Anuradha Motewar

Children

2  

Anuradha Motewar

Children

आय मिस यू...

आय मिस यू...

1 min
120


वरील शब्द तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत .I miss you किती common शब्द झालाय ना आजच्या काळात. Miss म्हणजे आठवण येणे.

     या लाडक्या मुलांनो

   तुम्ही मला आधार

न व हिंदवी युगाचे 

   तुम्हीच शिल्पकार

I miss you मुलांनो. आम्हा शिक्षकांना तुमची खुप आठवण येते. कुठून तरी कोरूना नावाचा एक छोटासा व्हयरस आला आणि तुम्हा मुलांचे विश्वच बदलून गेले. शाळा म्हणजेच आपले जग असणाऱ्या तुम्हाला शाळेपासूनच लांब ठेवल्या जात आहे. मुलांनो तुम्हाला जितकी शाळेची आठवण येत आहे तितकीच आम्हालाही तुमची खूप आठवण येतेय बरं का.....!

    पुस्तक आणि खडू 

लागले कि रडू 

    रडतोय फळा 

वाट पाहते शाळा.

 मुलांनो तुमच्याशिवाय शाळा म्हणजे देवाशिवाय मंदिर. आज शाळा तुमच्याशिवाय सुनी सुनी झालीय़. इथले झाडे ,पाने, फुले सर्वांना तुमची खुप आठवण येतेय. तुमच्या शिवाय इथले मैदान निर्जीव झाले आहे. ग्रंथालयातील पुस्तके तुमची वाट पाहात आहेत. विज्ञानाच्या लॅब मधील वस्तूंना तुमचा स्पर्श हवाय. पाण्याचा होैद तुमची वाट पाहतोय. आम्हा शिक्षकांना तर तुमच्या शिवाय शाळेत जायला खूप जीवावर येत आहे बरं.....

      ना शाळेची घंटा

ना परिपाठाचे सुर

   कोरोनामुळे झालो 

आपण शाळेपासून दूर

   ना हसरा चेहरा ना निरागस मन

 किती करावी मुलांनो

     तुमची आठवण.

      पण मुलांनो हेही दिवस जातील बरं का. तुम्ही फक्त स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. एक ना एक दिवस आपण कोरणा मुक्त होऊ. आणि एक दिवस पुन्हा शाळेची घंटा ऐकू येईल. तोपर्यंत मुलांनो I Miss you....... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Children