End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Rutuja Thakur

Tragedy


3  

Rutuja Thakur

Tragedy


अनघा - भाग चौथा

अनघा - भाग चौथा

2 mins 75 2 mins 75

आलाच तो दिवस, आज अनघा तिच्या सासरी जाणार होती. थोडी खुश होती कारण तिला माहिती होतं की घ्यायला प्रशांतच येणार म्हणून...


अनघा मस्त तयार झाली आणि वाट बघू लागली तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला, तिला आनंद झाला की आले प्रशांत म्हणून...


बाहेर जाऊन बघते तर प्रशांत नसून अनघाचे सासू-सासरे आलेले तिला न्यायला. अनघा हिरमुसली.


अनघाच्या आई-वडिलांनी विचारले देखील की, जावई बापू नाही आले अनघाला घ्यायला.


तर अनघाची सासू म्हणाली की, प्रशांतला जरा ताप आलाय तो आराम करतोय घरी, तो येत होता आम्हीच नाही म्हणालो.


अनघाचे आई-वडील म्हणाले, बरं केलंत, जावईबापू नाही आले त्यांचा आराम तरी होईल. अनघा बाहेर आली आणि सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. थोड्या वेळात ते जाण्यास निघाले. अनघाला परत रडू फुटले, कितीही झालं तरी माहेरचं ना ते...


गाडीत अनघा अगदी गप्प होती. तिला हा प्रश्न सतावत होता की प्रशांत का नाही आले. काय झालंय त्यांना असं का वागताय???? तिला काही कळेनाच...


विचार करता करता घर कुठे आले तिला कळालेही नाही.


घरी येऊन अनघा तिच्या रूम मध्ये गेली प्रशांत नव्हता तिथे. ती फ्रेश होऊन जरावेळ आराम करत होती की बाहेर जोरात कसला तरी आवाज आला... अनघा दचकून जागी झाली आणि बाहेर धावत सुटली. बाहेर हॉलमध्ये जो Fish tank होता तो प्रशांतने तोडला होता. अनघा हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली. ती प्रशांतला आवरायला गेली असता प्रशांतने तिला देखील दूर धक्का मारला. अनघा भिंतीवर जाऊन आपटली थोडा डोक्यावर मार लागला. अनघाची सासू पळतच आली आणि अनघाला उठवून तिच्या रूममध्ये घेऊन गेली. अनघा खूप रडत होती, तिने सासूला परत विचारले की प्रशांत असे का वागता आहेत. काय झालंय??? मी या घरात आली तर त्यांना आवडलं नाहीये का??? का ते असे वागता आहेत... 


सासू अनघाला बोलली, तू आधी शांत हो बघू, आणि त्याचं इतकं मनावर नको घेऊस थोडा चिडक्या स्वभावाचा आहे तो... आणि हे आत्ताचं नाहीये तो नेहमी असं करतो. तू काळजी नको करुस. तू आराम कर, मी बघते त्याला जाऊन.


सासू दार बंद करून बाहेर गेली. प्रशांतला सोफ्यावर बसवून त्याला एक गोळी दिली आणि पाणी दिलं. अनघाने दाराजवळ येऊन सर्वकाही बघितले. की आईंनी प्रशांतला कसली गोळी दिली असेल???? काय झालंय प्रशांतला... अनघा परत तिच्या रूममध्ये जाऊन बसली. आता तर तिच्या मनात खूप वेगवेगळे प्रश्न येत होते...


ती खूप घाबरली होती. प्रशांत अजून माझ्याशी काही बोलला का नाहीये??? तो असा राग राग का करतोय???? 


शेवटी तिने विचार केला की आज रात्री सगळे झोपले की मी याचा शोध घेणार, काही ना काही तरी नक्कीच कळेल. तिला ते गोळीचं पॅकेट बघायचं होतं.... कसल्या होत्या त्या गोळ्या??????


तर काय वाटतं तुम्हाला काय झालं असेल प्रशांतला???


का तो असा वागतोय??? त्याला हे लग्न करायचं नव्हतं का?? तो अनघाशी बोलत का नाही??


पाहूया पुढच्या भागात...!!!


Rate this content
Log in

More marathi story from Rutuja Thakur

Similar marathi story from Tragedy