आयुष्यात प्रेमाचा सहवास ....
आयुष्यात प्रेमाचा सहवास ....


"आयुष्यच्या सहवासात तुझी साथ असली तर माझं आयुष्य खूप सुंदर होईल तुचा सहवास असणे हे माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे माझ्या पुढील आयुष्याच्या सहवासात मला जोडीदार म्हूणन साथ देशील? खूप दिवस तुला सांगावे असे ठरवलेले पण हिंमत होईना म्हूणन हा मेसेज पाठवला उत्तर नक्की कळव वाट पाहीन "
(रिया हा मेसेज पाहून थोडी लाजली आणि जोरात हसली )
"वेड्या तू कधी माझ्यावर प्रेम करू लागलास "?
(रिया आणि मिहीर चांगले मित्र आणि आज मिहीर ने ती ला हा मेसेज पाठवलेले तो पाहून रिया ला आश्यर्य वाटले मिहीर च्या मनात आपल्यविषयी असे काही असेल असे तिला कधीच वाटले नव्हते तरी आपण काहीच रिप्लाय दयाच्या नाही असे तिने ठरवले दोन दिवस झाले तरी काही रिप्लाय नाही हे पाहून मिहीर ने रियाला फोन केला )
"हॅलो रिया"
"हा मिहीर बोल"
"काय रागावलीस माझ्यावर फोन नाही मेसेज पण नाही तुझी ?"
"रागवणार का आणि तुही कुठे कॉन्टॅक्ट केला दोन दिवसात "
"तू मेसेज चा पण रिप्लाय नाही दिला "
"कोणता मेसेज ?"
"रिया पिल्झ तुला माहित आहे कुठल्या मेसेज बदल बोलतोय "
"ओ तो मेसेज "
"हो काय उत्तर आहे तूच "?
"सॉरी मिहीर मी तुला फक्त एक चांगला मित्र म्हूणन पाहू शकते तुच्या भावनाची कदर करते मी पण सॉरी त्या नात्यात मी तुला नाही पाहू शकत पण आपली मैत्री मात्र कायम राहील "
"ओके मिळालं तूच उत्तर "
(आणि मिहीर ने फोन कट केला तो कायमचा )
(दरवाजाची बेल वाजली आणि रिया भूतकाळातून वर्तमनातं पोहोचली दरवाजा उघडला तर समोर मोहित होता रिया चा नवरा )
"अरे काय झालं अशी काय पहात आहेस "?
"काही नाही "
"बरं नाही आहे का ?"
"नाही रे तू फ्रेश होऊन ये मी कॉफी बनवते"
"ओके "
"व्वा तुझ्या हातची कॉफी खरंच सगळा स्ट्रेस घालवते "
"हो का मस्के बाजी बरी चालतात तुझी "
"अगं आमच्या कंपनीची उद्या सगळ्या ब्रान्च ची गेट टूगेटर पार्टी आहे आपल्याला जायला हवं "
"मी पण "
"हो अफकोर्से तू पण यायचं कळू दे सगळ्यांना कि माझी बायको कोण आहे ते "
"पुरे हा "
"पण आपण जायचं हा उद्या "
"ओके जाऊ आपण उद्या "
(पार्टी ची संध्यकाळ रिया आणि मोहित पार्टी स्थळी पोहचले रंगेबेरंगी रोषणाई आणि संगीताच्या आवाजाने परिसर खुलून केला होता )
(पार्टी मध्ये पोहोचता सगळ्याशी ओळख करता करता अचानक मोहित ने कोणाला तरी हाक मारली )
"हॅलो मिस्टर मिहीर "
"ओ मोहित "
"कसा आहेस"?
" मी मस्त "
"आणि तू "
"परफेक्ट "
"मिहीर हि रिया माझी लाईफ पार्टनर "
"आणि रिया हा मिहीर आमच्या दुसऱ्या ब्रँच मध्ये असतो "
(रिया ने त्याला पहिले हा तोच मिहीर होता. वर्ष लोटली पण ओळख मात्र कायम होती. रिया आणि मिहीर ने न ओळख असलेल्याला सारखे एकमेकांना हसले आणि निघून गेले )
(तेवढ्यात मोहित ला कोणी हाक दिली म्हुणुन मोहित त्या घोळक्यात गेला रिया ने पहिले कि मिहीर एकटाच उभा होता ती तिथे गेली )
"ओळखल नाही मला मिहीर ?"
"हो ओळखल "
"काय रे त्या दिवसापासून तू माझ्याशी संपर्क तोडलास ना रे तो कायमचाच कसा आहेस? एवढ्या वर्षांनी तू भेटलास तो हि असा "
"बरा आहे आणि तू "?
"मस्त काय रे बायकोला नाही आणलास बरोबर" ?
"बायको नाही आहे"
"म्हणजे लग्न नाही केलस तू "
"केलं होत म्हणजे ती सध्या नाही आहे "
"ओ सॉरी कशी म्हणजे"
"नाही तसं नव्हे आमचा डिवोर्स झालाय "
"काय"?
"हो "
"अरे पण कसा ?"
"त्यात काय आश्चर्य "
"पण का "?
"का म्हणजे "?
"म्हणजे नेमकं काय झालं"
"जाऊ दे ना घडलेल्या गोष्टी कशाला हव्यात "
"अरे पण तुच्या आयुष्यात असे काही घडले आणि ते मला जाणून ह्याच आहे सांग ना का झाला "
"काय आहे ना रिया ज्या मुलीवर मी प्रेम केलं तिला मी फक्त मित्र म्हूणन पाहायचं होत आणि जीनी माझ्या वर प्रेम केलं ते फक्त काही काळपुरतं टिकलं आमचे एकमेकांशी जुळे ना वाद विवाद त्यात भांडण मग काय अवघ्या दोन वर्षात आम्ही वेगळे झालो"
"अरे पण ती प्रेम करायची ना तुझ्यावर ?"
"प्रेम ती माझ्या दिसण्यावर प्रेम करायची स्वभावावर नाही हे मात्र मला मगच समजलं "
"असो "
"सो सेंड अँड सॉरी मिहीर "
"नो डोन्ट बी सेंड अँड सॉरी अल्सो माझ्या आयुष्यच्या सहवासात प्रेम नव्हते आणि ते मला मिळालं नाही डंट्स इट्स"
"नो मिहीर एव्हडं सोप्यात घेतललस तू ?"
"अग हो जे नव्हतं ते कुरवाळत बसण्यापेक्षा मस्त जाग्याच जगायचं आणि आता मी सिंगल आहे पण खूप मजेत जगतोय "
"अरे मग दुसरं लग्न "
"आता नो लग्न वैगरे एकटा जीव सदाशिव "
"खूप वाईट वाटतंय रे (रियाचे डोळे भरून आले )
"हे डोन्ट बी पिल्झ पण मी खुश आहे तू मात्र योग्य निवड केलीस तुला मात्र चांगला नवरा मिळाला मोहित खूप चांगला माणूस आहे. आम्ही गेल्यावर्षी सेमिनारला भेटलेलो बोथ ऑफ यू आर लकी फॉर इच अथर मला आयुष्यात प्रेम नाही मिळालं, पण तुच्या आयुष्यात मात्र प्रेमाचा सहवास असाच राहू दे "
"मिहीर तुझा नंबर दे ना?"
"नाही नको रिया एव्हडी वर्ष आपण कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो आणि ह्या पुढे हि नसावे उगीच आपुलकी कशाला ती तू तुच्या संसारात खूप रूळलीस आहेस तशीच राहा कधी भेटलो तर हाय हॅलो करू बस "
"पण मिहीर "
"नो रिया बरं माझे सहकारी माझी वाट पाहत असतील निघतो मी खुश राहा एन्जॉय युअर लाईफ नेहमी एकमेकांना सोबत करा बाय टेक केयर "
(मिहीर रिया समोरून निघून जातो रिया मात्र त्याच्या ह्या बोलण्याने थक्क नजरेने त्याला पाहत राहते )