Anuradha Motewar

Inspirational

2  

Anuradha Motewar

Inspirational

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

2 mins
93


       गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु 

       गुरुर्देवो महेश्वरा 

       गुरुर साक्षात परब्रम्ह 

       तस्मै श्री गुरुवे नमः 


आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचे खूपच महत्त्व आहे.गु म्हणजे अंधार रू म्हणजे प्रकाश ,अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो गुर असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 888 रोजी तामिळनाडू राज्यातील तीरूत्ताणी या गावी झाला .त्यांचा जन्मदिवस आज शि क्षक दिवस म्हणून साजरा केला. जातो ते मूळचे सर्वपल्ली या गावचे रहिवासी होते .म्हणून ते आपल्या नावापूर्वी सर्वपल्ली हे नाव लावत असत. त्यांचा जन्म एका सात्विक व ब्राह्मण कुटुंबात झाला .त्यांच्या वडिलांचे नाव वीरा स्वामी व आईचे नाव सीताम्मा होते. त्यांना चार भाऊ एक बहीण होती. त्यांची परिस्थिती अतिशय साधारण होती. लहानपणापासूनच ते अभ्यासात खूप हुशार हो ते. त्यांना पुस्तके वाचनाची खूप आवड होती. स्वामी विवेकानंद आणि सावरकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता .


        त्यांच्या मते मनुष्याची बुद्धी ,ह्रदय आणि आत्म्याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय. मानवाच्या ज्या काही स्वाभाविक भावना असतात त्यांना परिस्थितीनुसार सुसंस्कृत वळण लावणे म्हणजेच शिक्षण होय. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते कोणत्याही समाजाची संस्कृती व अध्यात्मिक पातळी त्या समाजातील स्त्रियांचे स्थान काय यावरून ओळखली जाते. म्हणून स्त्रियांना त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असे शिक्षण दिले पाहिजे. काळाच्या ओघात भारतीय शिक्षण पद्धतीत खूप काही सकारात्मक बदल झाले आहेत. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर असलेल्या पाहायला मिळतात.       


डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते शिक्षकाचे कार्य हे केवळ माहिती व ज्ञान पुरविण्याचे नसून चैतन्याचे संक्रमण करण्याचे आहे .अपरिपक्व मनावर आपल्या उज्वल व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्या चे कार्य शिक्षकांना करावे लागते .The boys do not care for what you teach them, but they care for the example you set. हे शिक्षकांनी लक्षात घेऊन दैनंदिन अध्यापन आनंदायी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


       डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे शैक्षणिक कार्यात घालवली.ते शिक्षक ,प्राध्यापक आणि अनेक विद्यापीठाचे कुलगुरू होते .त्यानंतर ते देशाचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती बनले .एक शिक्षक असून देशाच्या सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हा फक्त त्यांचा नाही तर समस्त शिक्षकांचा आणि त्यांच्या व्यवसायांचा गौरव आहे.


      अशा या थोर भारतीय सुपुत्राचा 1954 मध्ये भारत सरकारने भारतरत्न देऊन गौरव केला.

      डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे प्राचीन आणि अर्वाचीन व सर्व धर्मीय अध्यात्मिक भारताचे प्रतीक आहेत. तसेच पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगास जोडणारा तेएक दुवा होत .ते थोर शिक्षण तज्ञ तर होतेच आणि जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञानीही होते. अशा या थोर भारतीय सुपुत्रास कोटी कोटी नमन!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational