अलक
अलक

1 min

286
रखरखीत उन्हाच्या सावलीत विसावलेलं मस्तवाल वाळवंट होतो मी..
शापित, कलंकित,तरीही बेशरम,,
गन्ध नव्हता मला ,,आणि मनालाही..
फुलझाडे तर सोडा पण साधे निवडुंग ही न रुजवू दिले मी माझ्या धरावर..
होतो रममाण मी माझ्याच मरूभूमीत..अनभिषिक्त युवराज,
ना वावटळांची भीती होती ना कसल्या कुभांडाची धास्ती..
अशातच आली कुठून एक थंड लहर, आणि करून गेली या भणंगाचा शिरच्छेद....