अलक
अलक
दोन कावळे आपसात बोलत होते.
"अरे! माणूस नावाचा प्राणी अती बुध्दीमान. पण आई वडिलांना ओळखण्यात जरा कमी पडतो . त्यांना जिवंतपणी छळ छळ छळतो. अगदी वृध्दाश्रमात सुध्दा नेऊन ठेवतो. पण मेल्यानंतर त्यांच्या नावाने श्राध्द घालतो. ताट भरभरून पक्वान्न करून लोकांना जेवायला घालतो.
'काऊ काऊ ये'
आपल्याला आग्रहाने बोलावतो. घास खाण्याची नाही रे इच्छा होत.नुसता दिखावा..."
