अलक
अलक
1 min
158
'ती' स्तब्ध, शांत, निश्चल...काय विचार करत असेल? काय हवं आहे अजून तिला?
आता आयुष्याच्या या शेवटच्या सत्रात कसल्या आल्यात अपेक्षा?..
स्वतःला काय मिळालं याचं ऑडिट तिने केलंच नाही पण बाकी सगळ्यांना तिने त्यांची स्पेस मात्र दिली होती..फ़क्त एवढंच जाणून होती की तिच्यावर फुललेली ही फुलं हेच तिच्या जीवनाचं सार्थक आहे...
...खंत एकच होती.. संसारवेल बहरूनही हृदयातील वेल फुलायची राहून गेली...
