अलक
अलक
शाळेतल त्यांच प्रेम काॅलेजमधे गेल्यावर बहरल आणि त्यांनी लग्न केलं. आय.टी. कंपनीतल्या त्याच्या बढतीमुळे तो तिला वेळ देऊ शकतं नव्हता म्हणून ती नाराज असायची.
वैतागून तो म्हणाला ,' बंगला, गाडी, बॅंक बॅलन्स, फाॅरेन टुर एवढी सगळी सुखे असुन तू नाराजच असतेस.'
त्यावर ती म्हणाली,' प्रेम,सहवास ही पैशाने विकत न घेता येणारी सुखे मला हवी आहेत.'
