Rutuja Thakur

Tragedy

3  

Rutuja Thakur

Tragedy

अनघा - भाग आठवा

अनघा - भाग आठवा

4 mins
74


अनघा एकदम शांत बसली होती, थोड्यावेळात अनघाचे आई वडील केतकीच्या घरी आले. केतकीने पुन्हा सगळं घडलेलं सांगितलं, अनघाची तशी अवस्था बघून तिचे आई वडील अवाक् झाले होते. ते स्वतःलाच दोष देऊ लागले, की अनघाची इच्छा नसूनही आम्ही तीचं लग्न केलं, तिला तर बिचारीला तीचं शिक्षण पूर्ण करायचे होते, आम्ही स्वतः तिला ह्या खड्यात उडी मारायला सांगितली, म्हणून रडू लागले. ह्यात जितका दोष अनघाच्या सासू सासर्यांचा आहे , तितकाच दोष आमचा देखील आहे.. अनघाचे वडील पुढे म्हणाले. त्यांनी त्यांचा मुलगा वेडा आहे, हे आमच्यापासून लपवून खूप मोठी चुकी केली आहे, ह्यासाठी आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांच्यावर केस करू, असं अनघाची आई म्हणाली. तोच अनघा पुन्हा मोठ - मोठ्याने रडू लागली. अनघाची अशी झालेली अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले होते. बिचारी अनघा एक सारखी रडतच होती, जणू तीचं सर्व काही संपून गेलं होतं. अनघाचे वडील उठले आणि म्हणाले आताच्या आता चला आपण त्यांना जाब विचारू, की का ते असे वागले??? अनघाचे आई वडील, केतकी अनघाला घेऊन निघाले तिच्या घरी जायला. ती तर बोलायच्या मनःस्थितीत देखील नव्हती. ते तिच्या सासरी गेले, दार तिच्या सासूनेच उघडले, अनघाची सासू केतकीला बघून अवाक् झाली, की केतकी यांच्यासोबत कशी काय?? सगळेजण आत आले, अनघाची सासू म्हणाली या ना बसा, अनघाचे आई वडील अत्यंत रोषात होते, त्यांनी अनघाच्या सासऱ्याना बाहेर बोलवा म्हणून सांगितले. अनघाचे सासरे ही बाहेर आले.....,


आता मात्र अनघाचे वडील खूप चिडले होते, आणि तिच्या सासू सासऱ्यांना म्हणाले तुम्ही तुमचा मुलगा वेडा आहे हे आमच्यापासून का लपवुन ठेवले. अनघाच्या सासू सासर्यांचा चेहरा त्यावेळेस बघण्यासारखा होता, दोघांनी खाली मान टाकलेली. अनघा आपली स्तब्ध उभी होती. त्यांच्यात खूप बाचा-बाची झाली. अनघाच्या वडिलांनी मी तुमच्यावर केस करतोय म्हणून सांगितले, तोच अनघाची सासू अनघा जवळ गेली आणि तिची माफी मागू लागली, पण ती बिचारी काहीच बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच. अनघाची सासू म्हणाली आमचं खरंच चुकलं आम्ही ही गोष्ट लपवली. पण तुम्ही केस करू नका आपण आपापसात सोडवूना हा प्रश्न. अनघाची आई तिच्या सासूला बोलली तुम्ही सुद्धा एक आई आहात, तुम्हाला असं करतांना लाज नहिका वाटली??? एका मुलीचं जीवन तुमच्या मुलामुळे तुम्ही चक्क उध्वस्त करून टाकलं?? तुम्हाला मुलगी असती ना... तर कळाल असतं तुम्हाला की किती त्रास होतो ते...,


आणि केतकी जी प्रशांत ची डॉक्टर होती, तिने ही अनघाच्या सासू सासऱ्यांना मी अनघाची मैत्रीण आहे म्हणून ओळख दिली, आणि आज अनघा माझ्याकडेच आली होती. ती तर बिचारी अज्ञान होती ह्या गोष्टीला घेऊन, जेव्हा तिने तिचा लग्नाचा फोटो मला दाखवला तेव्हा सगळं उघडकीस आलं, असे केतकी अनघाच्या सासूला म्हणाली. आणि एक मैत्रिणीच्या नात्याने सांगते, तुम्ही खूप चुकीचं वागले आहात, ह्याची शिक्षा ही तुम्हाला मिळायलाच हवी असे बोलून सगळे अनघाला घेऊन तिथून निघून गेले....


शेवटी व्हायचं तेच झालं... अनघाच्या सासू सासरे ह्यांच्यावर अनघाच्या आई वडिलांनी केस केली, केसचा निकाल लागेपर्यंत ७/८ महिने उलटून गेले. निकाल अनघाच्या बाजूने लागला, जेवढं लग्नात ह्यांनी दिलं होतं ते सगळं त्यांना परत मिळालं. दोघांचा घटस्फोट झाला. अनघाच्या सासू सासर्याना ६ महिन्याची कारागृहाची शिक्षा झाली, आणि प्रशांतला मानसिक वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. 

पण ह्या सगळ्यात अनघाचं कुठे चुकलं, सांगा ना??? काय दोष होता तिचा म्हणून तिच्यासोबत हे असं घडलं???

तिची खूप स्वप्ने होती, तिला स्वतःच्या पायावर उभी रहायचं होतं. एका चांगल्या घरातून सुशिक्षित असलेली एक मुलगी, तिच्यासोबत असं काही घडणार होतं ह्याची जरा देखील कल्पना बिचारीला नव्हती. आणि लग्नाची इच्छा नसताना आई वडिलांमुळे तिने लग्न केले होते... हे चुकलं होतं का तिचं???


जे व्हायचं ते झालं हो.... पण अनघाच्या मागे एक घटस्फोटाचा शिक्का लागला ना... त्याचं काय??? समाज तिलाच कारणीभूत ठरवेल ना.. चुकी नसतानाही. का तर मुलींची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते म्हणे, भांड्याला तडा जाता कामा नये, पुरुषप्रधान असलेली ही आपली संस्कृती पुरुषांना कधीच जवाबदार ठरवत नसते, भले चूक पुरुषांची असो, त्यांची थोडी इज्जत जाते..., त्यांचं काय एक लग्न मोडला की लगेच दुसरा करता येतं..., त्यांना कोणीच नाव ठेवत नाही.


पण सगळ्यात आधी मात्र मुलींना ग्राह्य धरलं जातं. आणि हा शिक्का असा असतो की कधीच पुसला जात नाही, आणि ती बिचारी आतून तुटते ते वेगळं. आज देखील आपल्या समाजात अनेक अनघा आणि प्रशांत असतील, लग्न म्हणजे खेळ नसतो, ते एक पवित्र नातं असतं, निर्मळ नातं असतं, त्यात अशा गोष्टी लपवुन कशा चालतील???

आणि हो जेवढी चूक अनघाच्या सासू सासऱ्यांची होती, तेवढीच चूक अनघाच्या आई वडिलांची सुद्धा होती. त्यांनी त्यांचा निर्णय अनघावर लादला होता. तीने तर आई वडिलांच्या इच्छेखातिर स्वतःचं जीवन आगीत झोकून दिले, स्वप्नांना मागे टाकून. तिला तर ह्यातून फक्त वेदनाच मिळाल्या बस बाकी काही नाही.... तीचं पूर्ण आयुष्यच उध्वस्त झाल्यासारखे होते. जणूकाही जिवंत असूनही बिचारी निर्जीव झाली होती. तिला पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल की नाही... हे ही शंकास्पद होते तिची अवस्थ पाहून...!!!!


निष्कर्ष- गोष्ट जरी काल्पनिक असली तरी खऱ्या आयुष्यात ह्या गोष्टी सहज होतात. आजही मुलांना पुढे केलं जातं आणि मुलींना मागे ठेवलं जातं. मुलींची इच्छा असूनही त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. काही आई वडील ह्याला अपवाद असतात. पण एका हसत्या खेळत्या मुलीचं जीवन कधी उध्वस्त होऊन जाते हे तिलाही कळत नाही.

कुठलीही गोष्ट करताना त्यात पारदर्शता हवी, तरचं ती गोष्ट टिकून राहते. नाहीतर अनघा सारख्या सुशिक्षित मुलीचं आयुष्य उध्वस्त व्हायला जरा देखील वेळ लागत नाही.


आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, घाईत केलेला निर्णय नेहमी चुकीचं ठरतो. मुलींना आज स्वतःच मत मांडण्याचं स्वातंत्र्य हे मिळायलाच पाहिजे. तरच अनघा सारख्या मुली आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील, आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील....!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy