Anil Kulkarni

Inspirational

4  

Anil Kulkarni

Inspirational

अब्राहम लिंकन चे शिक्षकास पत्र

अब्राहम लिंकन चे शिक्षकास पत्र

9 mins
516


अब्राहम लिंकनचे शिक्षकास पत्र :


प्रिय गुरुजी ,

पत्र हे आत्मचिंतन करायला लावतं. शिक्षकावरील होणाऱ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मला आज पुन्हा तुमच्याशी नव्याने संवाद साधणे आवश्यक वाटलें. सगळ्याच शिक्षकांना मी दोष देणार नाही पण तुमच्यापैकी काही शिक्षक परीक्षेच्या घोटाळ्यातून, पैसे देऊन या क्षेत्रात आलेआहेत. काहीजण वर्गात अध्यापन न करता बदली शिक्षक नेमतात त्यामुळे आता वर्गात शिक्षकाचा फोटो लावणे काही ठिकाणीबंधनकारक केले आहे. माझे गुरुजी या नांवाने फोटो व गुरुजी चा परिचय याबाबत एक परिपत्रकही निघाले आहे. शिक्षक बदलीच्या ठिकाणी न राहता येजा करतात व घरभाडे भत्ता घेतात त्यासाठी खोटे प्रमाणपत्र सादर करतात, यासाठी तो भत्ता रद्द करावा अशीही मागणी होत आहे. कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून अनेकांनी आपला उत्कर्ष इतक्या पातळीपर्यंत केला आहे की चित्रपट काढणे, सहली काढणे अशा इतर व्यवसायातही ते जम बसवत आहेत. शरीर सुखाच्या मागणीपर्यंत सुद्धा काही शिक्षकांच्या तक्रारी आल्या आहेत. खोटी प्रमाणपत्र सादर करून आदर्श शिक्षकाच्या पंक्तीत स्वतःला बसवणें. पाठ्यपुस्तका बाहेरचे उपक्रम राबवण्यात तुम्हाला प्रेरणा मिळत नाही असेही ऐकलें. आरोपांच्या पार्श्वभूमीवर मला आदर्शाचे डोस पाजायचे नाहीत आपल्या वर्तनामुळे जर एखादा वर्गच बदनाम होत असेल तर आपण सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून आपल्यात परिवर्तन घडवून आणावे एवढीच माझी विनंती असणार आहे.पत्रातून संवाद आज संपल्या सारखाच आहे.पं.नेहरुनी आपल्या मुलीचं भावनिक पोषण पत्र लिहून केलं.फार पूर्वी मी (अब्राहम लिंकनने) पत्र लिहिले होते, त्यात माझ्या मुलाला काय शिकवावे, त्याचा ऊहापोह केला होता. पत्र मुख्याध्यापकांना इतके आवडले की त्यांनी फ्रेम मध्ये बंदिस्त करून खुंटीला टांगले.आपल्याकडे एखादी गोष्ट आवडली की तिला चौकटीत बंदिस्त केल जातं व खुंटीला टांगल की आपली जबाबदारी संपते.(मी )अब्राहम लिंकनने आपल्या मुलाला जे शिकवायला सांगितलं, खरं तर तोच खरा अभ्यासक्रम होय.

माझ्या आधीचं पत्र मुख्याध्यापकांना होतं, पण आता माझं पत्र नव्याने शिक्षकांना लिहावं असं मला वाटलं. आपल्याच पत्राचे संदर्भ बदलतात, किंवा परिस्थितीचे संदर्भ बदलत असतात हे तुम्ही विचारात घेतलं का?तुमच्याकडे अभ्यासक्रम बदलले जातात लोकांच्या सूचना मागवल्या जातात, विचारात घेतल्या जात नाहीत.चर्चा सत्राचे सोहळे होतात.अभ्यासक्रम लादला जातो.अभ्यासक्रमातील आशय समजण्यासाठी तुम्हाला पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही.अशैक्षणिक कामाचं ओझं, कधीच कमी होणार नाही अशी व्यवस्था आहे . शिक्षकांना आता चाकरमान्यांच्या स्वागतासाठी एसटी आगारामध्ये सुद्धा ड्युटी लावली होती.फक्त समित्या नेमल्या जातात आणि फी, दप्तर, ओझं या बाबतीत तुम्ही असाह्य आहात.समिती नेमून फरक का पडत नाही? इंग्रजी माध्यमाच्या शाळा आदर्श व्यवसाय बनला आहे. शाळेपेक्षा कोचींग बहरते आहे, ज्ञानापेक्षा टक्केवारी बहरते आहे.पैसा असेल तर पैसा फेका आणि पैसा कमवा, अशी व्यवस्था या क्षेत्रात आहे.पैसे देऊन डॉक्टर इंजिनिअर व्हायचं आणि रुग्णाचा मृत्यू, पूलाच्या कोसळण्यास कारणीभूत व्हायचं.अभ्यासक्रम निवडण्याच, तयार करण्याचं, पाठ्यपुस्तक कोणत वापरायच हे स्वातंत्र्य फिनइंग्लंडमध्ये आहे, तसे तुम्हाला नाही शिक्षण चार रूक्ष भिंतीत बंदिस्त झाले आहे. मी मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, पण मला वाटतं तो शिकला आहे त्याच्यासमोर न्यायप्रिय व सत्यनिष्ठ नसणारेआहेत. न्यायप्रिय आणि सत्यनिष्ठ उदाहरणादाखल सुद्धा अवतीभवती धुतल्या तांदळा शिवाय दिसू नयेत हेही मुलाला समजल आहे.सत्ता, पैसे यापुढे न्यायप्रिय,सत्यनिष्ठ शब्द तग धरेनासे झालेत.

मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणीक एक बदमाष असतो .एका बदमाशा गणिक दहा बदमाश तयार होत आहेत हे सगळं त्याच्या समोर पारदर्शकपणे यायला हवं. स्वार्थी राजकारण्यांचा गराडा समाजजीवनावर जबरदस्त आहे. अवघ आयुष्य सत्तेला समर्पित करणारे आहेत. सत्ता नसेल तर जल बिन मछली अशी त्यांची अवस्था होते.मला माहित आहे सगळ्या गोष्टी लवकर नाही शिकवता येत असे मी म्हणालो होतो पण ,सगळ्या गोष्टी मुले लवकर शिकताहेत. पुष्कळशा गोष्टी शाळेच्या चार भिंती बाहेरंच ,मुलं आज शिकत आहेत. प्रचंड संख्येमुळे सगळ्या गोष्टी शाळेत शिकविता येत नाहीत. आता नवीन अभ्यासक्रमानुसार शिकणे महत्त्वपूर्ण आहे, शिकवणे न्हवे, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ते सोयीस्कर झाल आहे. तुम्ही फक्त विषयाचे वेळापत्रक बनवू शकता.आशयाचं काय? तुमच्या शाळेत अभ्यासक्रमाला न्याय दिला जातो का? मग शिकवणी, गाईड,कॉपी, टक्केवारीसाठी न समजता पाठांतर करणे का वाढत आहे ?राजकारण हे साधू आणि बदमाश यांच्या हातातील खेळणे बनल आहे. जसा पक्ष तसा अभ्यासक्रम.पक्षाच्या चांदण्यात अभ्यासक्रम नहातोय. पक्ष्याचा रंग अभ्यासक्रमाला दिला जातोय .

आज विजयाचा आनंद मुलं संयमानं घेत नाहीत कोचिंग क्लासला श्रेय देतात ,त्यांच्या जाहिरातीच साधन बनतात .यशाची खात्री नव्हती असे म्हणतात, कारण पेपर काढण्याराची क्षमता त्याला माहित आहे .पेपर तपासण्यार्या चा प्रामाणिकपणा त्याला माहित आहे. त्याच्या पालकांची. गुरुजनांची, शासनाची धावपळ त्याच्यापेक्षा जास्त आहे. परीक्षेत पास होण, शिक्षकांचा, पालकांचा व शासनाचा विजय समजला जातो ,मग त्यासाठी अंतर्गत गुणांची उधळण झाली तरी चालेल पण पास ची टक्केवारी वाढली पाहिजे. त्याला किती समजलं त्याने कोणते कौशल्य प्राप्त केले कोणत्या अध्ययन क्षमता त्याच्यात आल्या याची चिंता करणे सर्वांनीच सोडलं आहे .आम्हाला फक्त टक्केवारी हवी तुमच्यातली शक्ती त्याला द्वेष मत्सर यापासून दूर ठेवण्यासाठी अपुरी पडते देशातच द्वेष मत्सर सुरू आहे. एकच गणवेश असला तरी शाळेबाहेर मुलं कपड्या प्रमाणे स्वभाव बदलतात. सरड्याप्रमाणे रंग बदलतात.

मूल्यसंवर्धन तुमच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शिवाय अभ्यासक्रमात ते नाही ,मग कशासाठी असा प्रश्न काही जणांना पडतो, शिकवा त्याला हर्ष संयमानं व्यक्त करायला मुळात धाडसाचे प्रसंग कमी होत चालले आहेत. आजच्या मुलासमोर हर्ष नाही, चार भिंतीत त्याला हर्ष सापडत नाही .वर्गपाठ ,गृहपाठ यांनी त्याची दमछाक झाली आहे. दप्तर ओझं झालंय. कृती नाही म्हणून हर्ष नाही. कृती नाही म्हणून कौशल्य नाही.निर्मितीच्या आनंदाला पारखे झालेल्यांना हर्ष कसा होईल. पास होण्यापुरता हर्ष आज राहिला आहे. अभ्यासक्रमात पोपटपंची आहे, कोकिळेचा स्वर नाही. पॅटर्नमुळे पोपटांची संख्या वाढत आहे निसर्गातले हिरवे हिरवे गार गालिचे निसटत चाललें आहेत. निसर्गातल्या प्रदूषणामुळे ताजमहाल काळवंडला.

शैक्षणिक प्रदूषणामुळे विद्यार्थी काळवंडले आहेत. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडा पेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. शिक्षण लाखाची गोष्ट बनली आहे. टक्केटोणपे न खाल्ल्यामुळे , मुले टक्के घेऊन घोडदौड करीत आहेत . त्यांचा शिक्षण हक्क कायदा, हक्क नसलेल्यांना मिळतआहे.हार स्वीकारण्यास मुले तयार नाहीत .येनकेन प्रकाराने परीक्षेतील यशाचा हार त्यांना हवा आहे ,त्यासाठी अशैक्षणिक गोष्टी ते करतील. तुम्हाला कळू न देता किंवा कळलं हे माहीत असूनही ते कटू सत्य तुम्हाला माहित आहे. मेंढपाळाच्या संख्यापेक्षा सुद्धा जास्त मुलं तुमच्या ताब्यात असून शिस्त लावायची आहे,ते ही शिक्षा न करता. निर्णय प्रक्रियेतील शेवटचा दुवा म्हणून तुम्हाला हे करावं लागतं. शिल्पकारावर बंधन टाकल्यावर कलाकृतीच काय होतं हे तुम्हाला माहीत असेलच. गुंडांना राजकारण करण्याचे तिकीट मिळतं, शैक्षणिक संस्थांकडून लुटण्यासाठीचे परमिट मिळतं. त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांना नमुनच प्रवेश घ्यावा लागत आहे संस्कारासाठी शाळेत टाकलेल्या मुलासमोर अभ्यासक्रमासाठी चे सोपस्कार होतात .पाठ्यपुस्तकातले घोटाळे वाढताहेत .रात्रीतून शाळा-महाविद्यालय वर्तमानपत्रातून अवतरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील गुंडगिरी कागदावर चालते, प्रश्नपत्रिका फोडणे, गुण वाढवणे ,कॉपी हे गुंडगिरीचे प्रकार नव्हे काय? संस्कारासाठी शाळेत घातलेली मुलं, प्रचंड टक्केवारी घेऊन बाहेर पडत‌ आहेत.

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडार.मुले वाचतील असे काही तरी करा. मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला. त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरवेगार डोंगर . त्यांच्या मनाला निवांतपणा मिळतच नसेल. कोचिंग क्लास , दूरदर्शन यामुळे त्याचा उरलासुरला निवांतपणाराहत नाही. सृष्टीचे सौंदर्य, पक्षाची भरारी या कवितेतून आस्वाद घ्यायच्या सुद्धा गोष्टी राहिल्या नाही आहेत. वर्गात कविता शिकवली जाते पण अस्वादली जात नाही. हिरवे हिरवे गार गालिचे त्याला डेस्कवर बसून ,कॉम्प्युटर मध्येच पाहायला मिळतात. त्याच्या मनाला निवांतपणा कुठला. गृहपाठ ,शाळेत जाणे येणे ,,दप्तरांचे ओझे यामुळे तो पार वैतागून गेलेला असतो. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.असे असून विद्यार्थी मिळालेले गुण स्वीकारत नाहीत. पुनर्मूल्यांकन करून गुण वाढवण्याच्या मागे ते आहेत. शिक्षण प्रक्रिया, शिक्षक निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धतीने तो चूक ठरला आहे .त्याने कसा शिक्षणावर विश्वास ठेवावा. सामान्य गुणवत्ता यादीत आणली जात आहेत. शाळेत धडा मिळाला तर बोर्डात विद्यापीठात फसवून आणलेल्या सरळ आलेल्या याच्यापेक्षा श्रेयस्कर ठरू पाहात आहे शाळेतले संस्कार करणं शिक्षकाची जबाबदारी आहे .संस्कार का केले नाही, झाले नाही ते कोणी शिक्षणाधिकारी विचारणार नाही गुणवंतांचा सत्कार होणारच‌ तो गुणवत्ता यादीत कसा आला याचा विचार न करता, सत्कार करणारे करतात. नाहीत विद्यार्थी म्हणतो पहिला किंवा गुणवत्ता यादीत येईल असे वाटलेच नव्हते ,कारण पालकांचे प्रयत्न त्याला माहीत नसतात. त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलेपणाने वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. इकडे-तिकडे धावत आहेत या क्लोसिंग कोचिंग क्लास या शाळेची या शिक्षकाची सरशी तिकडे भाऊगर्दी त्याला अभिमानास्पद वाटत आहे त्याला वाटत आहे शाळेत विज्ञान मुलं शिकवण सर्वांच्या करतात चित्रहार म्हणलं की भाऊगर्दी दूरदर्शन अभ्यास दर्शन समूह संपर्क साधना पुढे त्याची ताकद कमी पडत आहे. तंत्रज्ञानाची सरशी झाली आहे. याच्यापुढे तो निष्क्रिय झाला आहे अशैक्षणिक गोष्टीची सरशी होत आहे.आजच्या मुख्याध्यापकांची ओळख प्रत्येक मुलांशी असू शकत नाही .ओळखत नाही म्हणून , संवाद नाही ,म्हणून आंतरक्रिया नाही

शालेय जीवन संपल्यावर त्याला शक्ती देऊ दे घोटाळे सहन करण्याची. विनाअनुदान चे घोटाळे,परीक्षेतील घोटाळे, शैक्षणिक प्रश्नांची जाण , शिकताना होत आहे . राजकारणापुढे शिक्षणाची कवचकुंडले तग धरेनाशी झाली आहेत .संस्थेला नाव देण्यात यावे विनाअनुदान चा हात कोणी धरणार नाही, देव-देवी संत यांची नावे देण्या मागे त्यांचे हेतू शुद्ध आहेत का? सरस्वतीचा नव्हे तर लक्ष्मीचाही वरदहस्त लाभलेले ही शिक्षक येत आहेत एवढ्या देणग्या घेऊन शैक्षणिक संस्था फुलत नाहीत, बहरत नाहीत.पुढे जात असल्याचं दुःख दाबून त्याला अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे दुःख दलालांनी वाढवलेत एक दिवस असा येईल चेहरामोहराच बदलून जाईल पेपर तपासणारे विद्यार्थ्याकडून गोळ्या खाव्या लागतील की काय अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे दुःख ठरवलं असतं तर त्याला हसण्याचे येणारच नाहीत दुःखाच्या जाईल दुःखाची कारणे शोधली पाहिजेत त्याच्याशी झगडले पाहिजे केवळ हसत राहून स्वतः करून त्याला चालणार नाही काही जण स्वतःच्या सुखासाठी दुःखात देत आहेत हे काहीच नसतं त्याला पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्याने कधीही विक्रय करू नये करण्यापेक्षा झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनात त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा त्याला मिळणाऱ्या दुकानात जात आहेत अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत मिळवण्यासाठी प्रवेश मिळणे कठीण झाले आहे झाले आहे खरेदी-विक्री नफा-तोटा सरासरी टक्केवारी सत्कार होता हे स्पष्ट झाले आहे

त्याला ममतेने वागवा. पण, लाडावून ठेवू नका अजित तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य धरला पाहीजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखीन एक सांगा त्याला आपला विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल पुरात शब्दा मानवजातीवर पण त्याच्या त्याला ममतेने वागवा पण आपल्याला प्रचंड संख्येमुळे जमणार नाही तो घरूनच लाडावून आलेला असेल त्यांना पार्टी झालेले मूल आपल्याकडे दाखल होत आहे त्याचे आई वडील नोकरीनिमित्त बाहेर असतात शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेला आगीतून तावून सुलाखून निघाला पाहिजे. तो सुटला एकदाचा म्हणून आनंदी होतो. शाळा ह्या अभ्यासक्रम तोंडी व लेखी सांगण्याचा संस्था झाल्या आहेत. मुलं तावून-सुलाखून निघतच नाहीत.सुखाउन निघत आहेत. शाळा सुटली पाटी फुटली. दप्तराचं ओझं हलकं झाले ही भावना अनेकांची असते मानवजातीवरील श्रद्धा मात्र उडत जाणारे प्रसंग घडत आहेत राजकारण म्हणजे पैशांची घोटाळे चालणाऱ्या ठरत आहे प्रत्येक घोटाळ्याला राजकारणाचा मिळत आहे ते मिळत आहे मानवच मानवजात उध्वस्त करत आहे. घरातल्या वहिन्या कमी झाल्या, आता वाहिन्या, वहिनी प्रमाणे संस्कार करत आहेत. माफ करा गुरुजी मी फार बोललो आहे खूप काही सांगतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझ्या मुलाला, माझ्या या पत्रात पण आहे पण लक्षात कोण घेतो, पण मी फार अजून बोलायला हवं सांगायला. तुम्ही पालकांना बोलायला, मला सांगायला, संवाद साधायलासांगा. माझ्या पहिल्या पत्राचे उत्तर किती मुख्याध्यापकांनी दिलं. माझ्यासारख्या पालकांची किती पत्रे आपल्याला येत असतील. पत्र हा संस्कार आहे, परिपत्रक न्हवे.जमेल तेवढे आवश्य आपण करताच ,पण ते अपुरे आहे. शैक्षणिक डोलारा कोसळत असताना आपल्या कडून खूप अपेक्षा आहेत. आपले मुख्याध्यापक मुख्य ही नाही व अध्यापक ही राहिले नाहीत. प्रत्येक पालकाला आपला मुलगा गोड वाटतोच. कुटुंबात व शाळेतच वळण लागतं.महाविद्यालयात, समाजात बिघडतं. माफ करा मी सगळा नन्ना चा पाढा वाचला, पण काहीतरी यशोगाथा असतीलच. शिक्षणाची काळजी घेणारा समाज आज शिक्षणाच्या काळजीत पडला आहे. फार थोड्याशाळाचांगल्यामुख्याध्यापक ,शिक्षकांमुळे चालल्या आहेत. निराशाजनक वातावरणातही शिक्षक अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत जसे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा यांचे मुले तुमचे नाव घेतील असे करा मुलांनी मुख्याध्यापकाचे नाव ,शिक्षकाचे नाव अभिमानाने घेण्याचे दिवस तुम्हीच परत आणू शकता .पत्राला फक्त खुंटीला टांगून त्याला हौतात्म्य देऊ नका. नवीन नवीन प्रयोग करून प्रस्थापित व्यवस्थेला बदलून टाका .माझ्या शाळेत विद्यार्थ्यांनी रांगा लावाव्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करा. शासनाचे अनुदान असून , लोकसहभागातून स्वतःच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षण हवंहवंस वाटेल असं नक्की आपण कराल अशी आशा.जगण्यासाठी प्रतिष्ठा आणि गतवैभव मिळवण्याचाच प्रयत्न करायचा असतो.शिक्षकांनी आदर्श पुरस्काराच्या मागे न लागता नाविन्य शिक्षणात आणण्याचा आदर्श निर्माण करावा.

-तुमचा विस्मृतीत गेलेला

अब्राहम लिंकन



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational