अग बाई थोड थांब ना..
अग बाई थोड थांब ना..
कमला बाईला कामावर येण्यास उशीर झाला. सवीताला office ला जाण्यास उशीर होत होता.
तीला वाटत होते कमलाबाईने अगोदर माझ्या घरचे काम करावे. नंतर दुसऱ्यांच्या घरची कामे करावीत.
कमलाबाईचे म्हणने होते सगळेच मला पैसे देतात.
मी माझ्या हिशोबाने काम करते. कुलकर्णी बाईला सकाळी सात वाजता शाळेवरती जावे लागते. तिचे लहाण लेकरु आहे. मी त्यांच्या कडे दहा वर्षा पासुन कामाला आहे. तुमचे घर नवीन धरले आहे. मला कुलकर्णी बाईचे काम सोडून तुमच्या कडे लवकर येता येणार नाही. का गं कमले मी तुला पैसे देत नाही का?
सविता काकू प्रश्न पैशाचा नाही. माणुस किचा आहे. अहो त्यांचे लहाण बाळ आहे. त्याचे मीच आवरते. तो पर्यंत त्यांचा डब्बा तयार होतो. नंतर ते दोघे जन office ला जातात. तुम्ही दोघेच आहात तुम्हाला थोडा उशीर झाला तरी काही फरक पडत नाही.
कमले मला शाहान पण शिकवू नकोस. दिड दमडीची काम वाली लागली मला शहाण पण शिकवायला .
सविताने कमलाबाईला कामावरुन काढले. कामवालीच्या शोधात सविता याला त्याला विचारत होती. आठ दिवस झाले कामवाली बाई मिळाली नाही. भांड्याचा व कपड्याचा ढिगारा तिला रोज ड्युटी वरुन थकुन आल्यावर घासावा लागत होता. नाही घासावा तर रात्रीच्या स्वयंपाला भांडी नसायची. तिने कमलाबाईला फोन करुन बोलावले. तिने म्हटले मी काम सोडून दिले. मला कुलकर्णी बाईच्या शाळेत नौकरी लागती. कुलकर्णी बाईने मला शाळेवर कामाला घेतले. मी त्यांच्याच गाडीत जाते आणि येते.
घरी आल्यावर त्यांचे तेवढे काम काम करते. त्यांचे बाळ माझ्या शिवाय राहत नहीं. लहाण पणा पासुन माझ्याच अंगावर आहे. म्हणुन त्यांचे मालक म्हणाले कमला तु आमच्या कडेच रहात जा. चार घरचे काम करण्या पेक्षा तुला शाळेवर कामाला घेतो. सविता ताई नाही तरी मला दूसरे कोण आहे. आईबापा लहाण पनीच गेले. त्यांनीच मला लहाणाचे मोठे केले. त्यांचे उपकार मी कसे विसरणार तुम्हीच सांगा..
सवीताला कमलिला कामावरुन काढल्याचा पश्चाताप होत होता. तिला स्वतःला काम केल्या शिवाय गत्यांतर नव्हते. सविता रोज सकाळी लवकर उठुन काम करु लागली. रोज सकाळी लवकर ऊठायची सवय लागली..
