघाला वाईट वाटले, अनघाने केतकीला बाबांची विचारपूस केली. दोघांच्या छान गप्पा रमल्या. तसं तर केतकी ही डॉक्टर होती. तिचा स्वतंत्र दवाखाना होता. केतकीने अनघाला लग्नानंतर कसं चाललंय असं मजेत विचारलं...,


तोच, अनघा रडू लागली आणि घडलेलं सर्व काही तिने केतकीला सांगितलं. तिने जे काही सांगितलं ते ऐकून केतकी अक्षरशः अवाक् झाली....,

किती वेळ तर फोनवर बोललीच नाही, अनघा तिला सारखी आवाज देत होती केतकी काय झालं म्हणून... पण केतकी मात्र ते सर्वकाही ऐकुन निशब्द झालेली.... जणू काही अनघा पेक्षाही मोठा धक्का केतकीला बसला.

आणि केतकीने एकाएकी फोन ठेवला.....


का म्हणून केतकीने फोन ठेवला असेल??? असं काय ऐकलं तिने तर तिला धक्का बसला??? 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy