Jyoti gosavi

Crime

2  

Jyoti gosavi

Crime

आवडलेली नाटकातील व्यक्तिरेखा

आवडलेली नाटकातील व्यक्तिरेखा

5 mins
88


नाटकाचे नाव - "खरं सांगायचं तर"


अगाथा ख्रिस्ती यांच्या "विटनेस फोर प्रासिक्युसेशन " या कादंबरीवर आधारित मराठी नाटक खरं सांगायचं तर हे सस्पेन्स नाटक आणि त्यातील नाही का "आयेशा" ही व्यक्तिरेखा माझ्या लक्षात राहिली. 


खरेतर मी कधी सस्पेन्स किंवा ट्रॅजेडीक नाटके पाहत नाही. आपली कॉमेडी हलकीफुलकी नाटके पहात असते.पण हे देखील खरं आहे की, कॉमेडी नाटक किंवा त्यातल्या व्यक्तिरेखा फार कमी लक्षात राहतात.

परंतु हे नाटक मात्र माझ्या लक्षात राहिले.


विक्रम गोखले, अक्षय पेंडसे, विवेक लागू ,आणि सुप्रिया पिळगावकर अशा दिग्गज कलाकारांनी हे नाटक रंगवलेले आहे .


विक्रम गोखले एक प्रतिशयत वकील ,ज्यांना कोणतीही केस हरणे माहित नाही.विवेक लागू सरकारी वकील, विक्रम गोखले त्यांचा नेहमी पराजय करत असतात.


नाटकाच्या सुरुवातीलाच, अक्षय पेंडसे, या नावाजलेल्या वकिलांच्या कर्णिक राणे एण्ड असोसिएशन या एजन्सी मध्ये येतो.त्याच्यावरती एका मध्यमवयीन कुमारिका स्त्रीचा खून केल्याचा आरोप असतो.

त्याला पोलीस पकडण्यासाठी येणार असतात, आणि तेव्हा तो तिथे येऊन, "तो कसा निर्दोष आहे" ,त्यांनी काही केलेले नाही हे वकीलांना पटवत असतो, आणि खून झाला त्या दरम्यान तो घरातच होता . 

09:25 ला तो घरात होता हे फक्त त्याची बायको सांगू शकते.ती एकटीच या गोष्टीला विटनेस असते.


एवढी राम कहाणी होईपर्यंत पोलिस त्याला घेऊन जातात .आणि मग येते त्याची पत्नी आयेशा,


 "आयेशा नितीन सावरकर" या नावातच बराच खुलासा होतो .ती पूर्वी दुबईत होती.आणि त्याने तिला तिथल्या गुलामगिरीतून सोडवून लग्न करून या देशात घेऊन आलेला असतो .ही झाली नाटकाची पार्श्वभूमी .


जेव्हा विक्रम गोखले तिला एक वाक्य सांगतात "नवऱ्याची काळजी वाहणारी, प्रेमळ बायको असेल" ,तर तिची साक्ष कोर्टात चालत नाही.


तेव्हा ही आयेशा त्याच्याबद्दल, म्हणजेच आपल्या नवऱ्या बद्दल सगळं सस्पेन्स मध्ये बोलत राहते.ज्यामध्ये तिचं त्याच्यावर प्रेम आहे किंवा नाही हे समजतच नाही.


शेवटी केस कोर्टामध्ये उभी राहते, आणि ती हातातून गेल्यातच जमा असते.

जेव्हा महत्वाची साक्षीदार म्हणून "आयेशा" ला म्हणजेच आरोपीच्या बायकोला, कोर्टामध्ये बोलावले जाते.तेव्हा ती पूर्णपणे आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध साक्ष देते.


तो दहा वाजून दहा मिनिटांनी घरी आला.त्यानेच मला असं पोलिसांना सांगायला सांगितलं .त्यानुसार मी स्टेटमेंट दिलं, अशी पूर्ण पलटी मारते.

आधी तिने पोलिसांना तो नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी घरात होता हे सांगितलेलं असतं.

पण नंतर ती वेगळेच सांगते.

आधी पोलिसांना त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग, फळ कापताना पडलेले आहेत असं सांगते .नंतर सांगते की तो बाहेरून आला तर, त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पडलेले होते.

त्यामुळे केस जवळजवळ हातून गेलेलीच असते.


अशावेळी एक रेड एरिया तली स्त्री ,हातामध्ये सिगारेट वगैरे घेऊन कर्णीक एण्ड राणे असोसिएशन च्या ऑफिस मध्ये येते. 

तिचं ते एकंदरीत व्यक्तिमत्व कळून येतं की ही" रेड लाईट एरिया" तली बाई आहे. तिच्या तोंडातील भाषा ,,आयेशा ला शिव्या देणे ,आणखीन हातातल्या पुराव्यासाठी सौदा करणे. त्यांना केस हरण्याच्या ऐनवेळी हातात पत्र रुपी पुरावा देणे.  ही सर्व पत्रे आयेशाची असतात, आणि तिने शकिल नावाच्या माणसाला लिहलेली असतात .आणि त्यामध्ये "माझा नवरा आता कसा एका बाईच्या मर्डर मध्ये अडकलेला आहे" आणि मी त्याच्या विरुद्ध कोर्टात कसा खोटा पुरावा देणार आहे. हे देखील नमूद असते. 


शिवाय जेव्हा विक्रम गोखले तुझं 

आयेष्याशी काय वैर आहे? असे विचारतात. तेव्हा ती सांगते की ही रांड नवऱ्याला सोडून, त्याला फसवून, माझ्या शकीलच्या मागे लागली. आणि आपल्या पाठी वर शकिलने केलेल्या वाराची खूण दाखवते. आणि जाता जाता वकील साहेब "देऊ का एक चुम्मा? अशी त्यांच्या मागे लागून, जवळ जाऊन, चुम्मा दिल्याची ॲक्टींग करते. 

ते दचकून मागे सरकतात


त्या पत्रांच्या मदतीने "विक्रम गोखले" ती केस कोर्टामध्ये जिंकतात. आणि आयेशा ला खोट पाडतात. 


या बाईने पहिलं स्टेटमेंट पोलिसांना खोटं दिले. 

दुसऱ्या स्टेटमेंट माझ्या समोर खोटे दिले. आणि आता ते कोर्टात ती खोटं बोलत आहे. 

असं म्हणून तिच्यावर ती फ्रोजरीची केस करण्याचं सांगतात. आणि भर कोर्टामध्ये तिला खूप सुनावतात आणि तिचा नवरा नितीन सावरकर निर्दोष सुटतो .


विक्रम गोखले आपण केस जिंकली या खुशी मध्ये ऑफिस मध्ये येऊन बसतात, आणि पुन्हा एकदा आयेशा नितीन सावरकर या पात्राची एन्ट्री होते. ती त्यांना विचारते


 काय साहेब? तुम्ही एकदम खुश असाल? तुम्ही केस जिंकली. आणि मग विचारते तुम्ही एकट्याने जिंकले का ? 


 तुम्हाला पत्रांचा पुरावा कोणी आणून दिला? त्याचा विचार केला का? 


विक्रम गोखले तिला सांगतात तू खोटी साक्ष दिल्याबद्दल दहा वर्ष तुरुंगात जाशील .


ती विचारते दहाच वर्ष ना? जन्मठेप नाही ना? 


त्यानंतर ती पत्रे घेऊन आलेल्या बाईच्या आवाजात बोलते, आणि "देऊका चुम्मा" हे एक वाक्य देखील बोलते ,तेव्हा कर्णिक वकील अचंबित होतात.


 ती तू होतीस? 


आणि आपण फसवले गेलो हे त्यांना कळते. तेव्हा ती हे पण कबूल करते की ,तो खून नितीननेच केलेला आहे. आणि त्याने मला तशी कबुली दिलेली आहे. तेवढ्यात नितीन ची एन्ट्री होते, आणि तो म्हणतो "मला सोडवण्यासाठी तू काय पण करशील, हे मला माहीत होतं"

 ती वकीलाला सांगते "अभिनय मला आवडत होता, पण एवढी मध्यवर्ती भूमिका मिळेल असं माहित नव्हतं "


तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात ना?की कोणत्याही प्रेमळ बायकोची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जात नाही. 

तेव्हाच मी उलटे वागायचं ठरवलं ,आणि नितीन च्या विरोधात साक्ष दिली .


एवढं सारं होत असताना त्या ऑफिसमध्ये "रश्मी" नावाची एक असिस्टंट असते ,ती नितीन च्या जवळ येऊन उभी राहते. आणि त्याआधी एक प्रसंग आहे ,विक्रम गोखले एकदा रश्मीला विचारतात "तुला वाटतं का? नितीन सावरकरने खुन केला असेल? 

तेव्हा ती म्हणते "नाही सर"


 कशावरून? 


तर तो किती इनोसंट दिसतो. 


त्या वाक्यानंतर आता मात्र ती डायरेक्ट त्याच्या गळ्यात गळा घालून उभी राहते. 


तेव्हा आयेशा याला विचारते

अरे ही कोण? ही तुझ्याजवळ का दिसते? 


मी एवढी आनंदात आहे, आपण दोघे एकत्र राहू ना? बस झालं !


 आणि तो आयेशाला सांगतो की

" कायद्याने तू माझी बायको नाहीस, तुझा घटस्फोट झालेला नाही ,

तुझा माझ्याशी लग्न होण्याआधी दुबईमध्ये निका झालेला होता. आणि हे तू कोर्टामध्ये देखील सांगितलेल आहेस .


एकदा मी तुला दुबईतून वाचवलं, आता तू मला वाचवलं फिट्टमफाट झाली. 


आता तुझा माझा काही संबंध नाही. आणि तो रश्मी बरोबर ते निघून चाललेला असतो, 

तेव्हा ती त्याला थांब म्हणते, आणि 


ज्या स्त्रीने आपल्या नवर्‍याला वाचवण्यासाठी इतक्या उचापती केलेल्या असतात, 

कोर्टात खोटी साक्ष दिलेली असते

 खोटच कुठल्या शकील नावाबरोबर स्वतःचं नाव जोडून घेतलेल असतं 


तो मात्र आपला नाही आणि आपल्याला सोडून जातोय असं म्हटल्यावर, ती त्याला सांगते, 


मला खोटी साक्ष दिल्याबद्दल कोणी अटक करू शकणार नाही. 

पण तुझा खून केल्याबद्दल मला नक्की सजा होईल. आणि टेबल वरचा चाकू उचलून त्याच्या पोटात खूपसते. 

खरी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आयेशा आणि कर्णिक व केल्या दोनच व्यक्ती आहेत. 


जी बाई आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी जिवाचे रान करते, स्वतःवरती खोटेनाटे आरोप घेते, स्वतःच्या चारित्र्यावर ती स्वतः शिंतोडे उडवणारी पत्र तयार करून कर्णिक वकिलांच्या हाती देते,,तीच बाई एका सेकंदात तो नवरा आपल्याला सोडून जातो म्हटल्यावर ती त्याचा खून करू शकते. 

सुप्रिया पिळगावकर यांनी ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारलेली आहे. 


जेव्हा ती रेड लाईट एरिया तली बाई बनून येते, तेव्हा तिला कोणी सुद्धा ओळखलेलं नसतं. आवाजाचा वेगळा टोन, वेगळा पेहराव ,आणि" देऊ का चुम्मा? म्हणत विक्रम गोखले च्या अंगावर जाण्याची, एकदम मस्त स्टाईल .या भूमिकेला एकदम न्याय दिलेला आहे ही आयेशा नावाची व्यक्तिरेखा मला आवडली


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime