Anuradha Motewar

Others

2  

Anuradha Motewar

Others

हे जीवन सुंदर आहे

हे जीवन सुंदर आहे

1 min
119


जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसते.पण जन्म आणि मृत्यू या दोनीच्या मध्ये जे काही असते त्याचे नाव जीवन असते.आणि ते कसे जगायचे हे फक्त आपल्याच हातात असते.आपल्याला मिळालेले जीवन अनमोल आहे.हे आपल्या सारख्या सामान्य जीवन जगणाऱ्याला कदाचित कळणार नाही पण म्रत्यूशी झुंज देणाऱ्या एखाद्या रोग्याला त्याची किंमत असते.एखाद्या करोडपती व्यक्तीला सुध्दा जीवन विकत घेता येत नाही.किंवा एखाद्या देशाच्या पंतप्रधानालाही एक मिनीटही वेळ विकत घेता येत नाही.इतके अनमोल आहे जीवन. मग आपल्याला मिळालेले हे जीवन हसत जगायचे का रडत ढकलायचे हे आपणच ठरवू शकतो.


      जीवन खुप सुंदर आहे

      जगता आले पाहिजे

    जीवन खुप अनमोल आहे

 किंमत करता आली पाहिजे


जीवनात घडणाऱ्या सर्वच घटना आपल्या हातात नसतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या बदलायच्या, आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत त्या गोष्टींचा स्वीकार करायचा आणि ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत आणि स्वीकारूही शकत नाहीत त्या गोष्टी सोडून द्यायच्या. माणसाने कधीकधी सोडून द्यायलाही शिकलं पाहिजे. सोडून दिल की ओझं होत नाही.


नाहीतरी जीवनात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असायलाच पाहिजेत आणि असतातच. फक्त प्रत्येकाला काय धरून ठेवायचं आणि काय सोडून द्यायला पाहिजे हे कळले पाहिजे. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा प्रत्येक जण म्हणेल हे जीवन सुंदर आहे....... हे जीवन सुंदर आहे.........       


Rate this content
Log in