अगतिक!!
अगतिक!!
मे महिन्याचे रणरणीत ऊन ,त्यात हे बांधकामावरचे काम वाळू,सिमेंट मिक्सर चा घरघर आवाज,वाळू ने भरलेले घमेले पण उन्हाने तापलेले,ते डोक्यावर घेऊन न्यायचे आणि त्या मिक्सर मध्ये टाकायचे शालू या कामाला आणि या अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाला पण वैतागली होती.दुपारची सुट्टी व्हायला अजून बराच वेळ होता. शालू आणि तिचा नवरा शंकर गावा कडून इकडे शहरात आलेले बांधकामा वर मजुरी वर काम करत होते. तिथेच बाजूला पत्र्याची शेड मारून मजुरांची राहायची सोय बिल्डरने केली होती. घामाच्या धाराने शालू चा चेहरा निथळत होता. एका हाताने डोक्या वरचे घमेले सांभाळत एका हाताने पदर धरून घाम पुसत होती. शालू नाकेडोळी दिसायला रेखीव,सावळा रंग पण अंगाने भरलेली म्हणूनच तिच्या या हालचाली कडे मुकादम टक लावून पहात होता,तो तसाच होता सगळ्या मजूर बायकां कडे हावऱ्या लालची नजरेने बघत राहायचा. शालुची नजर त्याच्या कडे गेली,तशी ती रागाने पचकन थुंकली ,तरी ही तो मुकादम लाळ गाळत पहातच होता. तिला खूप राग यायचा त्याचा पण नाईलाज होता,पोटाची खळगी भरायची दोन लहान लेकरं होती तिला म्हणून शंकर आणि ती हे काम करत होती.७० रुपये रोज मिळायचा शंकर दिवसभर दमायचा मजुरी करून मग रात्री दारू ढोसून तो झोपायचा. त्याचा पगार सगळा दारुतच जायचा. तिच्या पगारावर कसे बसे भागत होते.पोर तिथेच शेड मध्ये खेळत बसायची. शालू एक घमेल टाकून आली,जरा थांबली घोटभर पाणी प्यायला. तिने तांब्या हातात घेतला, तितक्यात मुकादमा ने तिच्या हाताला हात लावला,म्हणाला,लई तहान लागली होय,मला पण लागलीय तहान आम्हाला पण पाज की पाणी जरा. असे म्हणत दुसऱ्या हाताने तिच्या गालावर बोटं फिरवत राहिला. शालू ने हिसका देऊन त्याचा हात बाजूला क
ेला. आणि तिथून निघून गेली. इथले काम संपे पर्यंत तिला रोजच मुकादमा च्या घाणेरड्या नजरेला,स्पर्शाला सामोरे जाणं भाग होत.
आज सकाळी सकाळी तिचा मुलगा दीपक तापाने फणफणत होता. ती त्याला घेऊन दवाखान्यात गेली. फक्त शंभर रुपये तिच्या कडे शिल्लक होते,घरातले सामान पण संपले होते. पोरांना खायला काही नव्हते,१०० रु डॉक्टर लाच गेले,तिला काय करावे सुचेना औषध आणि खायला तर पाहिजे पोरांना! ती मुकादमा कडे गेली,सायेब जरा पैशाची नड होती पोरग आजारी आहे असं म्हणत ती हात जोडून उभी राहिली. मुकादम तिच्या कडे लालची नजरेने बघू लागला आणि म्हणाला,पैसे पाहिजेत,मग त्या बदल्यात मला काय देणार?
सायेब,हफत्याला पगार झाला की कापून घ्या तुमचे पैसे पण आता थोडे तरी दया.
त्याने तिचा हात पकडला,ती हात सोडवून घ्यायला धडपडू लागली ,तो म्हणाला,पैसे पाहिजेत तर ये मागे गोडावून मध्ये. आणि त्याने तिचा हात सोडला.
ती तशीच माघारी आली,पोर पार भुकेला आली होती,दीपक झोपूनच होता. तिच्या 'डोळयात पाणी आले,ती उठली आणि काही ही विचार न करता मुकादमा कडे गेली,तो होताच गोडावून मध्ये. त्याला माहित होत परिस्थिती माणसाला किती लाचार करते ते. तिला बघून त्याचे डोळे चमकू लागले त्याने गोडावून चे शटर बंद केले. तिथल्या जमिनीवर च्या सतरंजी वर तिला ओढले,तिचा ही नाईलाज होता. त्याने तिची साडी फेडून बाजूला फेकली,तिच्या तरुण देहा वरून नजर फिरवू लागला. आणि हापापलेल्या लांडग्या सारखा तिच्या शरीरा चे लचके तोडू लागला. ती वेदनेने विव्हळत होती आणि मूकपणे रडत होती... त्याच्या पुढे आणि परिस्थिती पुढे ती अगतिक होती.